लोकसभा निवडणुकीचे टप्पे १९ एप्रिलपासून देशभरात सुरु होणार आहेत. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाने यावेळी अबकी बार ४०० पार हा नारा दिला आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. अशात भाजपाच्या स्टार प्रचारकांची यादी समोर आली आहे. या यादीत अनेक महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. पण जाणून घेऊ भाजपाचे स्टार प्रचारक कोण कोण आहेत? भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोण कोण? १) नरेंद्र मोदी२) जे.पी. नड्डा३) राजनाथ सिंह४) अमित शाह५) नितीन गडकरी६) योगी आदित्यनाथ७) प्रमोद सावंत८) भुपेंद्र पटेल९) विष्णू देव साई१०) डॉ. मोहन यादव११) भजनलाल शर्मा१२) रामदास आठवले१३) नारायण राणे१४) अनुराग ठाकूर१५) ज्योतिरादित्य सिंधिया१६) स्मृती इराणी१७) शिवराज चौहान१८) के. अण्णमलई१९) रवि किशन२०) मनोज तिवारी ही नावं आहेत. तर महाराष्ट्रातल्या नावांमध्ये पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांसह अशोक चव्हाण, अजित पवार, गिरीश महाजन यांचीही नावं आहेत. हे पण वाचा- Lok Sabha: महाराष्ट्रात भाजपाचे २३ उमेदवार जाहीर, पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट, कुणाला मिळालं तिकिट ? महाराष्ट्रातले स्टार प्रचारक कोण? १) एकनाथ शिंदे२) अजित पवार३) देवेंद्र फडणवीस४) रावसाहेब दानवे५) सम्राट चौधरी६) अशोक चव्हाण७) विनोद तावडे८) पंकजा मुंडे९) चंद्रशेखर बावनकुळे१०) आशिष शेलार११) सुधीर मुनगंटीवार१२) राधाकृष्ण विखे पाटील१३) पियूष गोयल१४) गिरीश महाजन१५) विजयकुमार गावित१६) अतुल सावे१७) धनंजय महाडीक१८) अमर साबळे१९) रविंद्र चव्हाण२०) चंद्रकांत पाटील भाजपाने एकूण चाळीस नावं असलेली ही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे इतर राज्यांमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.