मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. या निर्णयाचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा पक्ष नवनिर्माणचा नमोनिर्माण कसा झाला असा खोचक प्रश्न विचारला आहे. तर किशोरी पेडणेकरांनी राज ठाकरेंची तुलना दात पडलेल्या आणि नखं नसलेल्या वाघाशी केली आहे.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px]

Swati Maliwal Case
Swati Maliwal Case : “हा माझ्या मुलावर अन्याय आहे, तो गेली १५ वर्ष…”; बिभव कुमार यांच्या अटकेनंतर वडिलांची प्रतिक्रिया
Nirbhay Bano Movement, Nirbhay Bano Movement Rises, Modi Shah s tendency, Repressive Politics, Repressive Politics in Maharashtra, Nirbhay Bano Movement in Maharashtra, asim sarode, Vishwambhar Choudhari,
‘निर्भय बनो’ आंदोलन ही प्रवृत्तीविरोधातली लढाई…
AJit Pawar vs Supriya Sule
“मी त्यांचा मुलगा नसल्याने संधी मिळाली नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझी कारकीर्द…”
What Ajit pawar Said?
अजित पवार यांनी शरद पवारांच्या आरोपांना दिलं उत्तर, “मी जर इतका भ्रष्टाचारी, नालायक आणि…”
young woman suicide koparkhairane, navi Mumbai rape marathi news
युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 
abhishek banerjee challenges amit shah
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”
ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

“राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आणि ती भूमिका जाहीर केली. त्यानंतर पत्रकार परिषद घ्यायची काय गरज होती. राज ठाकरे म्हणतात इतर पक्ष भूमिका बदलू शकतात मग आम्ही का बदलू नये? पण राज ठाकरे पक्ष स्थापन झाल्यापासून सातत्याने भूमिका बदलत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी उच्चारलेली लाव रे तो व्हिडीओ ही टॅगलाईन चांगलीच प्रसिद्ध झाली. पण आता राज ठाकरेंनी भूमिका बदलली.”

हे पण वाचा- राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला, “कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, आत्ताच तुरुंगातून..”

दात नसलेला वाघ लोकांना नको

आधी निळा, हिरवा आणि भगवा रंग असलेला झेंडा त्यांनी निवडला होता. आता भगवा रंग असलेला झेंडा राज ठाकरेंनी निवडला. असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.लोकांना दात पडलेला, नखं नसलेला, शक्तीहीन झालेला आणि तोंडाने हवा मारणारा वाघ नको आहे. अशी बोचरी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. आता किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला राज ठाकरे काही उत्तर देतील का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा आपण मोदींना पाठिंबा का दिला ते सांगितलं. मोदी नसते तर राम मंदिर उभंच राहिलं नसतं, तसंच ३७० कलम हटलं नसतं असं राज ठाकरे म्हणाले आहेत. तसंच ज्यांना कावीळ असते त्यांना जग पिवळं दिसतं असं म्हटलं होतं. आता त्यांना किशोरी पेडणेकर यांनी दात नसलेला वाघ म्हणत टीका केली आहे.