Nehru’s Elephant Diplomacy: टोकियो, बर्लिन, अॅम्सटरडॅम आणि कॅनडातील एका छोट्या गावातील मुलांनी भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून त्यांच्याकडे भारतातून एक हत्ती पाठवण्याची विनंती केली होती. नेहरूंनी या विनंतीचे राजनैतिक यशात परिवर्तिन केलं. १९४३ साली दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात टोकियोच्या महापौरांनी शहराच्या उत्तरेकडील उएनो प्राणीसंग्रहालयात असलेल्या तीन हत्तींचा वध करण्याचा आदेश दिला. महायुद्धाच्या कालखंडात हवाई हल्ल्यांत हे हत्ती सुटल्यास स्थानिक लोकांसाठी धोका निर्माण होईल, अशी भीती होती. या तीन हत्तींपैकी दोन हत्ती भारतातून १९२४ साली आणले गेले होते. त्यांची जॉन (नर) आणि टाँकी (मादी) अशी नावं होती तर तिसरा हनाको हत्ती हा थायलंडमधून आणला होता. हे हत्ती विशेषतः लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले होते. पण हल्ल्यांच्या भीतीमुळे, महापौरांनी त्यांना ठार मारण्याचा आदेश दिला होता. पहिल्यांदा अधिकाऱ्यांनी सुई टोचून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची त्वचा खूप जाड होती. म्हणून त्यांच्या अन्नात विष मिसळून मारण्याचाही प्रयत्न केला गेला, पण ते हत्ती इतके चतुर होते की त्यांनी त्या अन्नाला तोंडही लावले नाही. अखेरीस, या तीन हत्तींना उपाशी ठेवून त्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला.

सौजन्य: फ्रीपिक

ही एक त्रासदायक घटना होती. टाँकी ही या तिघांपैकी शेवटपर्यंत जगणारी हत्तीण होती. पल्लवी अय्यर लिखित ‘ओरिएंटिंग: अ‍ॅन इंडियन इन जपान’ या पुस्तकात त्यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. मोठ्यांना या मूक जनावरांबद्दल विसर पडलेला असला तरी, मुलं मात्र त्यांना कधीच विसरू शकली नाहीत. युद्धानंतर, सातवीच्या दोन विद्यार्थ्यांनी जपानी संसदेच्या वरिष्ठ सभागृहात एक याचिका सादर केली, या याचिकेत प्राणीसंग्रहालयात हत्ती नसल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या याचिकेनंतर एक मोठे जनआंदोलन झाले. पल्लवी यांनी म्हटल्याप्रमाणे, शेवटी टोकियो सरकारने भारताच्या पंतप्रधानांना विनंती करणारी हजारपेक्षा जास्त पत्र जमा केली. टाइम्स मॅगझिनच्या ४ जुलै १९४९ च्या लेखात याचा वृत्तान्त प्रसिद्ध झाला आहे.

Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Lucky Numerology 2025
Lucky Numerology 2025: ‘या’ तिथीला जन्मलेल्या लोकांचा नववर्षात होणार भाग्योदय, बँक बॅलन्स वाढणार, नोकरीत मिळणार यश
Deworming campaign to be implemented in state
राज्यामध्ये आज राबविणार जंतविरोधी मोहीम, दीड कोटी मुलांना देणार जंतनाशक गोळ्या
loksatta sukhache hashtag Story about grandmother valuable tip for happy life
सुखाचे हॅशटगॅ :झळाळत्या कोटीदीप्ती…
Loksatt chaturang Abroad mother tongue language Experience
मनातलं कागदावर: बालपणीचा काळ सुखाचा…

अधिक वाचा: एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

टाइम मॅगझिनमधील माहितीनुसार, “टोकियोतील लहान मुलांनी कोलकात्याचे निर्यातदार हिमांशू नेओगी यांच्याशी मैत्री केली, हिमांशू हे त्यांच्या व्यावसायिक प्रवासात शहरातील शाळांना भेट देण्यासाठी थोडा वेळ काढत होते. मुलांनी नेओगी यांना फुलांचे गुलदस्ते दिले आणि त्यांच्याबरोबर सामूहिक छायाचित्रांसाठी पोज दिली. भारतात परतण्याआधी, त्यांनी नेओगी यांना विनंती केली की, त्यांनी पंतप्रधान नेहरू यांच्याकडे हत्ती पाठवण्यासाठी मध्यस्ती करावी.” टाइम मॅगझिनमधील लेख प्रकाशित होण्याच्या सुमारे आठवडाभर आधी, नेओगी यांनी नेहरूंच्या कार्यालयात मुलांनी लिहिलेली ८१५ पत्रे पाठवली.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी सुमिको कनात्सूने लिहिलेल्या इंग्रजी पत्रात असे म्हटले होते की, “टोकियो प्राणीसंग्रहालयात आम्हाला फक्त डुकरं आणि पक्षी दिसतात, ज्यात आम्हाला रस नाही. जपानी मुलांचे दीर्घकाळापासून हत्ती पाहण्याचे स्वप्न आहे….तुम्ही कल्पना करू शकता का, आम्ही हत्ती पाहण्यासाठी किती उत्सुक आहोत?” त्याचवेळी, सेइशी ग्रेड स्कूलमधील मसानोरी यामाटोने लिहिले होते की, “हत्ती अजूनही आमच्या स्वप्नांमध्ये आमच्याबरोबर राहतो.”

