१९ एप्रिलचा दिवस संपला आहे. आता वेध लागले आहेत ते लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे. देशात सात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा आज पार पडला. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज ५५.२९ टक्के मतदान पार पडलं. इतर २० राज्यांची स्थिती काय ते आपण जाणून घेणार आहोत. आज महाराष्ट्रासह एकूण २१ राज्यांमध्ये मतदान पार पडलं.

२१ राज्यांमधली मतदानाची टक्केवारी

अंदमान निकोबार ५६ टक्के

अरुणाचल प्रदेश ६५.४६ टक्के

आसाम ७१ .३८ टक्के

बिहार ४७. ३८ टक्के

छत्तीसगड ६३.४१ टक्के

जम्मू काश्मीर ६५.०८ टक्के

लक्षद्विप ५९.०२ टक्के

मध्यप्रदेश ६३.३३ टक्के

महाराष्ट्र ५५.२९ टक्के

मणिपूर ६८.६२ टक्के

मेघालय ७०.२६ टक्के

मिझोरम ५४.१८ टक्के

नागालँड ५६.७७ टक्के

पुद्दुचेरी ७३.२५ टक्के

राजस्थान ५०.९५ टक्के

सिक्कीम ६८.०६ टक्के

तामिळनाडू ६२.०६ टक्के

त्रिपुरा ७९.९० टक्के

उत्तर प्रदेश ५७.६१ टक्के

उत्तराखंड ५३.६४ टक्के

पश्चिम बंगाल ७७.५७ टक्के

सर्वाधिक मतदान कुठे, कमी कुठे?

संध्याकाळी सात वाजेपर्यंत समोर आलेली ही टक्केवारी आहे. या टक्केवारीनुसार त्रिपुरा या राज्यात सर्वाधिक ७९.९० टक्के मतदान झालं आहे. बिहारमध्ये ४७.४९ टक्के सर्वात कमी मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जास्त मतदान झालं तर ते सत्ताधाऱ्यांविरोधात मत गेल्याचं जाणकार सांगतात. २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जास्त मतदान झालं होतं मात्र भाजपाच सत्तेत आली होते. २००९ मध्ये २०१४ मध्ये जास्त मतदान झालं होतं, तेव्हा सत्तातांर झालं होतं. यावेळी मतदान कमी झालं आहे. त्याचा फायदा कुणाला होणार हे ४ जूनला कळणार आहे.