शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार घेऊन बाहेर पडल्यापासून आत्मविश्वासाच्या जोरावर विरोधकांना टोलावून लावत स्वत:च्या पक्षाचे ७ खासदार आणि ५७ आमदार निवडून आणण्याची किमया साधल्यानंतरही, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आगामी काळ आव्हानात्मक असेल अशीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीला धक्का देत ठाणे, सुरत आणि गुवाहाटी असा शिंदे यांचा प्रवास त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक होता. या त्यांच्या प्रवासात दिल्लीतील ‘महाशक्ती’ची साथ त्यांना लाभली होती. त्यामुळे पक्षफुटीचा हा प्रवास तसा शिंदे ठरलेल्या आणि महाशक्तीने आखून दिलेल्या वाटेनेच करत होते. राज्यात भाजपला मिळालेले घवघवीत यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलेले मुख्यमंत्रीपद यामुळे शिंदे यांचा पुढील राजकीय प्रवास मात्र सोपा नसेल हे त्यांचे निकटवर्तीयदेखील मान्य करू लागले आहेत.

पक्ष संघटनेत नव्याने जोर फुंकण्याचे आव्हान…

‘मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील, त्यास माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल’ अशी भूमिका घेत महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेला पेच आपण सोडवत आहोत असे चित्र शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उभे केले. ही त्यांनी दाखवलेली लवचीकता होती की राजकीय अपरिहार्यता या विषयीच्या चर्चा मात्र त्यानंतर सुरू झाल्या. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप श्रेष्ठींनी मांडल्यामुळेच शिंदे यांना ही माघार घ्यावी लागली असेही त्यावेळी बोलले गेले. त्यानंतर शिंदे यांचे आजारपण सुरू झाले आणि दरे या त्यांच्या मूळ गावी विश्रांतीचा काळ बराच चर्चेत आला. ‘विश्रांतीसाठी मी माझ्या गावीदेखील जायचे नाही का’ असा सवाल शिंदे यांनी शपथविधीनंतर पत्रकारांनाच विचारला. ‘शिवसेनेचे ४० आमदार होते, ते आता ५७ झाले आहेत. तिघा आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. पक्षाचे सात खासदार आहेत. आम्ही केलेल्या कामाची ही पावती लोकांनी दिली आहे’ अशी भूमिका मांडत शिंदे यांनी आपल्या वाढलेल्या ताकदीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. हा उत्साह पुढेही कायम राहील याची दक्षता घेत संघटना वाढविण्याचे आव्हान शिंदे यांना पेलावे लागणार आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”

हेही वाचा >>>शरद पवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष… हे पद किती महत्त्वाचे?

शिंदेसेना मुख्यमंत्री पदाभोवतीच फिरतेय?

लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तुलनेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी उजवी राहिली. तरीही स्वत: शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांनी विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या पक्षाची स्वतंत्रपणे आखणी करण्यास सुरुवात केली. सव्वादोन वर्षांपूर्वी मिळालेले मुख्यमंत्रीपद शिंदे यांना झेपेल का अशी चर्चा सुरुवातीच्या काळात होती. या काळात सतत लोकांच्या संपर्कात रहाणे, राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरणे, नेते-आमदार, पदाधिकाऱ्यांना बळ देऊन शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रभाव कमी कसा होईल यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे पिता-पुत्रांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात दौरे वाढविले, आमदारांना ताकद दिली. उमेदवारांची निवड केली आणि जेथे आवश्यकता होती तेथे भाजपची मदत घेत स्वत:च्या जागा कमी होणार नाहीत याची काळजी घेतली. हे सगळ करत असताना मुख्यमंत्रीपदाची ताकद शिंदे यांच्या मागे होती. शिंदे यांच्या सोबत येणारे नेते, पदाधिकाऱ्यांनाही शिंदे यांचे हे पद भुरळ पाडत गेले. शिंदे यांनाही त्यांच्याकडे येणाऱ्यांना भरभरून देता आले त्यामागे पदाची ताकद निर्णायक ठरत गेली. शिंदे अजूनही सत्तेत आहेत आणि महत्त्वाच्या मंत्रीपदांवर त्यांचा दावा आहे. असे असले तरी मुख्यमंत्रीचे राज्यातील सर्वोच्च पद त्यांच्यापुढे आता असणार नाही. या पदाभोवती घट्ट आखणी झालेला त्यांचा पक्ष सांभाळून ठेवण्याचे काम यापुढेही शिंदे पिता-पुत्रांना करावे लागणार आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : ‘उपमुख्यमंत्री’ असे घटनात्मक पदच नाही… मग शपथ घेणे कितपत योग्य? न्यायालय काय म्हणते?

शिंदे यांच्यासाठी ‘महाशक्ती’ महत्त्वाची कशी?

विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला घवघवीत यश मिळाले, तेव्हापासूनच शिंदे यांच्या कोंडीचा अध्याय सुरू झाल्याचे दिसते. राज्यात महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळेल आणि त्यातही भाजप १३०हून अधिक जागा निवडून आणेल, यावर महायुतीतील घटक पक्षांचाच विश्वास नव्हता. महायुतीला काठावरचे बहुमत मिळाल्यास सत्ता स्थापनेत आपली भूमिका महत्त्वाची राहिल, असा विश्वास शिंदे यांच्या पक्षाला वाटत होता. भाजपचा आकडा शंभरीच्या घरात पोहोचला तरीही मुख्यमंत्रीपद आपलेच, असे खुद्द शिंदे यांच्या निकटवर्तीयांनाही वाटत होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. त्यामुळे आगामी काळात दिल्लीतील महाशक्तीची मदत शिंदे यांच्या पक्षासाठी महत्त्वाची ठरेल. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव घेतानाच शिंदे यांनी मोदी-शहा यांचा आवर्जून उल्लेख केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही शिंदे या दोघांचे आभार मानले. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होत असताना दिल्लीतील महाशक्तीच्या पाठिंब्याची आशा अजूनही शिंदे बाळगून आहेत. महाशक्तीची ताकद त्यांच्यामागे किती उभी राहील यावर त्यांच्या पक्षाचेही भवितव्य अवलंबून रहाणार आहे.

Story img Loader