पावसाळयात आपल्याकडील सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे पावसाचे पाणी साठणे. मुंबईपासून ते अगदी महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये, गावांमध्ये पाणी साठणे ही समस्या दरवर्षी उद्भवत असते. ‘सदोष ड्रेनेज व्यवस्था’, पाण्याचा निचरा करण्यासाठी नसलेली उपाययोजना, या आणि अशा अनेक कारणांमुळे पावसाळयात पावसाचे पाणी तुंबल्याच्या घटना घडत असतात. काही वर्षात निकृष्ट पद्धतीचे रस्ते बांधल्याने खड्ड्यांची समस्या निर्माण झाली आहे. मुंबई गोवा महामार्ग भारतातातला सर्वात मोठा महामार्ग आहे जो पुढे दक्षिणेतील भारतातील राज्यांना जोडतो. या महामार्गावर खड्यांचे सामाज्य आहे. रस्त्यातील खड्यांवरून अनेकदा सेलिब्रेटी, सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत असतात. स्थानिक नेत्यांच्या विरोधात मोर्चे काढले जातात. पावसाळ्यापूर्वी केलेल्या रस्त्याचे काम सलग पडलेल्या पावसाने त्या रस्त्याचे रूपांतर मोठमोठाल्या खड्यात होते.

या समस्येवर हरप्रकारे योजना केली जाते, तात्पुरते हे खड्डे बुजवले जातात, मात्र काही दिवस उलटले की पुन्हा जैसे थे अशी अवस्था हा खड्यांची होते. रस्त्यावरील खड्डे ही समस्या आता फक्त आपल्या देशात राहिली नसून युरोप खंडातदेखील उदभवली आहे. मात्र तिकडच्या स्थानिकांनी यावर भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. युरोप खंडतुन आजवर अनेक विचारवंत, कलावंत दिले आहेत. अशाच एका कलाकाराने फ्रान्समधील शहरातील खड्डे हे कलात्मकरित्या बुजवले आहेत. या कलाकाराचं नाव आहे एमेमेम, त्याच्या या कामामुळे त्याला ‘पॉटहोल नाईट’ अशी पदवी मिळाली आहे. त्याने केलेल्या कामाचे प्रदर्शन पॅरिसमधील डिस्ट्रिक्ट १३ : इंटरनॅशनल आर्ट प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.

विश्लेषण : शिवसेना वि. शिंदे गट वादात १९७२ च्या ‘त्या’ प्रकरणाचा दिला जातोय संदर्भ; नेमका काय होता ‘सादिक अली वि. निवडणूक आयोग’ खटला?

कोण आहे हा कलाकार?

लियोनमधील एका कलाकारांच्या वेबसाईटच्या मते तो आधी रॉक गाण्यांचा गीतकार होता. ‘एमिमेम’ असं या कलाकाराचं नाव आहे. २०१६ पासून एमिमेमने या शैलीत आपली कला प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून फुटपाथ, खड्डे आपल्या मोझीक कलेने सुशोभित करत आहेत. गेल्या सहा वर्षांत, एमिमेमने ल्योनमधील किमान ३०० फुटपाथ आणि त्यावरचे खड्डे हे कलात्मकरीत्या रंगवले आहेत. रात्रीच्या अंधारात त्याला जिथे खड्डे पडलेले दिसतात किंवा इतर झीज दिसली, तिथे तो मोझीक्सद्वारे पुन्हा सुशोभित करतो. एमिमेची ही कलाकृती पाहून मीडियामध्ये त्याची तुलना ब्रिटनच्या लोकप्रिय स्ट्रीट आर्टिस्ट बँक्सीशीही केली जाते.

विश्लेषण : जगभरात चक्रीवादळांचा अचूक अंदाज लावणे कठीण का जात आहे?चक्रीवादळे आणखी विध्वंसक का ठरत आहेत?

नेमकी रंगवण्याची पद्धत कोणती?

फुटपाथ किंवा फुटपाथचे तुटलेले भाग दुरुस्त करण्यासाठी एमिमेम सिरॅमिक, लाकूड आणि डांबर वापरतो. यातून तो फुटपाथ कलात्मक पद्धतीने सजवतो या तंत्राला फ्लेकिंग म्हंटले जाते . याला खड्डा किंवा खड्डा भरण्याची कला देखील म्हणतात. रंगीत वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या टाइल्सपासून बनवल्या जातात. मग ते तुटलेल्या भागावर भौमितिक शैलीत सुशोभित केले जातात. त्याने ‘लियोन’ शहरात केलेलं काम आता पॅरिस, माद्रिद, बार्सिलोना आणि मिलान या मोठ्या युरोपियन शहरांमध्येदेखील दाखवले शकते. याशिवाय, फुटपाथ प्लास्टरच्या प्रतिकृतीदेखील कार्यशाळेत तयार केल्या जातात आणि गॅलरी आणि आंतरराष्ट्रीय समकालीन कला मेळ्यांमध्ये प्रदर्शित केल्या जातात. त्याच्या पहिल्या कामाचा नमुना २०१८ मध्ये ल्योनमधील टॅव्हर्न गुटेनबर्ग येथे आयोजित करण्यात आला होता, २०२१ मध्ये पॅरिस आर्ट फेअरसह आणि २०१८ मध्ये नॉर्वेच्या स्टॅव्हेंजर येथील नुअर्ट फेस्टिव्हलमध्ये त्याच्या कामाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. अलिकडच्या काळात, एमिमम सायकलस्वारांसाठी तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात व्यस्त आहे त्याच्या या कामाला ४ वर्ष लागतील असं सांगितलं जात आहे.