– अन्वय सावंत

प्रीमियर लीग (पूर्वीची इंग्लिश प्रीमियर लीग) ही जगातील सर्वांत लोकप्रिय स्थानिक फुटबॉल स्पर्धा. या स्पर्धेवर अनेक वर्षे मँचेस्टर युनायटेडची मक्तेदारी होती. सर ॲलेक्स फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेडने विक्रमी १३ वेळा प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले होते. मात्र, फर्ग्युसन यांनी २०१२-१३च्या हंगामानंतर निवृत्ती घेतली आणि तेव्हापासून युनायटेडची कामगिरीही खालावली. त्याच वेळी युनायटेडचे ‘नॉयझी नेबर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मँचेस्टर सिटीने इंग्लिश फुटबॉलवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. सिटीने नुकतेच सलग तिसऱ्यांदा आणि गेल्या सहा वर्षांत पाचव्यांदा प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले. आता सिटीला एकाच हंगामात तीन मोठ्या स्पर्धांचे जेतेपद खुणावते आहे. सिटीचा संघ युनायटेडच्या छायेतून कसा बाहेर पडला आणि इंग्लिश फुटबॉलवर कशा प्रकारे वर्चस्व प्रस्थापित केले, याचा आढावा.

shubhaman gil
ट्वेन्टी-२० विश्वचषक महत्त्वाचाच, पण तूर्तास ‘आयपीएल’वर लक्ष केंद्रित! गिलचे वक्तव्य
Candidates winner D Gukesh reaction that Viswanathan Anand sir guidance is valuable
विशी सरांचे मार्गदर्शन मोलाचे! ‘कँडिडेट्स’ विजेत्या गुकेशची प्रतिक्रिया; मायदेशात जंगी स्वागत
Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर

मँचेस्टर सिटीचा इतिहास काय?

युनायटेडचे माजी प्रशिक्षक ॲलेक्स फर्ग्युसन यांनी एका मुलाखतीत मँचेस्टर सिटीला ‘नॉयझी नेबर्स’ असे संबोधले होते. सिटीचा संघ मैदानावर युनायटेडला लढा देऊ शकत नाही असे त्यांना दर्शवायचे होते. १८८० पासून अस्तित्वात असलेल्या मँचेस्टर सिटी संघाला १३० वर्षांत (२०१० सालापर्यंत) ‘इंग्लिश फर्स्ट डिव्हिजन’ किंवा प्रीमियर लीगचे जेतेपद केवळ दोन वेळा मिळवता आले होते. मात्र, २००८मध्ये ‘अबू धाबी युनायटेडने ग्रुप’ने मँचेस्टर सिटी संघाची मालकी मिळवली आणि या संघाचे रुपडेच पालटले.

‘अबू धाबी युनायटेडने ग्रुप’ने सिटीची मालकी मिळवल्यानंतर काय घडले?

या ग्रुपने मोठ्या किमतीत कार्लोस टेवेझ, रॉबिनियो आणि एमॅन्युएल ॲडेबायोर यांसारख्या नामांकित खेळाडूंना खरेदी केले. मग डिसेंबर २००९मध्ये रॉबर्टो मॅन्चिनी यांची प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर सर्जिओ अग्वेरो, याया टोरे आणि डेव्हिड सिल्वा यांसारख्या खेळाडूंनाही सिटीने करारबद्ध केले. याचा त्यांना २०११-१२च्या हंगामात फायदा झाला आणि मॅन्चिनी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटीने प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले. पुढे मॅन्चिनी यांना हटवून मॅन्युएल पेलेग्रिनी यांची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. २०१३ ते २०१६ या कालावधीत पेलेग्रिनी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटीने एकदा प्रीमियर लीग जिंकली. मात्र, २०१६मध्ये पेलेग्रिनी यांच्या जागी पेप ग्वार्डियोला यांची सिटीच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आणि सिटीची कामगिरी अधिकच बहरली.

सिटीच्या यशात ग्वार्डियोला यांची भूमिका किती महत्त्वाची?

