– अनीश पाटील

सायबर खंडणीच्या माध्यमातून सामान्यांना फसवण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. कर्ज देण्याच्या नावाखाली मोबाईल, संगणकातील माहिती चोरून त्याचा वापर करून खंडणी मागण्याचे प्रकार आता भारतातही नियमीत घडत आहेत. डेटा थेफ्ट, म्हणजेच माहितीची चोरी करून त्यामाध्यमातून घडणारे गुन्हे या संकल्पनेवर हॉलिवुडमध्ये अनेक सिनेमेही बेतले आहेत. व्यावसायिक कंपन्यांसोबत सरकारी विभागांतील सर्व्हर हॅक केल्यास सुरक्षा व्यवस्थेची कशी दाणादाण उडू शकते, याचे चित्र या चित्रपटांतून उभे करण्यात आले आहे. पूर्वी कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत मर्यादीत असलेला हा प्रकार आता सामान्य नागरिकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. तंत्रज्ञानातील प्रगती व जागतिकीकरणानंतर भारतातही सायबर खंडणीच्या गुन्हे घडण्यास सुरूवात झाली.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

कॉर्पोरेट कंपन्यांकडे खंडणी मागण्याची प्रकरणे कोणती?

मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीत सायबर खंडणीचा खळबळजनक प्रकार २००५ मध्ये घडला होता. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिका-याला (सीईओ) धमकीचा मेल आला होता. हा मेल पाठवणा-याने कंपनीशी संबंधित महत्त्वाची व गोपनीय माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. शिवाय कंपनीची महत्त्वाची माहिती हाती असल्याची खात्री पटावी, यासाठी हा संपूर्ण माहिती एका संकेतस्थळावर साठवून (सेव्ह करून) त्याच्या संकेतस्थळाचा दुवा (लिंक) या मेलवर पाठवली होती. सर्व माहिती प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकण्याची धमकी देऊन माहिती चोरणाऱ्याने ६४ हजार अमेरिकन डॉलर्सची ( सुमारे ५१ लाख रुपये) मागणी केली होती. शेकडो- हजारो कोटी रुपयांचे व्यवहार करणा-या कंपन्यांसाठी ही रक्कम फार मोठी नाही, पण एकदा अशा प्रकारची खंडणी दिली की माहिती चोरणारी व्यक्ती वारंवार पैशाची मागणी करण्याची भीती असल्याने या कंपनीच्या सीईओंनी तत्काळ मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली. तपासात आरोपी हा त्याच कंपनीत काम करत असल्याचे उघडकीस आले. पूर्वी कॉर्पोरेट कंपन्यांपर्यंत मर्यादीत असलेली सायबर खंडणी आता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. यातही नागरिकांच्या गोपनीय माहितीचाच वापर केला जात आहे.

जाळ्यात कसे ओढले जाते?

माहितीची चोरी करण्यापासून या गुन्ह्यांची सुरूवात होते. सध्या विविध ऑनलाईन ॲपव्दारे नागरिकांना कमी कालावधीचे ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहीत करून त्यांची गोपनीय माहिती मिळवून धमकावण्याचे, खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत. आरोपी वेगवेगळया आकर्षक कर्जांचे प्रस्ताव देतात. कमी व्याजदर ठेवून कमी वेळेत कर्ज मंजूर करुन देतो अशा प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांना ऑनलइन कर्ज दिले जाते. नागरिकांना कर्ज घेण्याकरीता कंपनीचे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगून त्यांच्या मोबाइलमधील छायाचित्रे, संपर्क क्रमांक, चित्रफीती अशी महत्त्वपूर्ण माहिती संबंधित कंपनीस शेअर करण्याचे बंधन ठेवूनच नागरिकांना कर्ज मंजूर करण्यात येते. याशिवाय संकेतस्थळांचा दुवा पाठवून त्याद्वारेही माहिती मिळवली जाते.

खंडणी कशी मागितली जाते?

