प्रत्येकाला आयुष्यात वाटतं की, आपल्याकडे एक चारचाकी असावी. मात्र सर्वांच्या खिशाला ते परवडणारं नसतं. त्यामुळे आपली स्वप्न मनात ठेवावी लागतात. त्यात जगावर आलेल्या करोना संकटामुळे ऑटो क्षेत्रात कच्चा मालाचा पुरवठा मंदावला आहे. त्यामुळे या वर्षात गाड्यांची मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती आहे. नव्या गाड्यांच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे लोकांचा कल जुन्या गाड्या खरेदीकडे आहे. मेट्रो शहरांमध्ये जुन्या गाड्या खरेदी करण्याला लोकं पसंती देत आहेत. CarDekho, Cars24 आणि Droom सारख्या ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्मवरुन मोठ्या प्रमाणात गाडी खरेदी केल्या जात आहेत. भारतातील जुन्या गाड्यांचा विचार करता ११ टक्क्यांच्या चक्रवाढ वाढीने २०२६ पर्यंत ८.३ दशलक्ष गाड्यांची विक्री होण्याची शक्यता आहे.

भारतातील वापरलेल्या कारची बाजारपेठ पाचव्या स्थानावर
भारतात वापरलेल्या गाड्यांना मोठी मागणी आहे. जगात वापरलेल्या कारच्या बाजारपेठेत भारत पाचव्या स्थानावर आहे. चीन, अमेरिका, जपान आणि जर्मनीनंतर भारताचा क्रमांक लागतो, असं रेडसीरने एका अहवालात म्हटलं आहे. CARS24-IPSOS अहवालानुसार, सध्या, भारतात दरवर्षी जवळपास ५ दशलक्ष वापरलेल्या कार विकल्या जात आहेत. देशातील वापरलेल्या कारची बाजारपेठ २०२५-२६ पर्यंत ७० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. करोना संकट, डिजिटलायझेशन, लोकसंख्या याचा विचार करता ही मागणी वाढण्याचा अंदाज बांधला जात आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

लोक नवीन गाड्यांपेक्षा वापरलेल्या गाड्या का निवडत आहेत?
जुन्या गाड्यांची किंमत नव्या गाड्यांच्या तुलनेत कमी असते. डिप्रेसिएशन, कर, आरटीओ नोंदणी, विमा पॉलिसी यामुळे जुन्या गाडी खरेदी करण्याकडे कल आहे, असं ग्रँट थॉर्नटन यांनी अहवालात म्हटलं आहे. येत्या चार वर्षात मेट्रो शहरांव्यतिरिक्त वापरलेल्या गाड्यांची मागणी ग्रामीण भागात ५५ टक्क्यांवरून ७० टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मेट्रो सिटीत ओला आणि उबेर सारख्या सेवा पुरवण्याऱ्या कंपन्यांमुळे गाड्या खरेदीत घट झाली होती. मात्र करोनामुळे खासगी गाडी खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे, असं ओएलएक्स क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

पहिल्यांदाच गाडी खरेदी करण्यांची संख्या वाढली
देशात पहिल्यांदाच गाडी खरेदी करण्याऱ्यांची संख्या २०२१ या वर्षात ८ ते १० टक्क्यांनी वाढली आहे. करोनामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मर्यादा आली आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी स्वत:चं वाहन असण्याकडे कल होता. त्यामुळे येत्या काही वर्षात कारच्या मागणीत वाढ होईल ओएलएक्स क्रिसिल अहवालात म्हटलं आहे.

आनंद महिंद्रा यांची कंपनी आणतंय जबरदस्त इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात पकडते ३०० किमीचा वेग

कोणत्या कंपनीकडून खरेदी-विक्री होत आहे?
स्टार्टअप कंपनी ड्रूम, कार देखो आणि स्पिनी या स्टार्टअपनुसार जुन्या गाड्या खरेदी विक्रीसाठी २०२१ हे वर्ष अपवादात्मक वर्ष ठरलं. या तिन्ही कंपन्यांचा एकत्रितपणे विचार केला तर १ अब्ज डॉलर्सची उलाढाल दिसून आली. तर कार्स २४ या ई कॉमर्स कंपनीने नोव्हेंबर २०२१ मध्ये ३.३ अब्ज डॉलर्सची उलाढाल केल्याचं दिसून आलं आहे. कंपनीने ४०० दशलक्ष डॉलर्स उभारल्याचं दिसत आहे. मागच्या पाच वर्षांच्या तुलनेत कार्स २४, कार देखो आणि स्पिन्नी यात मोठी गुंतवणूक दिसून आली आहे. गेल्या वर्षभरात तीन स्टार्टअप्सनी जगभरातील गुंतवणूकदारांकडून १.५ अब्जपेक्षा जास्त निधी उभारला आहे. ड्रूमने देखील आयपीओसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रं दाखल केली आहेत.

कार उत्पादक कंपनी किया देखील या क्षेत्रात प्रवेश करतंय
कोरियन कार निर्माता किया देखील २०२२ पर्यंत भारतात वापरलेल्या कार खरेदी विक्री सुरू करणार आहे. “आम्ही वापरलेल्या कारच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा विचार करत आहोत. २०२२ ला आमच्या गाड्या तीन वर्षांच्या होतील, तेव्हा वापरलेल्या कार व्यवसायासह रू करण्याची योग्य वेळ असेल. विशेषत: मोठ्या शहरांमध्ये ही योजना राबवणार आहोत,” किया इंडियाचे उपाध्यक्ष आणि विक्री प्रमुख हरदीप सिंग ब्रार यांनी सांगितलं. ऑटोकार इंडिया आणि ओएलएक्स ऑटोजने केलेल्या अभ्यासानुसार, सेल्टोसला यूव्ही सेगमेंटमध्ये सर्वोत्तम पुनर्विक्री मूल्य असल्याचे ठरवण्यात आले.

Hero HF Deluxe vs Bajaj CT 100: कोणती बाईक कमी किमतीत ८३ किमी मायलेज देते, वाचा

इलेक्ट्रिक कारचा शेअर वाढणार
इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. २०२३ पर्यंत इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं २० टक्क्यांपर्यंत वाढेल. जुन्या कार विक्रीमध्ये इलेक्ट्रिक कारचा वाट ५ टक्के असेल असं क्रिसिलनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

काय आव्हानं आहेत?
भारतीय बाजारपेठेत आतापर्यंत ३० हजाराहून अधिक डिलर्स आहेत. असं असलं तरी ४५ टक्क्यांहून अधिक कमिशन एजंट आणि दलाल आहेत. बहुतेक जण साइड बिझनेस म्हणून याकडे पाहतात. त्यामुळे कंपन्यांना असंघटित डिलर्स आणि ग्राहक-ते-ग्राहक विक्री करण्याऱ्यांशी स्पर्धा आहे, असं रेडसीर अहवालात म्हटलं आहे. ही आव्हानं असून देखील ग्राहक ऑनलाइन खरेदी विक्रीला पसंती देत आहेत.