FIR Against Co-Founder of Fact Checking Website Alt News : ‘अल्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेचे एक संस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेषाला उत्तेजन दिल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. चार वर्षांपूर्वीच्या एका ट्वीटप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. एका ट्वीटर युजरने केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (इफ्सो) या शाखेने त्यांना अटक केली.

झुबेर यांच्या अटकेनंतर लगेचच, अल्ट न्यूज सह-संस्थापक प्रतीक सिन्हा यांनी एक ट्विट केले आहे. “झुबेरला आज दिल्लीच्या स्पेशल सेलने २०२० च्या एका खटल्याचा तपास करण्यासाठी बोलावले होते ज्यासाठी तो आधीच उच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षणात होता. आज संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास आम्हाला कळवण्यात आले की त्याला दुसर्‍या एफआयआरमध्ये अटक करण्यात आली आहे ज्यासाठी कोणतीही नोटीस बजावली गेली नाही. ज्या कलमांखाली त्याला अटक करण्यात आली आहे त्या कलमांसाठी कायद्यानुसार नोटीस अनिवार्य आहे. वारंवार विनंती करूनही आम्हाला एफआयआरची प्रत दिली जात नाही,” असे प्रतिक सिन्हा यांनी म्हटले आहे.

mumbai mcdonald marathi news, all food and license holder foundation marathi news
मुंबई : मॅकडोनाल्डविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
IPS Abhishek Verma overcharging parking ticket 60 rupees video viral
VIDEO : कायदे में चलो! पार्किंग चार्जच्या नावाखाली चक्क IPS अधिकाऱ्याची फसवणूक; अटेंडन्ट्सची तुरुंगात रवानगी
shiv-thakare-abdu-rozik
‘बिग बॉस १६’ फेम शिव ठाकरे व अब्दु रोजिक यांना ‘ईडी’चे समन्स; ड्रग माफिया व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाली चौकशी
Kurkumbh MIDC, Pune Police, seize, Mephedrone, 600 kg, worth Rs. 1100 crore, drugs,
पुणे पोलिसांचा कुरकुंभमधील कंपनीवर छापा : ११०० कोटी रूपयांचे मेफेड्रोन जप्त

राहुल गांधींसह विरोधकांकडून अटकेचा निषेध

झुबेर यांच्या अटकेवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “भाजपाचा द्वेष, कट्टरता आणि खोटेपणा उघड करणाऱ्या प्रत्येकाचा त्यांना धोका आहे. सत्याचा एक आवाज बंद केल्याने असे हजारो आवाज उठतील. सत्याचा नेहमीच विजय होतो…”, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अल्ट न्यूज आणि झू बियर या संस्था विश्वगुरुंचे खोटे दावे उघड करण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सूड घेण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या दिल्ली पोलिसांनी व्यावसायिकता आणि विश्वास फार पूर्वीच गमावला आहे, अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली.

पाहा व्हिडीओ –

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, पक्षाचे खासदार महुआ मोईत्रा, तेलंगणा राष्ट्र समिती, ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लीमीनचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही अटकेचा निषेध केला.

मोदी सरकारनेच काही मंत्री, पत्रकारांना ब्लॉक करण्याची केली होती विनंती; ट्विटरच्या कागदपत्रांमधून खुलासा

कोण आहेत मोहम्मद झुबेर?

मोहम्मद झुबेर हे तथ्य तपासणाऱ्या अल्ट न्यूज या वेबसाइटचे सह-संस्थापक आहेत, ज्याची त्यांनी सॉफ्टवेअर अभियंता प्रतीक सिन्हा यांच्यासमवेत स्थापना केली होती. झुबेर आणि सिन्हा यांनी फेक न्यूजचा सामना करण्यासाठी २०१७ मध्ये अल्ट न्यूज वेबसाइटची स्थापना केली.

झुबेर यांना अटक कशासाठी?