सध्या विविध ऑनलाईन ॲपव्दारे नागरिकांना कमी कालावधीचे ऑनलाईन कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहीत करून त्यांची गोपनीय माहिती मिळवून धमकावण्याचे, खंडणी प्रकार घडत आहेत. तसेच अश्लील छायाचित्रांच्या माध्यमातूनही धमकावण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने आरोपी दूरध्वनी करून पीडित व्यक्तीविरोधात अश्लील छायाचित्राप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे सांगून याप्रकरणी तुम्हाला अटक होऊ शकते, असा धाक दाखवला जातो. तसेच संबंधीत छायाचित्र व चित्रीकरण समाज माध्यमांवरून हटवण्यासाठी खंडणी मागितली जाते. अल्पवयीन पीडित मुलींना अथवा मुलांना संबंधीत छायाचित्र त्यांच्या पालकांना पाठवण्याची धमकी दिली जाते. पीडित व्यक्तीच्या भीतीचा वापर करून त्याला धमकावले जाते. अशा पद्धतीने सुरूवातील थोडी रक्कम मागितली जाते. पण ही खंडणीची रक्कम हळूहळू वाढून अनेक प्रकरणांमध्ये लाखो रुपये उकळण्यात आले आहेत.

सायबर खंडणीची प्रकरणे कोणती?

शिवडीतील कापड व्यावसायिकाच्या मोबाइलमधील खासगी छायाचित्र मिळवून त्याच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार घडला होता. आरोपीच्या धमकावण्याला घाबरून दीड वर्षांपासून व्यावसायिकाने ३० लाख रुपये त्याच्या विविध खात्यामध्ये जमा केले. याप्रकरणी व्यावसायिकाच्या पत्नीने शिवडी पोलिसांकडे तक्रार केली असून त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीसोबतचे खासगी छायाचित्र समाज माध्यमांवर अपलोड करण्याची धमकी देऊन आरोपीने त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. याबाबत पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. आरोपीला संबंधीत छायाचित्र कसे मिळाले, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. नुकतीच भांडूप येथेही अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून त्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. या छायाचित्राच्या साहाय्याने तिच्याकडून खंडणी उकळण्यात आली होती. मुलीच्या तक्रारीनंतर अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

गुन्ह्यांमध्ये आकडेवारी काय सांगते?

मुंबईत गेल्यावर्षी अश्लील सेक्सटॉर्शनचे ७८ गुन्हे दाखल झाले आहेत. कर्जाच्या नावाखाली विश्वासात घेऊन खंडणी उकळण्याचे ११६ गुन्हे दाखल झाले आहेत. मॉर्फिंग, बनावट प्रोफाईल तयार केल्याप्रकरणी १४१ गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय राज्यभरात हजारांहून अधिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्यात आहेत. तक्रारदारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय अनेकजण बदनामीच्या भीतीने तक्रारही करत नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

हेही वाचा : ‘स्टेट बँके’तील सायबर फसवणुकीत तिप्पट वाढ! माहितीच्या अधिकारांतर्गत तपशील समोर

स्वतःला सुरक्षीत कसे ठेवता येईल?

मोबाइलमधील छायाचित्रे, संपर्क क्रमांक, चित्रफीती अशी महत्त्वपूर्ण माहिती संबंधित कंपनीस शेअर करण्याचे बंधन ठेऊनच नागरिकांना कर्ज मंजूर करण्यात येते. त्यामुळे कोणतेही अनोळखे अॅप्लिकेशन डाऊनलोड करत करताना कोणत्या परवानग्या मागितल्या जात आहेत, ते जागरूकतेने पाहणे आवश्यक आहे. माहिती वापरण्याचे बंधने स्वीकारू नका. कोणत्याही अनधिकृत ॲपव्दारे कर्ज घेऊ नका व कमी कालावधीच्या ऑनलाइन कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका. कोणाबाबत असा प्रकार घडल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच अनोळखी अॅप्लिकेशन मोबइलमध्ये डाऊनलोड करू नका. समाज माध्यमांवर अनोळखी व्यक्तीशी बोलताना काळजी घ्या, विशेषतः अश्लील चॅटींग अथवा व्हिडिओ कॉल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तींशी संपर्क साधू नका. कोणत्याही प्रकारे अशा घटनांना बळी पडल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा.