Uttar-Pradesh Assembly Election Live Updates: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पार पडली असून असून पंजाब वगळता चार राज्यांमध्ये भाजपा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चारही राज्यांमध्ये भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश निकालानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळालेले आहे. काँग्रेसला मात्र उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला असून जनतेने प्रियंका गांधी यांना नाकारलं आहे. समाजवादी पक्षाने मात्र भाजपाला चांगली लढत दिल्याचं दिसत आहे. मात्र सत्तेत येण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.

Live Updates

UP Assembly Election Result 2022 Live News : उत्तर प्रदेशात योगी इतिहास रचण्याच्या तयारीत; सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम करणार

07:42 (IST) 10 Mar 2022
मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. CAPF, PAC आणि पोलिसांना मतमोजणी केंद्रांवर तैनात करण्यात आलं आहे.

07:40 (IST) 10 Mar 2022
सकाळी ८ वाजता मतमोजणीला होणार सुरुवात

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे

उत्तर प्रदेश निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. भाजपाला अनेक मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देत इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. यामध्ये ओबीसी नेते स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंग चौहान यांचाही समावेश होता. त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करताना योगी सरकारवर आपल्या समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप केला.

समाजवादी पक्षाने राष्ट्रीय लोक दल, भारतीय समाज पार्टी आणि अपना दल (क) यांच्यासोबत हातमिळवणी केली होती.