लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाने आज आपला जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. हा जाहीरनामा फसवा आणि विश्वासाहार्य नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच यात महागाई आणि बेरोजगारी यावर उपाययोजना करण्याचा साधा उल्लेखही करण्यात आलेला नाही, असाही आरोप विरोधकांनी केला. दर भाजपाने सदर जाहीरनाम्यात गरिब, युवा, शेतकरी आणि महिलांवर विशेष लक्ष दिल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, त्यांचे सरकरा समान नागरी कायदा (UCC) आणि एक राष्ट्र, एक निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

राहुल गांधींनी जाहीरनाम्यावर बोलताना सांगितले की, भाजपाने महागाई, बेरोजगारी या प्रश्नांना जाहीरनाम्यात स्थान दिलेले नाही. लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेल्या या प्रश्नांची भाजपाला चर्चा करायची नाही. याउलट आमची योजना अतिशय स्पष्ट आहे. सरकार आल्यानंतर ३० लाख नोकरभरती करायची आणि प्रत्येक शिक्षित तरूणाला कायमची नोकरी प्रदान करायची. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट टाकून जाहीरनाम्यावर आपली भूमिका मांडली आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Rajnath singh
“मासे खा, डुक्कर, हत्ती खा नाहीतर घोडा खा, पण…?” तेजस्वी यादवांच्या व्हीडिओवर राजनाथ सिंहांचा टोला
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

राहुल गांधी पुढे म्हणाले, “यावेळी देशातील युवक पंतप्रधान मोदींच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत. युवा शक्ती काँग्रेसचे हात बळकट करेल आणि ज्यामुळे देशात रोजगार क्रांती घडून येईल.”

भाजपची विकास, विरासत, ‘विस्तारा’ची संकल्पपत्रात ‘गॅरंटी’

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, भाजपाचा जाहीरनामा एक ढोंग आहे. या जाहीरनाम्याला खरेतर संविधान बदलो पत्र म्हटले पाहीजे.

प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, लक्षात ठेवा, भाजपाने सुरुवातीपासून देश, समाज आणि लोकशाही विरोधात षडयंत्र रचलेले आहे. भाजपाचे नेते आधी तुमच्यासमोर येतील संविधानाची शपथ घेतील आणि त्यानंतर रात्रीच्या अंधारात संविधान नष्ट करण्याची पटकथा रचतील. जर त्यांना सत्ता मिळाली तर संविधान सुरक्षित राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान या देशाचा आत्मा आहे. हा आत्मा जपण्यासाठी विरोधी पक्ष एकजुटीने भाजपाचा पराभव करण्यासाठी तयार आहे.

गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा

हे तर जुमला पत्र

आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री आतिशी सिंह यांनीही भाजपाच्या जाहीरनाम्यावर टीका करत त्याला जुमला पत्र म्हटले. “आज देशात बेरोजगारीची मोठी समस्या असून लोक चिंतेत आहेत. “एलपीजी सिलिंडरचा दर ३०० वरून १२०० रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर प्रति लिटर ५५ रुपयांवरून ९० रुपयांवर गेला आहे. घरखर्च चालविण्यासाठी प्रत्येक कुटुंबाची होरपळ होत आहे. भाजपाच्या जुमला पत्रावर आता कोणचाही विश्वास उरलेला नाही”, अशी टीका आतिशी यांनी केली.