भारतीय लष्कराने सिग्नल टेक्नोलॉजी एव्हॅल्युशन अँड एडॉप्शन ग्रुप (STEAG) सुरू केले असून, भारतीय लष्कराचे एक विशेष तंत्रज्ञान युनिट म्हणून ते काम करणार आहे. विशेष म्हणजे भविष्यातील तंत्रज्ञानावर हे युनिट आधारित असणार आहे. तसेच हे युनिट AI, 5G, 6G, मशीन लर्निंग, क्वांटम तंत्रज्ञान इत्यादींवर संशोधन करणार आहे. या युनिटच्या माध्यमातून भारतीय सैन्यासाठी मोबाईल ॲप्स, वेब इत्यादी विकसित केले जाणार आहेत. STEAG म्हणजे भविष्यकालीन युद्धासाठी सज्ज होत असलेल्या युद्धभूमीचा विचार करून तंत्रज्ञान विकसित करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यासाठी वायर्ड आणि वायरलेस सिस्टीमच्या संपूर्ण श्रेणीचा समावेश करणाऱ्या तंत्रज्ञानाला समर्थन देणे आवश्यक आहे.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास STEAG तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, ज्यामध्ये वायर्ड आणि वायरलेस तंत्रज्ञानासाठी संपूर्ण यंत्रणा तयार केली जात आहे. मोबाईल कम्युनिकेशन व्यतिरिक्त सॉफ्ट डिफाइंड रेडिओ, इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, 5G आणि 6G नेटवर्क, क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग इत्यादी विकसित केले जाणार आहे. यासाठी भारतीय लष्कर अकादमी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी भागीदारी करणार आहे. STEAG लाँच करताना हे हाय टेक युनिट तांत्रिक स्काऊंटिंग, मूल्यांकन, विकास, कोअर ICT उपायांचे व्यवस्थापन करणार आहे आणि वातावरणात उपलब्ध समकालीन तंत्रज्ञानाची देखभाल अन् सुधारणा करून वापरकर्ता इंटरफेसला पाठिंबा मिळवून देणार आहे, असेही भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सिग्नल टेक्नोलॉजी एव्हॅल्युशन अँड एडॉप्शन ग्रुप (STEAG) हा इलेक्ट्रॉनिक देवाणघेवाण, मोबाइल कम्युनिकेशन्स, सॉफ्टवेअर डिफाइन्ड रेडिओ, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, 5G आणि 6G नेटवर्क, क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या भविष्यकालीन संप्रेषण तंत्रज्ञानाचे संशोधन आणि मूल्यमापन करणार आहे. सध्याच्या क्षेत्राचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन लष्करी वापरासाठी शिक्षण, क्वांटम संगणक विकसित करणे हे STEAG चे उद्दिष्ट आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोल्युशन्सचा लाभ घेणे आणि शैक्षणिक, उद्योग यांच्या सहकार्याने चांगलं तंत्रज्ञान तयार करणे आवश्यक आहे,” असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचाः सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्याहून अधिक पडझड; नेमके कारण काय?

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी युद्धाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन सैन्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडियाच्या तत्त्वांशी संरेखित करून STEAG एकीकडे सशस्त्र दल आणि दुसरीकडे उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील उणिवा कमी करण्यास मदत करेल,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचाः गार्डन सिटी बंगळुरूत पाणीच नाही; तीव्र टंचाईमागे काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये ठरणार गेमचेंजर

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स उच्च श्रेणीतील संप्रेषण तंत्रज्ञान हे विकसित अर्थव्यवस्था अन् संशोधन परिसंस्था असलेल्या काही देशांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ते आत्मसाद केल्यास त्यांना अधिक स्वयंपूर्ण करणार आहेत. दळणवळण हा लष्करी ऑपरेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. युद्धक्षेत्रासाठी वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये उत्तम संप्रेषण तंत्रज्ञानाची बाजू आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी विविध घटकांना जोडण्याची क्षमता असणे हेसुद्धा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यास फायदेशीर ठरणार आहे,” असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चिनी सैन्य 6G तंत्रज्ञान अंगीकारत असून, भविष्यातील लष्करी सुधारणांमध्ये त्याचा महत्त्वाचा भाग लक्षात घेऊन भारतातही त्याला प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा आहे. 6G तंत्रज्ञानामुळे मानवरहित लष्करी मालमत्तेवर ऑपरेटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे नियंत्रण ठेवता येणार आहे. भविष्यातील संघर्षांमध्ये तंत्रज्ञान हे महत्त्वाची भूमिका बजावतील, असाही लष्कराला विश्वास आहे. ऑपरेशनदरम्यान युनिट्स आणि फॉर्मेशन्सना अखंड संप्रेषण समर्थन देण्यासाठी आधुनिक युद्धात नवीन उपकरणे समाविष्ट करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील अशी प्रगती आत्मसात करण्यासाठी भारतीय सैन्याने हे ग्राऊंड ब्रेकिंग तंत्रज्ञान आधारित युनिट STEAG तयार केले असून, ते डिजिटल डोमेनमध्ये त्याच्या क्षमतांना बळ देणारं ठरणार आहे,” असंही ते पुढे म्हणाले.