Bengaluru Water Crisis बंगळुरू शहरातील नागरिकांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी बंगळुरूमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची तुलना २०१५ ते २०१८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीशी केली आहे. असे म्हटले जाते की, पाण्यासाठी आणीबाणीसारखी परिस्थिती अनुभवणारे केपटाऊन हे जगातील पहिलेच शहर होते. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील एनर्जी अँड वेटलँड रिसर्च ग्रुपचे समन्वयक डॉ. टी. व्ही. रामचंद्र यांनी नुकतंच ‘द इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना बंगळुरू आणि केपटाऊन तुलनेबद्दल विचारण्यात आले. त्यांनी सांगितले की, जर शहराने पाण्याचा गैरवापर सुरू ठेवला, तर काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीपेक्षाही वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल.

केपटाऊन पाणी संकट

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहराला २०१५ ते २०१८ दरम्यान भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. २०१७ मध्ये या परिस्थितीने गंभीर स्वरूप घेतले होते. शहराच्या जलाशयांमध्ये पाण्याची पातळी कमी झाली होती, जलप्रकल्प कोरडेठाक पडले होते, धरणांमधील पाणीसाठयात घट झाली होती. शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे प्रशासनाला कठोर उपाययोजना लागू कराव्या लागल्या होत्या.

loudspeaker battle between North Korea and South Korea balloon campaign
उत्तर कोरियाच्या विष्ठायुक्त फुग्यांच्या कुरापतींना दक्षिण कोरियाने कसे दिले भन्नाट प्रत्युत्तर?
south africa managed to win against bangladesh
BAN vs SA T20 World Cup: विजयाच्या उंबरठ्यावर बांगलादेशचा अपेक्षाभंग; दक्षिण आफ्रिकेने उलटवली बाजी
USA win over Pakistan in Twenty20 World Cup 2024
अमेरिकेच्या क्रिकेटपर्वाची नांदी! पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय; ‘सुपर ओव्हर’मध्ये नेत्रावळकरची चमक
Saurabh Netravalkar's key role in America's victory
USA vs PAK : १४ वर्षांपूर्वीचा बदला पूर्ण! पाकिस्तानविरुद्धच्या कामगिरीनंतर सौरभवर भारतीय चाहत्यांकडून कौतुकांचा वर्षाव
Leopard Attack in Coinbatore
रात्रीच्या अंधारात दोन डोळे चमकले, बिबट्यानं थेट भिंतीवर झेप घेतली अन्…, Video व्हायरल!
Heavy rainfall from June in state above average rainfall forecast from June to September in the state
राज्यात जूनपासून कोसळधारा, जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज
How Europe struggles to fund the Ukraine War
युक्रेन युद्धाच्या निधी पुरवठ्यासाठी युरोपचा संघर्ष? जर्मनीसह इतर देशांची भूमिका काय?
Shubamn Gill Touches Feet of Abhishek sharma Mother Video Viral
IPL 2024: शुबमन गिलने स्टेडियममध्येच अभिषेक शर्माच्या आईला खाली वाकून केला नमस्कार, Video व्हायरल

हेही वाचा : गार्डन सिटी बंगळुरूत पाणीच नाही; तीव्र टंचाईमागे काय आहे कारण?

पाणीटंचाईचे संकट इतके गंभीर होते की, प्रशासनाला ‘डे झीरो’ जाहीर करावा लागला. त्या दिवशी लोकांच्या घराचा पाणीपुरवठा बंद केला गेला आणि त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभे राहावे. त्यासाठी शहरात २०० केंद्रे तयार केली गेली. त्यामुळे केपटाऊन हे जगातील पहिले मोठे शहर ठरले, जिथे इतकी गंभीर पाण्याची समस्या उद्भवली.

केपटाऊनमध्ये पाणीटंचाईचे संकट इतके गंभीर होते की, प्रशासनाला ‘डे झीरो’ जाहीर करावा लागला. (छायाचित्र-रॉयटर्स)

केपटाऊनच्या जलाशयांमधील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या खाली आली होती. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, अनियोजित शहरीकरण आणि पाण्याचा अपव्यय यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर ताण आला. सुदैवाने, सप्टेंबर २०१८ पर्यंत परिस्थिती सुधारली आणि २०२० पर्यंत सर्व गोष्टी पूर्वपदावर आल्या.

कारणीभूत कोण?

