05 March 2021

News Flash

समजून घ्या सहजपणे : घर विकत घ्यायची हीच संधी आहे का?

घर खरेदी करावं की भाडेतत्त्वावर राहावं ?

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मालमत्तांच्या किंमतीत मोठी घसरणही झाली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी आपले व्याजदरही कमी केले आहे. अशा परिस्थितीत ज्यांना आपलं स्वत:चं पहिलं घर खरेदी करायचं आहे किंवा ज्यांना मोठं घर घ्यायचं आहे ते नक्कीच याकडे आकर्षित होऊ शकतात. परंतु ज्या काळात आपल्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर मोठा परिणाम झाला असेल किंवा मालमत्तांच्या किंमती कमीच राहण्याची शक्यता असेल अथवा भाड्यातून मिळणारं उत्पन्नही कमी होत असेल अशा परिस्थितीत थोडा काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. महासाथीच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्य़ा परिस्थितीत कोणताही अतिरिक्त बोझा न घेता तरलता टिकवून ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे.

घर खरेदी करावं की भाडेतत्त्वावर राहावं ?

गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे अनेक उद्योगांची आर्थिक घडीही विस्कटली. याचाच निश्चित फटका कामगारवर्गाला बसला आहे. परंतु सध्या ज्यांच्याकडे नोकरी आणि वेतन कायम आहे आणि ज्याच्यावर परिणामही झाला नाही, त्यातच बऱ्याच कालावधीपासून ज्यांना आपलं घर घेण्याचीही तीव्र इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालावधी उत्तम असू शकतो. जर मागील चार पाच वर्षातील किंमतींमधील सुधारणा आणि व्याजदरामधील घट पाहिली तर हे अशा बाबी या निर्णयाला अनुकूल ठरणाऱ्या आहेत असंच म्हटलं पाहिजे.

“बऱ्याच कालावधीपासून घर खरेदीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही अनुकूल वेळ आहे. जवळपास गेल्या १५ वर्षांत प्रथमच रियल इस्टेट क्षेत्रानं बाजाराचं रूप बदललं आहे. सध्या एखाद्या ग्राहकाला बार्गेन करून ठरलेल्या किंमतीपेक्षाही कमी दरात घर मिळू शकतं,” असं मत लीअर फोरस या रिअल इस्टेट रिसर्च फोरमचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज कपूर यांनी व्यक्त केलं.

सध्या ज्यांना कोणत्याही आर्थिक ताणतणावाचा सामना करावा लागत आहे त्यांच्यासाठी परिस्थिती सामान्य होईपर्यंत घर खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलणं केव्हाही हिताचं ठरू शकतं. तर अशा परिस्थितीत त्यांनी भाडेतत्त्वावर राहणं किंवा भाड्याबाबत निगोशिएट करणं केव्हाही उत्तमच आहे. करोनाच्या महासाथीमुळे अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात ताण आहेच. वाढती बेरोजगारी आणि शहरांमधून होणारं स्थलांतर यामुळे भाड्याचे दर आणि मालमत्तांच्या किंमतींवर दबाव कायम राहू शकतो, त्यामुळे भाड्यानं राहणं हा एक स्मार्ट निर्णय असू शकतो.

खरेदी विरूद्ध भाडेतत्व – कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात?

जे घर विकत घेऊ शकतात, त्यांनी ते घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे. आपल्या पसंतीच्या ठिकाणी असलेली मालमत्ता पुढील काही वर्षांमध्ये कमीतकमी समान किंमतीवर उपलब्ध असेल याचा विचार नक्कीच करणं आवश्यक आहे. जाणकारांच्या मते जर एखादं घर भाडेतत्त्वार घेताना त्याचं भाडं जर ३.५ टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर त्यानं घर विक घेतलं पाहिजे, सुरक्षेच्या भावनेव्यतिरिक्त ती भविष्यातील पूंजींदेखील ठरू शकते. “जर खरेदी करण्यात येणाऱ्या मालमतेमधून मिळणारं भाडं हे २य५ टक्क्यांपेक्षा कमी आहे तर आपल्याला भाडेतत्त्वावरच राहणं योग्य आहे. सद्य परिस्थिती पाहता बेरोजगारी आणि शहरांमधून होणारं स्थलांतर पाहतं उत्पन्न आणखी कमी होईल,” असं कपूर यांनी सांगितलं.

उदाहरणार्थ जर विचार केला तर आपण १ कोटी रुपये किंमतीचं घर विकत घेत असाल आणि आपण ८० लाखांचे कर्ज घेतले तर. २० वर्षांच्या कालावधीसाठी कर्जासाठी ७.५ टक्के व्याजदरानं महिन्याला जवळपास ६५ हजार रूपये इतका ईएमआय भरावा लागेल. तर तुमचा वार्षिक ईएमआय हा ७ लाख ८० हजार इतका असेल.

गुतवणुकीसाठी मालमत्ता घ्यावी का?

भाडे उत्पन्नाचे घटते प्रमाण, गेल्या १० वर्षात कमी भांडवल मूल्य आणि रिअल इस्टेट ही तरल गुंतवणूक नसल्यामुळे किरकोळ गुंतवणुकदारांनी केवळ गुंतवणुकीसाठी रिअल इस्टेट खरेदी न करणे शहाणपणाचे ठरेल. उच्च उत्पन्न असलेले गुंतवणुकदार सध्याच्या काळात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी जाऊ शकतात आणि २०-३० टक्के सवलतीत मालमत्ता मिळवूही शकतात. परंतु किरकोळ गुंतवणुकदांनी ते पैसे अधिक लिक्विड अ‍ॅसेटमध्ये ठेवणं फायद्याचं ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 10:03 pm

Web Title: explained should you buy a house now india jud 87
Next Stories
1 समजून घ्या : हार्ट अ‍टॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्टमधला नक्की फरक काय?
2 भारत-चीन संघर्ष : लडाख सीमेवर भारताने तैनात केले ‘टी-९० भीष्म’ टँक; जाणून घ्या जगातील या सर्वोत्तम रणगाड्यांबद्दल
3 समजून घ्या सहजपणे : दीपिका, सारा, श्रद्धा आणि रकुल यांना एनसीबीने का समन्स बजावले?
Just Now!
X