Rajya Sabha Election Voting Process: राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. १० जून २०२२ रोजी राज्यसभेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये सात उमेदवार असल्याने चुरस अधिक वाढली आहे. मागील २४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान पार पडणार आहे. यापूर्वी नेहमीच बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. त्यामुळेच यंदा महाविकास आघाडी किंवा भाजपाची मते फुटणार का, अपक्ष किंवा छोट्या पक्षांचे आमदार पाठिंबा दिलेल्या पक्षांबरोबर ठाम राहणार का, असे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. भाजपा व शिवसेनेने अपक्ष व छोट्या पक्षांच्या २९ आमदारांवर लक्ष केंद्रित केल्याचं चित्र सध्या दिसत आहे. मात्र ही निवडणूक नेमकी कशी होते. ती इतर निवडणुकींपेक्षा वेगळी कशी असते?, मतं कशी मोजली जातात? मतदान आणि मतमोजणीचे नियम काय आहेत याबद्दल अनेकांना माहिती नसते. या मतदानाच्या निमित्ताने याच साऱ्या पैलूंवर टाकलेली नजर…

कसं होतं मतदान?

chavadi maharashtra politics maharashtra political crisis
चावडी: एका रात्रीत मनपरिवर्तन
Why is the issue of reliability of EVMs frequently raised Since when are EVMs used in India
विश्लेषण : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा वारंवार का उपस्थित होतो? ईव्हीएमचा वापर भारतात कधीपासून?
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Women Voters in India
निवडणूक आयोगाने ‘तो’ कठोर निर्णय घेतला आणि महिला मतदारांची संख्या वाढली

>मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकारी मतदान करणाऱ्या आमदाराकडे एका विशिष्ट प्रकारचा पेन देतात. याच पेनचा वापर करुन आमदाराने मतदान करणं अपेक्षित असतं. हा पेन मतपत्रिकेसोबतच दिला जातो. बॅलेट पेपर पद्धतीनं हे मतदान होत असल्याने मतदानाच्या बॅलेटवर इतर कोणतंही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन अथवा इतर वस्तूने चिन्हांकन केल्यास ते मत ग्राह्य धरलं जात नाही.

>आमदारांना देण्यात येणाऱ्या मतपत्रिकेवर उमेदवाराचं नाव आणि पुढे पंसतीक्रम असा रकाना (टेबल) असतो. ज्या उमेदवाराला आपलं मत द्यायचं आहे त्याच्या नावापुढील रकान्यामध्ये मतदान करणाऱ्या आमदाराने १ हा आकडा लिहिणं अपेक्षित असतं. म्हणजेच संबंधित उमेदवार हा आपली पहिली पसंती आहे असं यामधून दर्शवलं जातं. त्यामुळेच १ हा आकडा एकाच उमेदवाराच्या नावाच्या पुढे लिहिणं अपेक्षित असतं नाहीतर हे मत ग्राह्यं धरलं जात नाही.

>एकाहून अधिक उमेदवार असले तरीही पहिल्या पसंतीचा १ हा आकडा एकाच नवासमोर लिहिणं अपेक्षित असतं.

>जेवढ्या जागांसाठी निवडणूक आहे त्यापेक्षा अधिक उमेदवार असतील तर मतदान करणाऱ्या आमदाराने उतरत्या क्रमाने उरलेल्या रकान्यांमध्ये आकडे भरणे अपेक्षित असते. म्हणजे आता सात उमेदवारांची नावं मतपत्रिकेवर असतील आणि सहाच जागांसाठी मतदान असेल तर एका आमदाराच्या नावापुढील रकाना रिकामा राहणार. उरलेल्या सहा जणांच्या नावापुढे मतदान करणारा आमदार त्याच्या पसंतीनुसार एक ते सहा आकडे लिहिणार. म्हणजेच पहिली पसंती असणाऱ्यासमोर १, दुसरी पसंती असणाऱ्या समोर २ आणि अशाचप्रकारे एकूण सहा उमेदवार पसंतीक्रमानुसार निवडायचे असतात.

