News Flash

एका SMS वर लिंक करु शकता Aadhaar आणि PAN; जाणून घ्या नेमकं कसं?

आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाल्याने अनेकांनी ट्विटरवरुन चिंता व्यक्त केलीय

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी सरकारने दिलेली डेड लाइन आज संपत आहे. त्यामुळेच अद्याप आधार आणि पॅन लिंक न करुन घेतलेल्यांच्या आयकर विभागाच्या साईटवर उड्या पडत असल्याचं चित्र दिसत आहे. ३१ मार्च आधी आधार आणि पॅन लिंक न केल्यास आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड वापरताना अडचणी निर्माण होण्याच्या भीतीने अनेकांनी आज शेवटच्या दिवशी आयकर विभागाच्या साईटकडे मोर्चा वळवला आहे. मात्र साईटवरील ट्रॅफिक वाढल्याने आयकर विभागाचा सर्व्हर कॅश झाला आहे. त्यामुळेच अनेकांना आयकर विभागाची साईटच दिसत नसून हे पेज काम करत नाही असा संदेश दाखवला जात आहे. ट्विटरवरुन अनेकांनी यासंदर्भात तक्रारही केलीय.

पॅन आणि आधार लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सर्व्हरमध्ये अडचण असल्याचं, साईट सुरु होऊ शकत नाही असे संदेश स्क्रीनवर दिसत आहेत. अनेकांनी यासंदर्भातील स्क्रीनशॉर्ट शेअर करत आता साईटच बंद असल्यावर आम्ही हे काम आजच्या आज कसं करायचं असा प्रश्न सरकारी यंत्रणांना विचारला आहे. आयकर विभागाच्या ट्विटर हॅण्डलसोबतच अनेकांनी युआयडी म्हणजेच आधारच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुनही हे प्रश्न विचारलेत. अनेकांनी तर दोन्ही माहिती जर सरकारकडे आहे तर त्यांनी त्या लिंक करुन घ्याव्यात, सर्वसामान्यांना का वेठीस धरलं जात आहे असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी आयकर विभागाची साईट कधीच सुरु नसते अशी तक्रार ट्विटरवरुन केलीय. या तक्रारींमुळेच PANcard आणि Aadhaar हे दोन विषय टॉप ट्रेण्डमध्ये आलेत. इतर काही पर्याय आहे का आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी अशी विचारणा ट्विटरवर अनेकांनी केलीय. तर शेवटच्या दिवशी आधार आणि पॅन लिंक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी SMS चा मार्ग उपलब्ध आहे. त्याचबद्दल जाणून घेऊयात…

जाणून घ्या >> Aadhaar आणि PAN लिंक करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस; न केल्यास पगारही रोखला जाऊ शकतो

कुठे पाठवायचा एसएमएस?

५६७६७८ किंवा ५६१६१ या क्रमांकावर आपल्या नोंदणीकृत म्हणजेच आधार आणि पॅनशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरुन एसएमएस पाठवून आधार आणि पॅन लिंक करता येईल.

काय मेसेज पाठवायचा?

तुमचा १२ आकडे असणारा आधारकार्ड क्रमांक आणि १० आकडे असणारा पॅन कार्ड क्रमांक एसएमएसवरुन आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी आवश्यक असणार आहे. आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी खालील फॉरमॅटमध्ये मेसेज टाइप करावा…

UIDPAN<SPACE><12 Digit Aadhaar Number><SPACE><10 Digit PAN>

म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर

UIDPAN 100023456789 XXYZ0123X असा मेसेज पाठवल्यास यामधील 100023456789 हा आकडा आधार कार्ड क्रमांक असेल तर XXYZ0123X हा आकडा पॅन क्रमांक असेल.

आधार आणि पॅन लिंक करताना दोन्ही ठिकाणी तुमचं नाव, जन्म तारीख आणि इतर माहिती बरोबर आहे की नाही हे तपासून पहावे.

‘पॅन’ आणि ‘आधार’ लिंक न केल्यास होणारे नुकसान

जर तुम्ही ३१ मार्च २०२१ पर्यंत आपल्या आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते. पॅन कार्ड रद्द झाल्यास तुम्हाला पुन्हा पॅन कार्ड बनवण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसणार. तुम्ही रद्द झालेल्या पॅन क्रमांकाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल केल्यास तेही मान्य होणार नाही. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर पगारही रोखला जाऊ शकतो. म्हणजेच पॅन कार्ड रद्द होण्यामुळे पगार खात्यात जमा होऊ शकणार नाही. कारण कंपन्या कर मर्यादेच्यावर असणाऱ्या पगारावर टीडीएस कापून घेतात. मात्र, पॅन क्रमांक रद्द झाल्यास त्यांना हे करता येणार नाही. ज्यामुळे पगारावर संकट येऊ शकते. त्यामुळे जर पॅन आणि आधार क्रमांक दोन्हीही असतील तर त्याला लिंक करुन घेणेच हिताचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 2:32 pm

Web Title: pan and aadhaar can also be linked through sms scsg 91
Next Stories
1 शरद पवारांना झालेलं Gallbladder चं दुखणं काय आहे? जाणून घ्या…
2 समजून घ्या : संचारबंदी आणि जमावबंदीमध्ये काय फरक असतो? दोषी ठरल्यास शिक्षा काय?
3 समजून घ्या : एक एप्रिलपासून बदलणार CTC, ग्रॅच्युइटी, PF आणि In Hand Salary चे नियम
Just Now!
X