संपत्ती निर्माण करणाऱ्यांच्या मी पाठीशी उभा असून यात मी काही चुकीचं किंवा अप्रामाणिकपणे कोणाचा फायदा केला असेन तर शिक्षेला सामोरा जाण्यास तयार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र म्हणाले. ते इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मोदी सरकार हे अदाणी-अंबानींचंच सरकार आहे, अशी टीका राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर करत असतात. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी ही प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले,जवाहरलाल नेहरूजींच्या सरकारला बिर्ला-टाटांचं सरकार म्हणून हिणवलं जायचं. आता या गांधी कुटुंबाची अडचणी अशी आहे की, मलाही अशाचपद्धतीने हिणवायची इच्छा आहे. “

“mत्यांनी राफेल का आणलं? मुद्दा राफेलचा नव्हता. त्यांना वाटलं की बोफोर्सचं पाप धुतलं जाईल. ही सायकोलॉजिकल समस्या आहे. ते या निवडणुकीत फार जोर देत आहेत. या आधी त्यांनी कधी निवडणुकीत एवढी मेहनत केली नव्हती. मी तिसऱ्यांदा जिंकून आल्याने त्यांचं असं झालं की आई-वडिलांची, आजी-आजोबांची काहीच इज्जत राहिली नाही. ते प्रत्येक गोष्ट याच्याशी तुलना करतात. मी लाल किल्ल्यावरून बोलतो की या देशात संपत्ती निर्माण करणाऱ्यांची इज्जत ठेवली पाहिजे. सामर्थ्यवान, सक्षम लोकांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे”, असं मोदी म्हणाले.

“१५ ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या यादीत मी खेळाडू आणि यश मिळविणाऱ्यांना बोलावलतो. जर देश आपल्या कर्तृत्वाची पूजा करत नाही आणि त्याची कदर करत नाही, तर शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ माणसे आपल्याला कशी मिळणार? सर्व स्तरातील यशवंतांचा सन्मान केला पाहिजे”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> ईडीने जप्त केलेला पैसा देशातील गरिबांना मिळणार? पंतप्रधान मोदींचं मोठं विधान; म्हणाले, “केंद्र सरकारद्वारे…”

“जर मी अप्रामाणिकपणा केला असेल तर मला फाशी द्या. जर मी चुकीच्या मार्गाने कोणाचाही फायदा केला असेल तर मला फाशी द्या. पण मी माझ्या देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा आदर करेन,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.संपत्ती निर्माण करणाऱ्यांची आणि कामगारांची त्यांना सारखीच काळजी वाटते. “माझ्यासाठी तो भांडवलदारांचा पैसा, व्यवस्थापकीय लोकांची हुशारी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या कष्टकऱ्यांचा घाम याचा मी आदर करतो, असंही ते पुढे म्हणाले.

भ्रष्टाचाऱ्यांनी लुटलेला पैसा गरिबांना परत मिळावा

“भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत जप्त करण्यात आलेले पैसे गरीबांना कसे देता येईल, यासंदर्भात मी खूप विचार करतो आहे. मला मनापासून वाटते, की हा पैसा गरीबांना परत मिळावा, कारण हा पैसा भ्रष्टाचाऱ्यांनी गरिबांजवळून लुटला आहे. यासाठी केंद्र सरकार विविध पर्याय शोधत आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच “मला यासाठी कायद्यात बदल करावे लागले तर मी ते करेन. याबाबतीत मी कायदेतज्ज्ञांशी चर्चा करतो आहे”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी बोलताना, “भारतीय दंड संहितेच्या जागी आणण्यात आलेल्या न्याय संहितेत यासंदर्भात काही तरतुदी आहेत, असेही त्यांनी सांगितले. तसेच तपास यंत्रणांनी आतापर्यंत १.२५ लाख कोटी रुपये जप्त केले आहेत ”, अशी माहितीही त्यांनी दिली.