सौजन्य: फ्रीपिक

ही पत्रे मिळाल्यानंतर, पंडित नेहरूंनी परराष्ट्र मंत्रालयाला संबंधित राज्यांशी समन्वय साधून हत्ती मिळविण्याचे आणि निधी तसेच वाहतुकीचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. तत्कालीन मैसूर संस्थानातून मिळवलेल्या हत्तीला नेहरूंनी त्यांच्या मुलीच्या नावावरून इंदिरा असे नाव दिले. नेहरूंना ही पत्रे मिळाल्यानंतर काहीच महिन्यांत इंदिरा (हत्ती) टोकियोमध्ये पोहोचली. अय्यर यांनी लिहिले आहे की, ‘पंडित नेहरूंनी सहमती दिल्यावर २५ सप्टेंबर १९४९ रोजी इंदिरा उएनो प्राणीसंग्रहालयात पोहोचली. यानंतर टोकियोमध्ये खूप उत्साह होता. प्राणीसंग्रहालय माणसांनी खचाखच भरले होते.”

नेहरूंनी हत्ती पाठवताना जपानमधील मुलांनाही संबोधित करण्यासाठी वेळ काढला. नेहरूंनी त्यांच्या पत्रात लिहिले की, ‘मला आशा आहे की, भारतातील आणि जपानमधील मुले मोठी झाल्यावर केवळ त्यांच्या देशांमध्येच नाही तर संपूर्ण आशिया आणि जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणून तुम्ही या इंदिरा नाव असलेल्या हत्तीला भारतातील मुलांकडून आलेले प्रेम आणि सद्भावनेचा दूत म्हणून पाहायला हवे. हत्ती एक उदात्त प्राणी आहे. तो शहाणा, संयमी, बलवान आणि तरीही सौम्य असतो. मला आशा आहे की, आपण सर्वांनी हे गुण अंगीकारावेत.” त्यावेळी इंदिरा फक्त कन्नड भाषेत आदेश पाळत असल्यामुळे, अय्यर यांनी लिहिले की तिच्या दोन जपानी प्रशिक्षकांनी “म्हैसूरमधून आलेल्या दोन भारतीय विद्वानांकडून कन्नड भाषा शिकून घेतली”. जपानी प्रशिक्षकांना तिच्यासोबत संवादसंबंध प्रस्थापित करण्यासाठी कन्नड शिकण्यास दोन महिने लागले. सुमारे आठ वर्षांनंतर जपान दौऱ्यादरम्यान १९५७ मध्ये पंतप्रधान नेहरू आणि त्यांची मुलगी इंदिरा तिच्या नावाच्या हत्तीला भेटले. इंदिरा हत्ती तिच्या मृत्यूपर्यंत जपान आणि भारताच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून ओळखली गेली.

हा शेवटचा हत्ती नव्हता!

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बर्लिनमधील प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांनाही टोकियोतील प्राण्यांप्रमाणेच वागणूक मिळाली. युद्धानंतर काही वर्षांनी बर्लिनमधील मुलांनाही प्राणीसंग्रहालयात हत्ती नसल्याची खंत वाटू लागली. त्यांनीही नेहरूंना हत्ती पाठविण्याची विनंती करणारी पत्रे लिहिली. पंडित नेहरूंना ती पत्रे मिळाली आणि त्यांनी हत्ती पाठविण्याचे आश्वासन दिले. १९५१ साली शांती नावाची तीन वर्षांची मादी हत्ती बर्लिनला पाठवण्यात आली.

१९५३ साली हिवाळ्यात दोन वर्षांनंतर नेहरूंना कॅनडातील पाच वर्षांच्या मुलाकडून आणखी एक पत्र आले. या मुलाचे नाव पीटर मार्मोरेक होते. त्याने लिहिले की, “प्रिय श्री नेहरू येथे कॅनडामधील ग्रॅनबी नावाच्या छोट्याशा शहरात आमच्याकडे एक सुंदर प्राणीसंग्रहालय आहे, परंतु आमच्याकडे एकही हत्ती नाही.” मार्मोरेकने आपल्या वडिलांकडून ऐकले होते की नेहरूंकडे बरेच हत्ती आहेत आणि ते त्यांच्याकडून एक हत्ती मिळवू शकतात. त्याने निरागसपणे लिहिले, “मला माहीत नव्हते की, हत्ती जमिनीतच्या आत राहतात, [परंतु] मला आशा आहे की, तुम्ही आम्हाला एक पाठवू शकता.”

