उद्धव ठाकरेंनी आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी डोंबिवलीत प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी भरपावसात भाषण केलं. तसंच देशात डिमॉनिटायझेशन ज्या प्रमाणे झालं होतं तसं ४ जूननंतर डी-मोदीनेशन होणार आहे. नरेंद्र मोदी देशात असतील पण ते पंतप्रधान नसतील असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“२०१६ मध्ये मोदींनी काय केलं होतं? चलनी नोटांचं डिमॉनिटायझेशन केलं. तसंच आज मी तुम्हाला सांगतो ४ जूनपासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल , पण देशाचे पंतप्रधान असणार नाही. मी आता नवीन शब्द दिला आहे. ४ जून रोजी देश डीमोदीशन करणार आहे. मला प्रश्न विचारला जातो आहे की मोदींनी २५ सभा घेतल्या. मी म्हटलं घ्या आणखी सभा घ्या. कारण पंतप्रधान म्हणून तुमच्या या शेवटच्या सभा आहेत. भाजपाच्या भविष्याची मला चिंता वाटते आहे कारण ४ जूनला यांची सत्ता जाणार. भाजपाचं काय होणार माहीत नाही. पण मोदींना मी विचारु इच्छितो तुम्ही म्हणताय की ७५ वर्षे झाली की राजकारण्यांनी निवृत्त झालं पाहिजे. मग आता तुम्ही काय करणार? दोन वर्षांनी तुम्ही ७५ वर्षांचे होत आहात. तेव्हा भाजपाचं काय होणार? सगळे धोंडे भाजपाच्या पदरात टाकले आहेत.”

uddhav thackeray narendra modi (1)
“…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”
Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Bhavesh Bhinde arrested
मोठी बातमी! घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक; उदयपूरमधून पोलिसांनी घेतले ताब्यात
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Narendra Modi
“…तर मला फाशी द्या”, अदाणी-अंबानी मुद्द्यावरून मोदींचं थेट आव्हान; म्हणाले, “संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा…”
Former Pakistan Prime Minister Imran Khan Granted Bail
१० महिन्यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बघून लोकांना बसला धक्का; पांढरे केस-दाढी आणि चेहऱ्यावर..
Sharad pawar on Ajit Pawar baramati
बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”

उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका, “चपराशी झालो तरीही पुन्हा येईन..”

डोंबिवलीकरांना मोदींची भाषा मान्य आहे का?

“मी आज डोंबिवलीकरांशी बोलायला आलो आहे. मोदींची भाषा तुम्हाला मान्य आहे का? मला नकली संतान म्हणत आहेत हे तुम्हाला मान्य आहे का? राजकारणात जेव्हा शिवसेना आणि भाजपा अस्पृश्य होते त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ दिली. आज त्याच शिवसेनेला नकली म्हटलं जातं आहे हे पटतं आहे का? मला भाजपाचे अनेक लोक म्हणाले की उद्धव ठाकरे हे असं व्हायला नको होतं. भाजपाची जी संस्कारी पिढी होती त्याविषयी मला अजूनही आदर आहे. मोदी एकदा मला नकली सेना म्हणतात, दुसऱ्या दिवशी डोळा मारायचा परत मला नकली संतान म्हणायचं. आत्ताच्या भाजपाला सांगतोय की हे सरकार गजनी सरकार आहे. अशा सरकारला तुम्ही निवडून देणार आहात का? कारण हे उद्या तुम्हालाही विसरतील विचारतील तुम्ही या देशाचे मतदार आहात का? आम्हाला वाटलं की पाकिस्तानचे मतदार आहात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

हे पण वाचा- देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप, “उद्धव ठाकरेंच्या सभेत पाकिस्तानचा झेंडा फडकत होता, मतांसाठी…”

देवेंद्र फडणवीसांवर टीका

“देवेंद्र फडणवीस यांना आम्ही काय म्हणतो माहीत आहे. अक्षय कुमारला मी सांगणार आहे की मोदींची ४ जूनच्या आत परत एक मुलाखत त्याने घ्यावी आणि टरबूज कसं खातात मोदी ते विचारावं, पण हे ४ जूनच्या आत करावं. कारण ४ जून नंतर टरबुजाचा भाव उतरणार आहे. त्यांचं कसं चाललं आहे चपराशी झालो तरीही पुन्हा येईन. आपले मिंधे त्यांच्या मागे दाढी खाजवत फिरत आहेत. दाढी खाजवणारे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार, महाराष्ट्र तुमच्या डोळ्यांदेखत लुटला जातो आहे तरीही मिंधे दिल्लीची चाकरी करत आहेत. हे काय बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार? आमच्या छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली होती. त्या सूरतेचे दोघेजण महाराष्ट्र लुटत आहेत हे मिंधे पाहात आहेत. तरीही तुम्ही शांतपणे पाहताय हे बाळासाहेबांचे विचार?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.