ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंत्रिमंडळात फेरबदल केले असून ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची (सोमवार, दि. १३ नोव्हेंबर) गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी केली. लंडनच्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात सुएला ब्रेव्हरमन यांनी आपल्याच पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढणारा लेख लिहिला होता. लंडनची पोलिस यंत्रणा पॅलेस्टाईन धार्जिणी आहे, असा आरोप या लेखातून त्यांनी केला होता. या लेखामुळे ब्रिटनचे पंतप्रधान आणि सरकारवर टीका झाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली आहे. ब्रेव्हरमन यांच्याजागी विद्यमान परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेवर्ली (James Cleverly) यांना गृहमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना क्लेवर्लीच्या जागी परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पदावर सहा वर्ष ब्रिटनच्या पंतप्रधान भूषविणारे कॅमेरून गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणातून दूर झाले होते. परराष्ट्र मंत्री पद मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय पुनरागमन झाल्याचे बोलले जात आहे.

हे वाचा >> सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी, पंतप्रधान कार्यालयाची अवहेलना पडली महागात

Sharad Pawar criticism that Narendra Modi has no moral right to demand the power of the country again
नरेंद्र मोदींना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
President Muizzu party secures big win in Maldive
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष विजयाच्या समीप; चीनधार्जिण्या मोइझ्झू यांच्या पक्षाला ‘मजलिस’मध्ये सर्वाधिक जागा
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
prakash mahajan on Raj thackeray
मनसेचे पदाधिकारी राजीनामा का देतायत? प्रकाश महाजन म्हणाले, “राज ठाकरेंमुळे आमची…”

डेव्हिड कॅमेरून यांनी एक्स या सोशल मीडिया खात्यावर याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यात त्यांनी लिहिले की, “पंतप्रधानांनी मला परराष्ट्र मंत्री म्हणून काम करण्याचा प्रस्ताव दिला आणि मी तो नम्रपणे स्वीकारला आहे. मी मागच्या सात वर्षांपासून राजकारणापासून दूर होतो. हुजूर पक्षाचा नेता म्हणून ११ वर्ष आणि पंतप्रधान म्हणून सहा वर्ष काम करण्याचा मला अनुभव आहे. हा अनुभव पंतप्रधानांना मदत करण्यात आणि महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यास कामी येईल, अशी मला आशा आहे.”

कोण आहेत डेव्हिड कॅमेरून?

डेव्हिड कॅमेरून हे ब्रिटनचे माजी पंतप्रधान (कार्यकाळ २०१० ते २०१६) असून हुजूर पक्षाचे (Conservative party) ते वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. युकेमधील इतर महत्त्वाच्या पुढाऱ्यांप्रमाणेच त्यांनीही अभिजन समजल्या जाणाऱ्या इटन महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पदवी संपादन केली. हुजूर पक्षाचे आधुनिकीकरण आणि बदल घडविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. डिसेंबर २००५ साली पक्षाचा पराभव झाल्यानंतर पक्षाची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली. कॅमेरून यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाने उत्कृष्ट कामगिरी करत मजूर पक्षातील उदारमतवादी लोकांना सोबत घेऊन आघाडीचे सरकार स्थापन केले. यामुळे ४३ व्या वर्षी पंतप्रधान बनणारे कॅमेरून हे १९८ वर्षांच्या इतिहासातील पहिलेच तरूण पंतप्रधान ठरले.

हे वाचा >> अग्रलेख: ऋषींची ‘गृह’शोभा!

कॅमेरून यांच्या नेतृत्वाखाली हुजूर पक्षाने २०१० आणि २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळविला. मात्र २०१६ साली ब्रिक्झिट मतदानानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. कॅमेरून यांच्यानंतर थेरेसा मे पंतप्रधान झाल्या.

कॅमेरून आणि ब्रेग्झिट

युरोपियन संघामधून बाहेर पडावे की नाही, यावर निर्णय घेण्यासाठी कॅमेरून यांनी राष्ट्रव्यापी सार्वमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. हुजूरपक्षातील अनेक नेते दीर्घकाळापासून युरोपियन संघातून ब्रिटनने बाहेर पडावे, अशी भूमिका मांडत होते. बहुराष्ट्रीय संघटना असलेल्या युरोपियन संघाची स्वतःची संसद, बाजार आणि चलन व्यवस्था आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपियन देशांनी आपापसात आर्थिक आणि राजकीय एकीकरण करण्यासाठी युरोपियन संघाची स्थापना करण्यात आली होती. युरोपमधील अनेक देशातील पुराणमतवादी धोरण असलेले नेते युरोपियन संघावर टीका करत असत. युरोपियन संघात खूपच नोकरशाही असून यामुळे सदस्य राष्ट्रांचे नुकसानच होत असल्याची या नेत्यांची धारणा होती.

कॅमेरून यांचा ब्रेग्झिटला विरोधा होता मात्र सार्वमत घेण्यास त्यांनी तयारी दर्शविली. माध्यमातील बातम्यांनुसार हुजूर पक्षातील काही नेत्यांचा ब्रेग्झिटमधून बाहेर पडण्याचा दबाव होता, अशी माहिती मिळते. यामध्ये माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचाही दबाव टाकणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश होता. सार्वमताचा निकाल आल्यानंतर कॅमेरून यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. सार्वमत चाचणीत युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ५२ टक्के मतदान झाल्याने ब्रिटनमधील अनेक विश्लेषक आणि जाणकारांनाही धक्का बसला.

आणखी वाचा >> यूपीएससीची तयारी : युरोपीय संघ आणि ब्रेक्झिट

राजीनामा दिल्यानंतर कॅमेरून मुख्य प्रवाहातील राजकारणात फारसे दिसले नाहीत. २०१९ साली एनपीआर न्यूजला माहिती देताना ते म्हणाले, “आम्ही ब्रेग्झिटबाबतचे सार्वमत गमावले, ही मोठी खेदाची बाब होती. कदाचित आम्ही आणखी चांगली मोहीम राबवू शकलो असतो, कदाचित आणखी चांगली वाटाघाटी करू शकलो असतो. कदाचित ती वेळच योग्य नव्हती. त्यावेळी मला तो खरोखरच महत्त्वाचा मुद्दा वाटत होता, म्हणूनच मी तो देशासमोर मांडला.”