व्हॉट्सअ‍ॅपने ४ जानेवारी रोजी नव्या सेवाशर्तींसंदर्भात पहिल्यांदा जाहीर खुलासा केला. त्यानंतर तीनच दिवसांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून चर्चेत असणाऱ्या स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांनी एक ट्वीट केलं. यामध्ये त्यांनी केवळ दोन शब्दांमध्ये सिग्नल वापरण्याचं आवाहन केलं होतं. यूज सिग्नल या दोन शब्दांचं ट्वीट प्रचंड व्हायरल झालं. याचा परिणाम असा झाला की सिग्नल अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या अचानक वाढू लागली. भारतामध्ये हे अ‍ॅप टॉप ट्रेण्डिंग अ‍ॅप्सच्या यादीत अव्वल स्थानी आलं. या संदर्भात सिग्नलनेच ट्विटरवरून ९ जानेवारी रोजी माहिती दिली. भारतच नाही तर जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिनलॅण्ड, हाँगकाँग आणि स्वित्झरलॅण्डसारख्या देशांमध्येही हे अ‍ॅप सर्वाधिक चर्चेतील अ‍ॅप ठरल्याचं कंपनीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय म्हणून टेलिग्रामचा विचार करावा असं सांगणारी मंडळीही सोशल नेटवर्किंगवर दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षातज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी सध्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि सिग्नल या तिन्ही अ‍ॅपची तुलना केली आहे. या तिन्ही अ‍ॅपमध्ये फरक दाखवणारा हा तक्ता…

More than average rainfall this year Know the weather forecast of monsoon rains
Monsoon Season Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस… जाणून घ्या मोसमी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
March 2024, March 2024 Records Hottest Temperatures, March 2024 Records Hottest in 175 Years, hottes march 2024 globally, Global Average Temperatures Up by 1.35°C, heat, summer march, summer season
यंदाचा मार्च आजवरचा सर्वांत उष्ण; पश्चिमी झंझावाताचा भारताला दिलासा
Will climate change be key issue in this years election What do youth think
विश्लेषण : यंदाच्या निवडणुकीत हवामान बदल हा कळीचा मुद्दा ठरेल का? तरुणाईला काय वाटते?
Water reserves in the country at 35 percent Where is the worst situation
देशातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर… कुठे आहे सर्वाधिक बिकट स्थिती?


या सर्व तुलनेनंतर अ‍ॅड प्रशांत माळी यांनी सिग्नल हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामपेक्षा वापरण्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचेही म्हटले आहे. टेलिग्राम हे रशियन बनावटीचे असल्याने त्यावर सायबर हल्ले होण्याची सतत भीती असते असंही माळी सांगतात. तर सिग्नलची निर्मिती हीच ओपन सोर्स म्हणजेच सर्व समावेश पद्धतीची संवाद यंत्रणा उभरण्याच्या चळवळीमधून झाल्याने या अ‍ॅपच्या निर्मितीमध्ये युझर्स म्हणजेच वापरकर्त्यांंना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सिग्नल हे इतर दोन्ही अ‍ॅपच्या तुलनेत उजवे ठरत असल्याचे या तुलनेमधून दिसून येतं.

(टीप > लोकप्रभाचा मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा)