जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी सोशल मीडिया कंपनी असलेल्या ट्विटरची १०० टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ट्विटरचे १०० टक्के समभाग सुमारे ४३.३९ अब्ज डॉलरला रोखीत खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के भागभांडवल विकत घेतले घेतल्यानंतर. ट्विटरमधील सर्वात मोठे भागधारक बनले. मात्र त्यांनी कंपनीच्या संचालक मंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. ट्विटरच्या खरेदीसाठी हा सर्वोत्तम आणि शेवटचा प्रस्ताव असल्याचं मस्क यांनी सांगितलं. मात्र एलन मस्क यांना ट्विटर विकण्यास संचालक मंडळ तयार नाही. एलन मस्क ट्विटर ताब्यात घेण्यासाठी दबाव आणत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करु शकतात अशी भीती असल्याने संचालक मंडळाने ‘पॉयजन पिल’चा (Poision Pill) मार्ग अवलंबला आहे.

संचालक मंडळाच्या या धोरणामुळे एलन मस्क यांना कंपनी टेकओव्हर करताना आव्हानांचा सामना करावा लागेल. संचालक मंडळाच्या या निर्णयामुळे एलन मस्क यांना मोठा झटका बसला असल्याचं बोललं जात आहे. सध्या जगभरात याची चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने हे पॉयजन पिल नेमकं काय आहे तसंच संचालक मंडळ आणि एलन मस्क यांच्यातील संघर्षाची स्थिती अशा अनेक प्रश्नांची उत्तरं यानिमित्ताने आपण जाणून घेणार आहोत.

olive oil beneficial for snoring
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल खरंच फायदेशीर? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

काय आहे पॉयजन पिल?

पॉयजन पिल हे एक असं धोरण आहे ज्याचा वापर एखादी व्यक्ती जबरदस्ती कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर अवलंबलं जातं. ट्विटरच्या प्रकरणातही असंच होत आहे. या धोरणामुळे त्या संबंधित व्यक्तीला कंपनी ताब्यात घेताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ज्याप्रमाणे कंपनी काही सूट देत इतरांना कंपनीचे अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्याची परवानगी देतं. असं केल्याने टेकओव्हर करणाऱ्याच्या शेअर्सच्या किंमती कमी होतात. अशाप्रकारे कंपनी संपादित करण्याच्या मूल्यात वाढत होते. म्हणजेच संपादन करणं अजून महाग होतं.

पॉयजन पिलचा वापर आपातकालीन स्थितीत केला जातो. हे धोरण अवलंबताना संचालक मंडळ आपल्याकडील विशेष अधिकारांचा वापर करतं आणि टेकओव्हर करणाऱ्याच्या अडचणींमध्ये वाढ होते.

१९८० मध्ये जबरदस्तीनं संपादन रोखण्यासाठी या धोरणाचा सर्वाधिक वापर अमेरिकेत करण्यात आला होता. त्यावेळी उद्योगपती कंपन्यांचे शेअर्र बाजारातून खरेदी करत जबरदस्तीने संपादन करण्याचा प्रयत्न करत होते. अशामध्ये पॉयजन पिलच्या धोरणाचा वापर करत कंपन्यांना उद्यागपतींचे प्रयत्न फोल ठरवले होते.

ट्विटर विरुद्ध मस्क – कुठे आणि कशापद्दतीने सुरु झाली वादाला सुरुवात?

कंपनीच्या संचालक मंडळाचं म्हणणं आहे की, ट्वीटर विकत घेण्यासाठी जी किंमत सांगण्यात आली आहे ती पुरेशी नाही. तर एलन नमस्क यांनी जी किंमत सांगण्यात आली आहे त्यापेक्षा जास्त किंमतीवर चर्चा करण्यास नकार दिला आहे. संचालक मंडळाची भूमिका पाहता एलन मस्क यांनी कंपनी खरेदी करण्यासाठी कंबर कसली आहे. ट्विटर विकत घेण्यासाठी ते सर्व पर्याय अवलंबून पाहणार आहेत. त्यामुळेच बोर्डाने पॉयजन पिल धोरण अवलंबलं आहे.

आता एलन मस्क काय करणार?

संचालक मंडळाने घेतलेल्या या भूमिकेनंतर एलन मस्क यांनी कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. मात्र त्यांनी आधीच आपण कायदेशीर लढाईसाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मस्क यांच्या म्हणण्यानुसार, जर संचालक मंडळ भागधारकांविरोधात काही पाऊल उचललं तर ते कायदेशीर लढाईसाठी तयार आहेत.