जगात विविध उत्पादनाबाबत संबंधित कंपन्या या जीवघेण्या स्पर्धेमुळे अत्यंत जागरूक असतात. त्यांच्या उच्पादनाची किंवा ब्रँडची नक्कल केली जाणार नाही किंवा नकळत वापर केला जात नाही ना याबाबत ते कमालीचे दक्ष असतात. तेव्हा याच मुद्दावरुन एक याचिका ही दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती ज्याचा नुकताच निकाल लागला आहे.

नेमकं प्रकरण काय होतं?

प्रसिद्ध ‘subway’ने ही याचिका दाखल करत सॅण्डविचची विक्री करणाऱ्या दिल्लीतील ‘Suberb’ नावाच्या एका ब्रँडला प्रतिवादी केलं होतं. subway चं म्हणणं होतं की Suberb या ब्रँडने ‘Sub’ हा शब्द वापरु नये, या शब्दावर त्यांचाच म्हणजे subway चा हक्क आहे. तसंच subway नावाच्या ब्रँडमध्ये वापरली गेलेली रंगसंगती ही Suberb नेही वापरली आहे.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

दुसरा मुख्य मुद्दा याचिकेत होता तो म्हणजे subway मध्ये विकल्या जाणाऱ्या सॅण्डविच प्रकारातील Veggie Deliteआणि Subway Club यावर त्यांचा हक्क असला पाहिजे, हे कोणी इतरांनी वापरु नये.

थोडक्यात एक प्रकारे trademark, ब्रँडशी संबंधित असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप या याचिकेमार्फेत करण्यात आला होता.

कोर्टात काय आरोप प्रत्यारोप झाले?

Suberb ने आमच्या ब्रँडच्या नावामध्ये असलेली रंगसंगतीमध्ये तसंच सॅण्डविच प्रकारात नक्कल केल्याचा किंवा तसं साधर्म्य ठेवल्याचा दावा subway ने केला. डिसेंबर २०२२ मध्ये Suberb ने त्यांच्या ब्रँडमधील नावाची रंगसंगती बदलली तसंच सॅण्डविच हे नव्या नावांसह सादर केली. उदा. “Veggie Delicious” आणि “Sub on a Club” या नावांसारखी “Veg Loaded Regular” आणि “Torta Club” ही नावे सॅण्डविचला देण्यात आली. Suberb ने वापरलेली नावे ही subway च्या नावाशी साधर्म्य राखणारी आहेत असा दावा एकप्रकारे या याचिकेत करण्यात आला.

यावर Suberb ने म्हटलं की subway हा एक प्रसिद्ध ब्रँड आहे, ज्यामुळे ग्राहक हा काही गोंधळात पडणार नाही आणि Suberb मध्ये येणार नाही.

कोर्टाने काय निर्णय दिला?

कोर्टाने २६ पानी निकाल देतांना subway ने केलेले दावे हे फेटाळून लावले. यामध्ये ‘Sub’ हा शब्द कोणाच्या मालकीचा होऊ शकत नाही. कारण मुळातच लंबगोलाकार असलेल्या submarine वरुन Sub हा शब्द सॅण्डविच सारख्या खाद्यपदार्थासाठी वापरला गेला, submarine sandwiches प्रकारातील सॅण्डविचचा वापर सुरु झाला, त्यामुळे हा शब्द सार्वजनिक आहे, याचा वापर कोणीही करु शकतो, यावर कोणाचाही मक्तेदारी असू शकत नाही. Subया शब्द साधर्म्यामुळे लोकांमध्ये गोंधळ होत नाही.

Sub या शब्दाचा वाद मिटला असल्याने या शब्दाच्या पुढे असलेल्या “way” आणि “erb” या शब्दांमध्ये साधर्म्य असण्याचा प्रश्न येत नाही असंही या निकालात म्हंटलं आहे.