१९५३ साली डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला मार्मोरेकला भारताचे पंतप्रधान नेहरू यांच्याकडून त्याच्या पत्राला उत्तर पाठवण्यात आले. नेहरूंनी थेट हत्ती पाठवण्याचे आश्वासन दिलेले नसले तरी, त्यांनी त्या पाच वर्षांच्या मुलाला दिलासा दिला की, त्याची नम्र विनंती ते विसरणार नाहीत. तसेच, विनोदाने म्हणाले, “हत्ती जमिनीच्या आत राहत नाहीत. ते खूप मोठे प्राणी आहेत आणि ते जंगलात फिरत असतात… त्यांना पकडणे सोपे नाही.”

अधिक वाचा: Queen Elizabeth wedding cake: ८० वर्षे जुन्या केकची किंमत तब्बल २ लाख रुपये; काय आहे नेमकं प्रकरण? राणी एलिझाबेथचा काय संबंध?

कॅनेडियन प्रेसला या पत्राची बातमी मिळाली आणि ती मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली. कॅनडाच्या पंतप्रधानांनाही या पत्राची माहिती देण्यात आली होती. साहजिकच, पाच वर्षांचा मुलगा स्थानिक सेलिब्रिटी ठरला. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये, दरम्यानच्या काळात, नेहरूंना लिहिलेल्या पत्रावर आधारित एक याचिका त्याच्या मूळ गावी ग्रॅनबीने प्रसारित केली होती, ज्यामध्ये ८,००० हून अधिक मुलांच्या स्वाक्षऱ्या होत्या. इतिहासकार निखिल मेनन यांनी द कॅरावानसाठी लिहिताना नमूद केले, “शेवटी ग्रॅनबीमधील मुलांची इच्छा पूर्ण झाली. १९५५ साली मद्रास राज्यातील जंगलातून दोन वर्षांचे हत्तीचे पिल्लू, अंबिका, मॉन्ट्रियलला नेऊन नंतर ग्रॅनबी प्राणीसंग्रहालयात नेले. पीटर मार्मोरेक तिचे स्वागत करण्यासाठी तेथे उपस्थित होता आणि तिच्या आगमनाच्या आनंदात त्याने भाषणही दिले.”

सौजन्य: फ्रीपिक

पुढील वर्षी, नेदरलँड्समध्ये अशीच घटना घडली. त्यामुळेच १९५४ साली नोव्हेंबर महिन्यात मलबारच्या जंगलातून मुरुगन नावाचे हत्तीचे पिल्लू अॅमस्टरडॅमला नेण्यात आले. मुरुगन अॅमस्टरडॅमच्या प्राणीसंग्रहालयात उत्तम प्रकारे वाढला आणि २००३ साली ५० व्या वर्षी वृद्धापकाळाने मरण पावला.

पण भारतीय सरकारने परदेशातील मुलांना हत्ती भेट म्हणून का दिले?

नेहरूंना मुलं खूप प्रिय होती, तरीही यामागे एक मोठे कारण होते. मेनन यांनी उल्लेख केला आहे की, कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी परराष्ट्र मंत्रालयाला लिहिले होते की, निःसंशय हा मैत्री आणि सद्भावनेचा एक आकर्षक संकेत असेल”. मेनन यांनी कॅमेश्वरी कुप्पुस्वामी यांच्या पत्राचा उल्लेख केला आहे. कुप्पुस्वामी या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि १९५० च्या दशकात उत्तर अमेरिकेतील ग्रामीण समुदाय विकास कार्यक्रमांचा अभ्यास करण्यासाठी नियोजन आयोगाने त्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी ग्रॅनबीच्या महापौरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “भारत तुमच्या देशाकडून अनेक भेटवस्तू प्राप्त करत आहे, विशेषतः गहू आणि दूध पावडरसारख्या अन्नपदार्थ. आम्ही तुमच्या कृपेचे उत्तर देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्याकडे नसलेल्या गोष्टी पाठवणे.”

तर भारत हा जादुई देश तुम्हाला हत्तीही पाठवेल!

२००५ साली पर्यावरण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय सीमेपार प्राण्यांच्या हस्तांतरणावर बंदी घातल्यानंतर अशा भेटवस्तू बेकायदेशीर ठरल्या. मात्र, मार्मोरेक नियमितपणे ग्रॅनबी प्राणीसंग्रहालयात अंबिकाला भेटायला जात असे, पण त्याच्यानंतर शहरातून बाहेर गेल्यानंतर तिच्याशी संपर्क तुटला. २००५ साली प्रकाशित झालेल्या एका ब्लॉगमध्ये त्याने लिहिले, “अंबिका, तिने मला शिकवले की, भारत हा एक जादुई देश आहे; तुम्ही त्यांना पत्र लिहिले, तर ते तुम्हाला एक हत्तीही पाठवतील!”

Story img Loader