Omicron Sub Variant BF7 Detected In India Symptoms Precautions Transmission Rate: चीनमध्ये करोनाची लाट आली आहे. सध्या जगभरामध्ये चर्चेत असलेल्या चीनमधील करोना लाटेमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट असलेल्या बीएफ-७ चे आहेत. भारतामध्येही बीएफ-७ व्हेरिएंटचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन रुग्ण हे गुजरातमधील आणि दोन ओदिशामधील आहेत. चीनबरोबरच या सब-व्हेरिएंटचे रुग्ण जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, डेनमार्क, अमेरिका आणि युनायटेड किंग्डममध्येही आढळून आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएफ-७ व्हेरिएंटबद्दल सध्या कोणती माहिती समोर आली आहे?

बीएफ-७ हा विषाणू ओमायक्रॉन करोना विषाणूच्या बीए-५ या विषाणूसारखाच आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार या व्हेरिएंटच्या विषाणूची प्रादुर्भाव होण्याची क्षमता अधिक आहे. तसेच संसंर्ग झाल्यानंतर लक्षणं दिसण्यासाठी लागणारा कालावधीही इतर व्हेरिएंटच्या तुलनेनं फार कमी आहे. तसेच या विषाणूमध्ये पुन्हा एखाद्याला संसर्ग करण्याची म्हणजेच रीइन्फेक्टेड करण्याची क्षमताही अधिक आहे. तसेच लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं दिसत आहे.

लसीकरण झालेल्यांनाही का होतोय संसर्ग?

‘सेल होस्ट अ‍ॅण्ड मायक्रोब’ या नियतकालिकामध्ये छापून आलेल्या संशोधन अहवालानुसार वुहानमधील विषाणूपेक्षा सध्याच्या बीएफ-७ विषाणूची प्रतिकार करण्याची क्षमता अधिक आहे. ४.४ फोल्ड प्रकारची अधिक प्रतिकार क्षमता या बीएफ-७ विषाणूमध्ये आहे. म्हणजेच लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या शरीरामध्ये करोना विषाणूंचा प्रतिरोध करणाऱ्या अ‍ॅण्टीबॉडीज या विषाणूला प्रतिकार करण्यासाठी फार प्रभावी ठरत नाहीत.

नक्की पाहा >> Photos: ओसाड शहरे, औषधांसाठी स्पर्धा, प्लास्टिकमध्ये गुंडाळेली बाळं, PPE किटमध्ये रिक्षावाले अन्… चीनमध्ये करोनामुळे हाहाकार

बीएफ-७ ची लक्षणं कोणती?

या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास अप्पर रेस्पिरेट्री म्हणजेच श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो. ताप येणे, घशात खवखव, वाहतं नाक, खोकला ही संसर्गाची प्राथमिक लक्षणं आहेत.

काय काळजी घ्यावी?

नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या नवीन संसर्गाचं प्रमाण वाढवण्याची भिती व्यक्त केली जात असतानाच सर्वांना करोनासंदर्भातील नियम काटेकोरपणे पाळणं आवश्यक आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. या साध्या गोष्टींच्या माध्यमातून करोनाच्या संसर्गावर आळा घालता येईल.

नक्की वाचा >> चीनमधील करोना उद्रेकानंतर महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती? आरोग्यमंत्र्यांचं सूचक विधान; म्हणाले, “हे आम्ही…”

सर्दी, खोकला आणि ऋतूमानानुसार होणारे त्रास ही भारतामध्ये सर्वसामान्य बाब आहे. मात्र या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकते. तुमच्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणं दिसत असली तर तातडीने करोना चाचणी करुन घ्या आणि स्वत:ला आयसोलेट करा.

अपुरी रोग प्रतिकारशक्ती

आधी संसर्ग होऊन गेलेल्यांमुळे रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्याने पुन्हा नव्याने संसर्ग होण्याचं प्रमाण वाढवलं असल्याचं दिसून आलं आहे. रोग प्रतिकारशक्ती अपुरी असल्याने करोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं चीनमधील संसर्गादरम्यान दिसून आलं आहे.

नक्की वाचा >> चीनमध्ये थैमान घालणाऱ्या BF7 Variant चे रुग्ण महाराष्ट्रात सापडले? आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, “आमच्याकडे कुठल्याही…”

भारतामधील परिस्थिती काय?

भारतात आतापर्यंत चार बीएफ-७ पॉझिटीव्ह करोना रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी करोनासंदर्भातील नियमांचं सर्वांनी पालन करावं असं म्हटलं आहे. ‘‘करोनासाथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी करोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे’’, असे मंडाविया यांनी सांगितले.

अतिरिक्त आरोग्य सचिव मनोज अग्रवाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्राने सर्व राज्यांना परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या करोना चाचण्या आणि स्कॅनिंगवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश दिले असल्याचं सांगितलं. तसेच या प्रवाशांच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंगही केले जावे असं केंद्राने राज्यांना काळवलं आहे.

सध्या चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये करोनाची नवीन लाट आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China covid outbreak new covid variant omicron bf 7 found in india symptoms precautions transmission rate and more scsg
First published on: 22-12-2022 at 12:19 IST