सोशल मीडियाच्या जगात एखादी गोष्ट व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. नेटफ्लिसवरसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जगभरातील दर्जेदार कन्टेन्ट आपल्याला पाहायला मिळतो. सध्या अमेरिकेतील एका प्रसिद्ध शोमधील एका डान्स सध्या जगभरात व्हायरल होत आहे. २०२२ संपताना तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या एका हॉरर शोमधील वेन्सडे अ‍ॅडम्स हे एक पात्र आहे. कुटुंबातील दुःखी तरुण मुलगी अशी त्या पात्राची पार्श्वभूमी आहे. ‘द अॅडम्स फॅमिली’ या प्रसिद्ध चित्रपटाच्या सीरिजवर हा शो बेतलेला आहे. ‘अॅडम्स फॅमिली ‘या नावाने वृत्तपत्रातील कार्टूनच्या रूपात मालिका प्रकाशित झाली होती. वेन्सडे या शोचे दिग्दर्शन गॉथिक हॉरर प्रकारचे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक टिम बर्टन याने केले आहे. अभिनेत्री जेना ओर्टेगाने घरातील मुलीची भूमिका केली आहे. ती एक चोखंदळ, जाणकार आणि तीक्ष्ण मुलगी आहे. कथानकात असे दाखवले आहे की नेव्हरमोर अकादमीत दाखल होते जे इतर चांगल्या आणि वाईट पात्रांनी भरलेले आहे आणि जिथे एक मारेकरी पळत आहे.

या शोच्या चौथ्या भागात ऑर्टेगा शाळेच्या डान्स फ्लोअरवर आहे. बाकी सगळे पांढरे कपडे घालून संगीतावर डोलत आहेत. मात्र ऑर्टेगा काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तिच्या पद्धतीने नाचताना दिसत आहे. तिच्या नृत्यात असंबद्धपणा दिसत आहे. तिचा लूक हॅलोविनसारखा आहे. दोन आठवड्यांपूर्वी नेटफ्लिक्सच्या च्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाल्यापासून, अंदाजे दीड मिनिटांच्या डान्स व्हिडिओला १५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचे इतर लोक अनुकरण करत असून त्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हा नृत्यप्रकार परिपूर्णतेकडे झुकणारा नसून तो त्याच्या विरोधातील असल्याने याचे आकर्षण लोकांना वाटत आहे. ओर्टेगाने स्वतः हे नृत्य बसवले आहे. लेडी गागाने हे तिच्या ‘ब्लडी मेरी’ गाण्यात हा वेन्सडे नृत्यप्रकार पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained jenna ortegas wednesday dance became a viral worldwide spg
First published on: 11-12-2022 at 18:32 IST