ग्वार्डियोला यांची फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांमध्ये गणना केली जाते. त्यांनी यापूर्वी बार्सिलोना आणि बायर्न म्युनिक या नामांकित संघांचे प्रशिक्षकपद अतिशय यशस्वीरीत्या भूषवले होते. मात्र, प्रीमियर लीग सर्वांत आव्हानात्मक स्थानिक फुटबॉल मानली जात असल्याने ग्वार्डियोला यांना या स्पर्धेत यश मिळवणे सोपे जाणार नाही असे बोलले जात होते. मात्र, त्यांनी आपल्याला हवी त्याप्रमाणे संघाची बांधणी केली आणि दुसऱ्याच वर्षी (२०१८-१८मध्ये) प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावले. त्यांना संघमालकांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळाला. आपल्या खेळण्याच्या शैलीला साजेसे नसलेल्या खेळाडूंऐवजी नवे खेळाडू खरेदी करण्याची ग्वार्डियोला यांची मागणी संघमालकांनी पूर्ण केली. परिणामी ग्वार्डियोला यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात सिटीने पाच वेळा प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले. तसेच मँचेस्टर युनायटेडनंतर (२००६-०७, २००७-०८, २००८-०९) सलग तीन वेळा प्रीमियर लीग जिंकणारा सिटी हा पहिलाच संघ ठरला. गेल्या काही हंगामांत लिव्हरपूलने, तर यंदा आर्सेनलने सिटीला झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोक्याच्या क्षणी ग्वार्डियोला यांनी आखलेल्या अचूक योजनांमुळे सिटीने सर्वोत्तम कामगिरी केली. सिटीने आता प्रीमियर लीगचे जेतेपद मिळवले असून त्यांनी ‘एफए चषक’ आणि ‘चॅम्पियन्स लीग’च्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे. या स्पर्धाही जिंकल्यास सिटीचा हा संघ फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम संघांपैकी एक मानला जाईल.

कोणत्या खेळाडूंचे सर्वाधिक योगदान?

मँचेस्टर सिटीच्या संघात तारांकित खेळाडूंचा भरणा आहे. एडरसन हा सिटीचा गोलरक्षक एखाद्या मध्यरक्षक किंवा आक्रमणातील खेळाडूप्रमाणे चेंडू खेळवण्यात सक्षम आहे. सिटीचा बचावपटू रुबेन डियाझ जगातील सर्वोत्तम बचावपटूंपैकी एक मानला जातो. त्याचा साथीदार जॉन स्टोन बचावपटू असला, तरी चेंडू सिटीकडे असल्यास त्याला मध्यक्षकाप्रमाणे खेळण्याची ग्वार्डियोला यांनी सूचना केली आहे. हा प्रयोग यशस्वी ठरतो आहे. केव्हिन डीब्रूएने सध्या जगतील सर्वोत्तम मध्यरक्षक मानला जातो. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये रेयाल माद्रिदविरुद्धच्या उपांत्य फेरीत उत्कृष्ट गोल केला होता. त्याला कर्णधार एल्काय गुंडोगन आणि रॉड्री यांची उत्तम साथ लाभली आहे.

हेही वाचा : विश्लेषण : फुटबॉल गोलरक्षकांवर पेनल्टी शूटआउटमध्ये नवे निर्बंध कशासाठी? बदलामागची कारणे कोणती?

आघाडीच्या फळीत जॅक ग्रिलिश आणि बर्नार्डो सिल्वा चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, यंदा सिटीच्या यशात सर्वाधिक योगदान आघाडीपटू अर्लिंग हालँडचे राहिले आहे. यंदाच्या हंगामापूर्वी सिटीने हालँडला मोठ्या किमतीत खरेदी केले होते. त्याने हा विश्वास सार्थकी लावताना सर्व स्पर्धांत मिळून ५० सामन्यांत ५२ गोल केले आहेत. तसेच प्रीमियर लीगच्या एका हंगामात सर्वाधिक (३४) गोलचा अँडी कोल व ॲलन शियरर यांचा विक्रमही त्याने मोडला. त्याच्या समावेशामुळे सिटीचा संघ अधिकच मजबूत झाला असून त्यांना नमवणे हे अन्य संघांसाठी अशक्यप्राय आव्हान झाले आहे.