जम्मू : जम्मू-काश्मीरमधील जम्मू व उधमपूर लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये सर्व व्यवस्था झाल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. दोनही जिल्ह्यांतील मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा लागू करण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी आणि जम्मूचे जिल्हा दंडाधिकारी सचिन कुमार वैश्य यांनी सांगितले. मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, अत्यावश्यक सुविधा यांचा आढावा सोमवारी वैश्य यांनी घेतला.

हेही वाचा >>> मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप नेत्यांची बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॉलिटेक्निक महाविद्यालय आणि एमएएम महाविद्यालयात मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सात विधानसभा मतदारसंघातील मतांची मोजणी एमएएम महाविद्यालय तर ११ विधानसभा मतदारसंघांची मोजणी पॉलिटेक्निक महाविद्यालयात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. प्रशासनाने मतमोजणी कर्मचाऱ्यांना पूर्णपणे प्रशिक्षित केले आहे. सर्व राजकीय पक्ष आणि पक्ष प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली गेली आहे. त्यांना ओळखपत्राचे वाटपही करण्यात आले आहे. निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या तैनातीची माहितीही देण्यात आली आहे, असे वैश्य यांनी सांगितले. मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून व्हिडिओग्राफीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.