>रकान्यामध्ये हे आकडे लिहिताना एकच आकडा दोनदा लिहिला जाणार नाही याची कळजी मतदान करणाऱ्या आमदाराने घेणं गरजेचं असतं.

>पंसतीक्रम हा आकड्यांमध्ये म्हणजेच १, २, ३, ४ असाच नोंदवणं बंधनकारक असतं. एक, दोन, तीन, चार अशा लेखीपद्धतीने मतदान केलं जातं नाही.

>आकड्यांशिवाय या मतपत्रिकेवर काहीही लिहिता येत नाही. कोणत्याही प्रकारचं अक्षर (मराठी, इंग्रजी) यावर लिहियाचं नसतं. मतदान करणाऱ्या आमदाराच्या किंवा उमेदवाराच्या नावाची अद्याक्षरं, स्वाक्षरी किंवा अगदी अंगठ्याचा ठसाही उमटवण्यास बंदी असते. असं काही केल्याचं आढळून आल्यास मतपत्रिका बाद ठरवली जाते.

>आकड्यांऐवजी बरोबरची खूण किंवा X ने चिन्हांकन केलं तरी मतपत्रिका बाद ठरवली जाते.

>राजकीय पक्षांच्या आमदारांना पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवून मतदान करावे लागते.

>अपक्षांना मतपत्रिका दाखविण्याचे बंधन नसते.

>मतदान करणाऱ्या आमदारने पहिला पसंतीक्रम १ असा नोंदवल्यानंतर उर्वरित आमदारांच्या नावांपुढे पसंतीक्रम नोंदवायचा की नाही हा त्यांचा इच्छिक निर्णय असतो. केवळ एकाच उमेदवाराला १ हा पसंतीक्रम नोंदवूनही मतदान करता येतं. मात्र पहिला पसंतीक्रम न नोंदवता थेट दुसरा, तिसरा पसंतीक्रम नोंदवता येत नाही.

मतपत्रिका बाद केव्हा होते?
-१ हा अंक नसणारी मतपत्रिका ग्राह्य धरली जात नाही.

-एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे १ अंक असणारी मतपत्रिका बाद ठरवली जाते.

-१ अंक लिहिताना तो अशापद्धतीने चिन्हांकित केला असेल की रकान्यामध्ये तो नेमका कोणत्या उमेदवाराच्या पुढे नोंदवण्यात आलाय याबद्दल संभ्रम निर्माण होत असल्याच मतपत्रिका बाद केली जाते.

-एकाच उमेदवाराच्या नावापुढे १, २, ३ असे एकाहून अधिक आकडे लिहिले असतील तरी मतपत्रिका अंतिम मतदानाच्या आकडेवारीत मोजली जात नाही.

-पंसतीक्रम हा १, २, ३, असा आकड्यांऐवजी शब्दांमध्ये नोंदवला असेल तरी मतपत्रिका बाद होते.

-मतदान करणाऱ्याची ओळख असेल असं काहीही चिन्ह किंवा अक्षरं मतपत्रिकेवर असतील तरी ती बाद ठरवली जाते.

-निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या पेन व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीने अंक नोंदवले असतील तर ते ग्राह्य धरले जात नाहीत.

-राजकीय पक्षाच्या आमदारांनी मतदान करताना मतपत्रिका अन्य पक्षाच्या प्रतिनिधीला दाखविली तरी मतपत्रिका बाद केली जाते.

मतमोजणीची पद्धत कशी असते?

>प्रत्येक मताचे मूल्य हे शेकड्यात गणले जाते. म्हणजे ४२ मतांचा कोटा असला तर मतांचे मूल्य हे ४२०० असते.

>एकूण मतदान किती होते यावर पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा निश्चित केला जातो.

>सध्या विधानसभेची सदस्यसंख्या २८७ आहे (एक जागा रिक्त). त्या आधारे पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजयाकरिता ४१.०१ मतांची आवश्यकता असेल.

>म्हणजेच १० जून २०२२ च्या निवडणुकीमध्ये ४१०१ मते मिळविणारा पहिल्या फेरीत विजयी होऊ शकतो.