अनिश पाटील

भावी आयुष्याची स्वप्ने रंगवून वधु-वर सूचक संकेतस्थळावरून (मॅट्रिमोनिअल किंवा मॅचमेकिंग वेबसाइट्स) जोडीदाराचा शोध घेणाऱ्या महिलांची फसवणूक होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उघडकीस येत आहेत. आर्थिक फसवणुकीबरोबरच अनेकजणी लैंगिक शोषणाचीही शिकार ठरल्या आहेत.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक

वधु-वर सूचक संकेतस्थळावरून महिलांशी संपर्क साधून त्यांना फसवणाऱ्या पिंपरी येथील एका तरुणाला मध्य प्रादेशिक सायबर गुन्हे विभागाने काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. पकडलेल्या आरोपीविरोधात विरार,  कळवा, वसई, ठाणे, नाशिक येथे महिलांनी तक्रारी केल्या. कळव्यातील पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गुजरात व मुंबईतील पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांकडेही दोन महिलांनी तक्रार केली. त्यानंतर आणखी दोन ठकसेनदेखील, अशाच प्रकारे  महिलांना फसवत असल्याचे समोर आले.

संकेतस्थळांचा गैरवापर समाजकंटक कसा करतात ?

वधु-वर सूचक संकेतस्थळावरून फसवणूक करणारे भामटे फसवणूक करण्यापूर्वी महिलेच्या खात्यावरील माहितीचा संपूर्ण अभ्यास करतात. घटस्फोटित, विधवा तसेच काम व इतर जबाबदाऱ्यांमुळे लग्नास उशीर झालेल्या तरुणींना विशेष लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आतापर्यंतच्या प्रकरणावरून दिसते आहे. हे भामटे या महिलांसमोर आभासी चित्र उभे करतात. परदेशात नोकरी अथवा आई-वडील परदेशात राहणारे, चांगल्या पगाराची नोकरी, मुलगा दिसायला सुंदर असे चित्र उभे केले जाते. अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून असे स्थळ समोर आल्यानंतर अनेक तरुणी त्याबाबत कोणतेही पडताळणी करत नाहीत. महिला ज्या क्षेत्रात कार्यरत असेल त्या क्षेत्रातील असल्याचे भासवून तिच्याशी संपर्क साधला जातो.

भावनांचा खेळ

मोबाइल क्रमांकाची देवाण-घेवाण झाली की महिला हळूहळू या भामट्यांच्या जाळ्यात अडकते. महिलेच्या भावना जाणून घेऊन, अडचणी जाणून घेऊन तिच्याशी संवाद साधणे, काळजी असल्याचे भासवणे, प्रेम असल्याचे सांगणे असा भावनिक खे‌ळ उभा करून महिलांना भूरळ घातली जाते. संवाद सुरळीत सुरू असताना अचानक मोठे संकट उभे राहिल्याचे सांगून महिलेकडे पैशांची मागणी केली जाते. कुटुंबातील सदस्याचा अपघात, परदेशात एखाद्या संकटात अडकल्याची कारणे पुढे करतात. त्या तरुणासोबत पुढील जीवन जगण्याची स्वप्न बघणाऱ्या मुली सहज त्यांच्या या भावनिक आवाहनाला भुलून मदत करतात. पिंपरी येथे अटक केलेला आरोपी, त्याच्या घरी प्राप्तीकर विभागाचा छापा पडल्याचे सांगत असे. त्यानंतर आर्थिक अडचणीत सापडल्याचे दाखवून तो महिलांकडे पैसे मागत असे. अनेक भामटे महिलांचे लैंगिक शोषणही करत असल्याचे उघड झाले आहे. महिलेच्या छायाचित्रांमध्ये बदल करून ती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याच्याही घटना घडल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये पैसे भरायला सांगण्यात आलेल्या बँक खाते बनावट असते किंवा मित्राच्या खात्याचा वापर करण्यात येतो. प्रत्येकवेळी वेगळ्या खात्याचा वापरही करण्यात आल्याचे दिसते.

केवळ २ गुन्ह्यांमध्येच आरोपी अटक

वधु-वर सूचक संकेतस्थळावरून फसवणूक झाल्याप्रकरणी गेल्यावर्षी(२०२१) एकट्या मुंबईत नोव्हेंबर महिन्यापर्यंत १६ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील केवळ दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात दोन आरोपींना अटक झाली होती. उर्विरत १४ गुन्हे सायबर पोलिसांना अद्याप सोडवता आलेले नाहीत. त्यामुळे महिलांनी अशा गुन्ह्यांना बळी पडण्यापेक्षा सावधगिरी पाळून ते घडण्यापूर्वीच टाळणे आवश्यक आहे. ही सावधगिरी कशी घ्यायची, यासंदर्भात  पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने २०२० मध्ये विशेष शिबीर आयोजीत केले होते. यावेळी या गुन्ह्यांबाबत जनजागृतीही करण्यात आली होती.

काय काळजी घ्यावी?

संकेतस्थळावरील माहिती, स्थळ म्हणून संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने उभे केलेले चित्र यावर विश्वास ठेवण्याऐवजी प्रत्यक्ष खात्री करणे आवश्यक आहे. फसवणूक करणारे बहुतांश आरोपी दूरध्वनीवरच संपर्कात असतात व भेटणे टाळतात. तसेच संकेतस्थळावरील एखाद्या स्थळावर विश्वास ठेवण्यापेक्षा जाणकार व्यक्ती, घरातील व्यक्तींना त्याची माहिती द्यावी. भविष्याबाबत चर्चा करा, मात्र वाजवीपेक्षा अधिक माहिती देणे टाळावे. संकेतस्थळावरून संपर्कात आलेल्या व्यक्तीने सांगितलेले त्याच्या कामाचे ठिकाण, त्याचा पत्ता येथे पडताळणी करता येऊ शकते.  काही वेळा हे भामटे स्वतः भेटतात,  मात्र कुटुंबातील इतर व्यक्तींशी भेट घडवून आणत नाहीत. अशा व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे. तसेच सुरक्षित ठिकाणी भेटावे. संकेतस्थळाची माहिती घेऊनच त्यावर नाव नोंदणी करावी. तसेच बँक खात्याचे पासवर्ड इतर गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला देणे टाळावे.