पुरेसा पाऊस न पडल्याने बंगळुरूमधील कावेरी नदीतील पाणीसाठा कमी झाला. बंगळुरूला ६० टक्के पाणीपुरवठा कावेरी नदीतून होतो. कावेरी नदीतून दररोज १,४५० दशलक्ष लीटर पाणी शहराला पुरवले जाते. केपटाऊनप्रमाणेच, बंगळुरूतील पाणी साठ्यात घट झाली आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, केपटाऊनचे थेवॉटरस्कलूफ धरण शहरातील पाण्याचा एकमेव सर्वात मोठा स्त्रोत. हे धरण त्याच्या क्षमतेच्या केवळ ११.३ टक्के भरले होते. सध्या, बंगळुरूचे केआरएस धरण त्याच्या क्षमतेच्या २८ टक्क्यांपेक्षा कमी भरले आहे.

पुरेसा पाऊस न पडल्याने पाणी साठ्यात घट झाली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या मते, शहरातील १३,९०० सार्वजनिक बोअरवेलपैकी ६,९०० कोरड्या पडल्या आहेत. वरथूर, मराठाहल्ली, बेलांदूर, बायरठी, हुडी, व्हाईटफिल्ड आणि कडुगोडी हे क्षेत्र दैनंदिन पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहेत.

शहरीकरण

केपटाऊन आणि बंगळुरू या दोन्ही शहरांमध्ये जलद, अनियोजित शहरीकरणानेही पाणी संकट उद्भवले. केपटाऊन शहरात झपाट्याने झालेल्या वाढीमुळे व्यवस्थेवर प्रचंड दबाव पडला. पाण्याची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांवर (जलाशय, पाइपलाइन ई.) ताण आला. त्यामुळे गळती आणि इतर समस्या निर्माण झाल्या आणि पाण्याचा अपव्यय होऊ लागला. तसेच काँक्रीटीकरणाने जमिनीत पावसाचे पाणी झिरपण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळीही घसरली.

बंगळुरूमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. १८०० च्या दशकात, शहरामध्ये १४५२ विहिरी होत्या, त्यातील अंदाजे ८० टक्के क्षेत्र हिरवाईने व्यापलेले होते. आता केवळ १९३ विहिरी शिल्लक आहेत आणि ४ टक्के क्षेत्र हिरवाईने व्यापलेले आहे. भूजलावर अवलंबून असलेल्या पूर्व बंगळुरूसाठी ही परिस्थिती वाईट आहे. टेक पार्क्स आणि वाढत्या शहरीकरणाने भूगर्भात पुरेसे पाणी झिरपत नाही.

दैनंदिन जीवनावर परिणाम

केपटाऊनप्रमाणेच बंगळुरूमधील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पाणीटंचाईचा मोठा परिणाम झाला आहे. पाणी वापरावर बंधने घालण्यात आली आहेत. केपटाऊनमध्ये जलसंकटावेळी नागरिकांना दररोज ५० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरण्याची परवानगी नव्हती. वाहने धुणे, खाजगी जलतरण तलाव भरणे आणि बागकाम यांसारख्या सर्व गोष्टींवर बंदी होती.

बंगळुरूमधील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पाणीटंचाईचा मोठा परिणाम झाला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण ​​मंडळाने असेच नियम आणले आहेत. कार धुणे, बागकाम, जलतरण तलाव, बांधकाम उपक्रम, रस्त्यांची देखभाल, मनोरंजन इत्यादींसाठी पिण्यायोग्य पाणी वापरण्यावर बंदी घातली आहे. उल्लंघन केल्यास पाच हजार रुपये दंडाची घोषणाही करण्यात आली आहे.

केपटाऊनप्रमाणेच, बंगळुरूतील गरीबांना या संकटाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे आणि स्वच्छतेच्या अभावामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक नळ आणि टँकरमधून पाणी घेण्यासाठी मोठमोठ्या इमारतीतील नागरिकांनाही रांगेत उभे राहावे लागत आहे, असेच चित्र केपटाऊनमधील पाणी संकटावेळी पाहायला मिळाले होते.

हेही वाचा : एल्गार परिषद: शोमा सेन यांना सहा वर्षांनंतर जामीन, हे प्रकरण आहे काय आणि त्यातील अन्य १६ आरोपींची सद्यस्थिती काय?

“हे संकट नसून, ही केवळ टंचाई”

बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण ​​मंडळाचे अध्यक्ष राम प्रसथ मनोहर यांनी सांगितले की, बंगळुरूला फक्त पाण्याची टंचाई भेडसावत आहे, हे संकट नाही. ते म्हणाले की, पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारेल. पाण्याचे संवर्धन आणि अपव्यय कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असून, केवळ प्रक्रिया केलेले पाणी बांधकामात वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले.