कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिदर येथील सभेला संबोधित केलं. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात बिदरमधून झाली, हे माझं सौभाग्य आहे. लोकांनी मोठ्या संख्येने सभेला येत, संपूर्ण देशाला संदेश दिला की, कर्नाटकात पुन्हा भाजपाचं सरकार येणार आहे. ही निवडणूक कर्नाटकाला देशातील एक नंबरचं राज्य बनवणारी आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. “काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या. पण, जनतेने त्यांना प्रत्येकवेळी नाकारलं आहे. जो सामान्य जनतेचा विचार करतो, त्याचा काँग्रेस द्वेष करते. मोठ्या महापुरूषांनाही काँग्रेसने शिव्या दिल्या आहेत. काँग्रेस शिव्या देते, पण, मी जनतेचं काम करत राहणार आहे. जनतेचं समर्थन मला असल्याने शिव्या मातीत मिसळून जातील. कर्नाटकची आणखी सेवा करायची आहे. त्यासाठी पूर्ण बहुमताचं सरकार पाहिजे,” असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याला राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले, “जे ४० टक्के कमिशन घेतात, ते…”

“कर्नाटकात महामार्गाचा विस्तार होत राहिला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात मेट्रो सुरू झाली पाहिजे. सर्वात जास्त ‘वंदे भारत’ रेल्वे चालल्या पाहिजेत… प्रत्येक शेतात पाण्याची सुविधा पोहचली पाहिजे… हे जनतेला हवं… मागील पाच वर्षात कर्नाटकात सुरु असलेला विकास थांबला नाही पाहिजे, असं जनतेचं मत आहे. तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा ठेका भाजपाने घेतला आहे. कर्नाटकाला देशातील नंबर १ चे राज्य बनवण्यासाठी डबल इंजिनचे सरकार असण्याची आवश्यकता आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा : VIDEO : “मी पूर्णपणे निर्दोष, आरोपी बनून…”, गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंतप्रधान मोदी विषारी सापासारखे”

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ‘विषारी सापा’शी केली होती. “पंतप्रधान मोदी विषारी सापासारखे आहेत. विषारी सापाला हात लावल्यानंतर काय होऊ शकतं, याची कल्पना सर्वांना आहे. स्पर्श केला तर जीवनीशी जाल,” असं विधान मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं होतं.