रविवाराच्या कोजगरी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांनीच चंद्राच्या प्रकाशाचे सौदर्य अनुभवले असेलच. जगभरातले खगोलप्रेमी तर अशा खगोलीय घटनांची वाट बघत असतात. या निमित्ताने चंद्राचे छायाचित्र घेण्यापासून अभ्यासापर्यंत विविध गोष्टींची चर्चा होते. बरोबर याच काळात चंद्राची आणखी एका वेगळ्या दृष्टीकोनातून चर्चा केली जात आहे ती म्हणजे चंद्राच्या निर्मितीची संशोधना दावा अधिक जोरकसपणे सांगणारे सुपर कॉम्पुटरच्या माध्यमातून बनवलेले गेलेले दमदार असे Simulation.
आत्तापर्यंत चंद्राच्या निर्मितीबाबत विविध अंदाज वर्तवण्यात आले आहेत. एका अंदाजानुसार चंद्र आणि पृथ्वी यांची निर्मिती ही सूर्यमालेत एकाच वेळी झाली. तर दुसरा एक अंदाज आहे की सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीने त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे चंद्राला पकडले आणि स्वतः जवळ आणून कक्षेत फिरत ठेवले. तर तप्त पृथ्वीच्या गोळ्यावर एखादा धुमकेतू किंवा लघुग्रह किंवा छोटा ग्रह आदळला आणि त्यामुळे पृथ्वीचे अनेक तुकडे उडाले आणि ते एकत्र येत चंद्राची निर्मिती झाली. हा चंद्रनिर्मितीचा सिद्धांत बऱ्यापैकी मान्य केला जातो.
आता या दाव्याला बळकटी देणारे Simulation हे अमेरिकेतील Institute for Computational Cosmology at Durham University ने नासाच्या मदतीने तयार केले आहे. हे तयार करण्यासाठी सुपर कॉम्पुटरची मदत घेण्यात आली.
चंद्रनिर्मितीचा सिद्धांत नक्की काय आहे?
या सिद्धांतासानुसार Theia नावाचा एक मंगळ ग्रहाएवढा एक लघुग्रह हा पृथ्वीच्या कक्षेला समांतर असा काही अब्ज वर्षांपूर्वी फिरत होता. त्यावेळी पृथ्वी काय किंवा Theia हे तप्त गोळ्याच्या स्वरुपातच होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे Theia हा पृथ्वीजवळ खेचला गेला आणि पृथ्वीवर आदळला. यामुळे पृथ्वीमधून मोठ्या प्रमाणात लाव्हा-तप्त गोळा हा बाहेर फेकला गेला. त्यापैकी काही लाव्हा हा परत पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खेचला गेला, तर काही प्रमाणात लाव्हा हा पृथ्वीभोवती फिरत राहिला, तोच आता चंद्र म्हणून ओळखला जातो. टकरीनंतरची ही प्रक्रिया घडायला काही लाख वर्ष नाही तर काही मिनीटे लागली असा दावा या Simulation च्या माध्यमातून सांगण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. कालांतराने पृथ्वी आणि चंद्र जे तप्त गोळ्याच्या स्वरुपात होते ते थंड झाले आणि मग भौगोलिक, नैसर्गिक प्रक्रिया होत त्यांना आजचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
वातावरण आणि निसर्ग या दोन गोष्टी सोडल्या तर चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील जमीनाबाबत बऱ्यापैकी साम्य आहे. कारण पृथ्वीप्रमाणे मुलद्रव्ये, खनिजे ही चंद्रावर आहेत. तेव्हा हे साम्य का आहे याचा प्रश्न अनेक वर्ष संशोधकांना पडला आहे. जगभरातून चंद्राबद्दल अभ्यास सुरु आहे. यामध्ये आाता संशोधनाला साजेसे Simulation तयार करण्यात आले आहे.