Words Etymology: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे दुबईत गेल्या रविवारी निधन झाले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना परवेज मुशर्रफ यांनी कारगिल युद्धाची आगळीक केली होती. भारतीय सैनिकांनी कारगिल युद्धात असीम शौर्य दाखवले होते. तर याच युद्धाला मुशर्रफ यांचे कट कारस्थान म्हणून ओळखले जाते. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मुशर्रफ यांनी कारगिलचे युद्ध छेडले होते. आपले आत्मचरित्र “इन द लाइन ऑफ फायर” यामध्ये त्यांनी या युद्धाबाबत खुलासे केले होते.

१९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, परवेझ मुशर्रफ हे बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणातही फरार घोषित करण्यात आले होते. ओसामा बिन लादेनला पाकिस्तानी भूमीवर आश्रय देण्याचा त्यांचा डाव असल्याचेही म्हंटले जाते त्यांचे भारतासह द्वेषापूर्ण संबंध असूनही भारतीय कलाकार व खेळाडूंचे ते फॅन असल्याचे म्हंटले जाते.

परवेझ मुशर्रफ यांच्या मृत्यूच्या अहवालात वापरलेल्या विशेषणांविषयी अमिताभ रंजन यांनी इंडियन एक्सप्रेसच्या लेखात काही खास खुलासे केले आहेत. ते म्हणतात की एका लेखात परवेझ मुशर्रफ यांनी जानुस चेहऱ्याचा वारसा मागे सोडला आहे असे लिहिण्यात आले होते तर दुसर्‍या लेखाचे शीर्षक होते “हुकूमशहापासून पारियापर्यंत अनेक भूमिका साकारणारा माणूस”.या दोन्ही विशेषणांची व्युत्पत्ती खास आहे.

ग्रीक आणि रोमन पौराणिक कथांमध्ये जानुस-समान या विशेषणाचा संदर्भ आढळून येतो. जॅनस हा रोमन देव होता (यावरूनच वर्षाचा पहिला महिना जानेवारी असे नाव देण्यात आले). इतकंच नाही तर पोर्टल्स, गेटवे आणि दरवाजे असेही त्याचे अर्थ आहे. भूतकाळ आणि भविष्य दोन्ही पाहण्याच्या त्याच्या सामर्थ्याचे चित्रण करण्यासाठी विरुद्ध दिशेने पाहणाऱ्या दोन चेहऱ्यांनी त्याचे प्रतिनिधित्व केले गेले आहे.

जानूस, जानूस -फेस या शब्दांचा अर्थ दोन दिशेने पाहणे असा असू शकतो. यात बहुमुखीपणा किंवा दुहेरी दृष्टीची क्षमता दर्शविणारा सकारात्मक अर्थ असू शकतो किंवा फसव्या अर्थाने नकारात्मक संदर्भ देखील असू शकतो.

ग्रीक महाकाव्य द ओडिसीमध्ये, जानूस या शब्दाचा अर्थ बघताना दुसरा एक शब्द समोर आला तो म्हणजे सायक्लोपीन. कपाळाच्या मध्यभागी एक गोल (चक्र) डोळा (ऑप्स) असलेल्या राक्षसासाठी सायक्लोपीन हे विशेषण येते, ज्याचा अर्थ ‘प्रचंड’ असा होतो. याशिवाय हा शब्द आर्किटेक्चरमध्ये वापरला जातो जेथे सिमेंटशिवाय दगडांचे मोठे ब्लॉक एकमेकांवर ठेवले जातात.

तिसरा शब्द म्हणजे आर्गस, जो शंभर डोळे असलेला राक्षस होता, जो सदैव राखणदार म्हणून काम करत होता. म्हणून, आर्गस-डोळ्याचा अर्थ जागृत, सदैव जागृत आणि निरीक्षण करणारा असा होता.

चौथा शब्द हरक्यूलिस, ग्रीको-रोमन नायक, त्याच्या पत्नी आणि मुलांची हत्या करण्यासाठी तपश्चर्या करत असताना, त्याच्या वीरकथांपैकी एक म्हणजे नऊ डोके असलेल्या राक्षसाची हत्या करणे. या राक्षसाची खासियत म्हणजे त्याचे एक डोके कापले गेल्याने त्याच्या जागी दोन नवीन डोकी येत असत.

पाचवा शब्द म्हणजे हायड्रा-हेडेड म्हणजे नष्ट करणे. हा शब्द एखाद्या स्थितीला किंवा वाईटाला लागू केला जातो, याचा अर्थ अशी समस्या जी का ठिकाणी संपल्यास दुसऱ्या ठिकाणी सुरु होते. याचा अर्थ अनेक केंद्रे किंवा शाखा असणे असाही होऊ शकतो.

सहावा शब्द म्हणजे परिया, हा शब्द तमिळ ‘परैयार’ चे इंग्रजी रूप आहे, जो पारंपारिक ढोलक वादकांसाठी वापरला जातो. तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हे लोक हलाखीच्या परिस्थितीत राहत होते. आज ते राजकीयदृष्ट्या शक्तिशाली गट आहेत. त्या अर्थाने, परिया म्हणजे बहिष्कृत, समाजाने नाकारलेली व्यक्ती.

हे ही वाचा<< विश्लेषण: तुमचे आवडते क्रिएटर्स आता वस्तू का विकणार नाहीत? या निर्णयामागील ‘DE Influencing’ ट्रेंड काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही शब्दांचे जसे दुहेरी अर्थ असतात. जगन्नाथ या परोपकारी देवाच्या नावापासून व्युत्पन्न झालेला जुगरनॉट हा शब्द उपरोधिकपणे, चिरडणारी, क्रूर शक्ती यासाठी वापरला जातो. इंग्रजांनी स्वामित्व स्वीकारलेल्या भूमीतील लोकांची आणि समाजाची जाणीव कशी करता आली नाही यासाठी हा शब्द वापरला जातो.