पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूतील उधमपूर येथे जाहीर प्रचार सभेत बोलत असताना इंडिया आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. इंडिया आघाडीचे नेते श्रावणात मटण खातात. नवरात्रीमध्ये मासे खातात आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यामुळे त्यांच्यात मुघलांची मानसिकता आहे, असे विधान पंतप्रधान मोदींनी केले होते. यावर आता शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली. “इंडिया आघाडीतील लोक मुघल प्रवृत्तीचे आहेत, असे मोदी म्हणाले. याचा अर्थ काय? इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात, असे पंतप्रधान मोदी प्रचार सभेत बोलले. हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो का?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

भाजपाने गोमांस निर्यातदारांचा निधी खाल्ला

संजय राऊत पुढे म्हमाले, “कोण मटण खातोय, कोण मासळी खातोय, याचा उल्लेख पंतप्रधान मोदी प्रचार सभेत करत असतील तर त्यांना पराभवाची भीती सतावत आहे. देशाच्या भवितव्याचे कोणतेही मुद्दे त्यांच्याकडे नाहीत. विरोधक जर मटण खात असतील तर स्वतःला हिंदुत्ववादी समणाऱ्या मोदींचा भाजपा पक्ष गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून साडे पाचशे कोटी रुपयांचा निधी घेतला, त्यावर आधी पंतप्रधान मोदींनी बोलावे.

भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा, मटण खाणं चांगलं

“कोण मटण खातंय आणि कोण साडे पाचशे रुपयांचे गोमांस खात आहे, हेही जनतेला एकदा कळू द्या. मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच मोदी बिनबुडाचे मुद्दे काढत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेत सांगितले की, आमचे सरकार आल्यानंतर ३० लाख रिक्त पदे भरू. नोकऱ्या देऊ, याला मुद्दे म्हणतात. भाजपासारखे भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा, मटण खाणं चांगलं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“मोदींना एकदा लहर आली आणि…”, मोदींच्या १० वर्षांतील कार्यकाळावरून संजय राऊतांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट स्वतःला खरी शिवसेना समजतो. पण त्यांची लायकी भाजपाकडून दाखविली जात आहे. कुणाला उमेदवारी द्यायची, हे भाजपाकडून ठरविले जात आहे. यावरून त्यांची लायकी दाखविली जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा बोईसर ते वांद्रे ट्रेनने प्रवास, फोटो आणि व्हिडीओ चर्चेत

पंतप्रधान मोदींचा चेहरा गब्बर सारखा

नरेंद्र मोदींचा चेहरा हा मुखवटा आहे की चेहरा? हे काळ ठरवेल. हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे. लोक आता या चेहऱ्याला घाबरत आहेत. गब्बर नंतर मुलं कोणत्या चेहऱ्याला घाबरत असतील, तर मोदींच्या चेहऱ्याला घाबरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या चेहऱ्यावर काहीही बोलले तरी जनता त्यांना दाखवून देईल.