एका ट्वीटर युजरने केलेल्या तक्रारीच्या आधारे झुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. झुबेर यांनी एका विशिष्ट धर्माच्या दैवताचा अपमान करण्याच्या हेतूने एक आक्षेपार्ह फोटो ट्वीटरवर २०१८च्या मार्चमध्ये प्रसारित केले होते, असे पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (इफ्सो) या शाखेने त्यांना अटक केली. ट्वीटर खातेदाराच्या तक्रारीच्या अनुषंगाने, भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-ए (वेगवेगळय़ा समूहांमध्ये द्वेष पसरवणे) आणि २९५-ए (धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतूने द्वेषमूलक कृत्ये करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हनुमान भक्त @balajikijaiin या ट्विटर हँडलने मोहम्मद जुबेरच्या ट्विटवर आक्षेप घेत ट्विटरवरील पोस्टच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी, ‘२०१४ पूर्वी: हनीमून हॉटेल आणि २०१४ नंतर: हनुमान हॉटेल,’ असे म्हटले होते.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फोटो (ट्विटमध्ये) दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये ‘हनीमून हॉटेल’चा साइनबोर्ड बदलून ‘हनुमान हॉटेल’ करण्यात आला आहे. हनुमान भक्त @balajikijaiin यांनी ट्विट करत म्हटले की, “आपले भगवान हनुमान जी यांचा मधुचंद्राशी संबंध जोडणे म्हणजे हिंदूंचा थेट अपमान आहे, कारण ते ब्रह्मचारी आहेत. कृपया या माणसावर कारवाई करा.”

दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, मोहम्मद झेबर यांची ही पोस्ट एका धार्मिक समुदायाविरुद्ध फोटो आणि शब्दांसह अत्यंत चिथावणीखोर आहे आणि जाणीवपूर्वक केली गेली आहे. लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी हे पुरेसे आहे आणि सार्वजनिक शांतता राखण्याच्या विरोधात जाऊ शकते.

नुपूर शर्मांची पोलखोल

झुबेर यांनी भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरावर केलेल्या टिप्पण्यांचा पर्दाफाश केल्यानंतर कतार, कुवेत आणि सौदी अरेबियासह अनेक देशांनी निषेध केल्यानंतर केंद्र सरकार कचाट्यात सापडले होते.

नुपूर शर्मा वादानंतर त्यांना समर्थन करणाऱ्या लोकांनी हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असे म्हटले होते. यानंतर मोहम्मद झुबेर यांचे अनेक ट्विट आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. त्यामध्ये झुबेर यांच्या अटकेची मागणी करण्यात आली होती. यानंतर मोहम्मद झुबेर यांनी त्यांचे फेसबुक अकाउंट डिअॅक्टिव्हेट केल्याचे बोलले जात होते.

हिंदू संतांचा अपमान केल्याचाही आरोप

मोहम्मद झुबेर यांनी एका प्रकरणात ट्विटरवर यती नरसिंह सरस्वती, महंत बजरंग मुनी आणि स्वामी आनंद स्वरूप या तीन हिंदू संतांना द्वेषी  म्हणून संबोधले होते. या प्रकरणी १ जून २०२२ रोजी सीतापूर जिल्ह्यातील खैराबाद पोलिस ठाण्यात भादवि च्या कलम २९५ (अ) आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अन्वये ‘हिंदू नेत्यांच्या धार्मिक भावना जाणूनबुजून दुखावल्या’च्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हिंदू शेर सेनेचे सीतापूर युनिट प्रमुख भगवान शरण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “ही तक्रार आमच्या धर्मस्थळाच्या महंतांविरुद्ध अपमानास्पद शब्द वापरून आमच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आहे, जे आमच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. २७ मे रोजी, मी ट्विटरवर पाहिले की मोहम्मद झुबेर यांनी राष्ट्रीय हिंदू शेरसेनेचे राष्ट्रीय संरक्षक बजरंग मुनी यांच्या विरोधात ‘द्वेषी’ सारखे अपमानास्पद शब्द वापरले होते. झुबेर यांनी हिंदू यती नरसिंहानंद आणि स्वामी आनंद स्वरूप यांचाही अनादर केला होता,” असे तक्रारीमध्ये म्हटले होते.

त्यांनी (झुबेर) जाणीवपूर्वक षड्यंत्राचा भाग म्हणून समाजात द्वेष पसरवण्याचा आणि मुस्लिमांना भडकवण्याचा आणि हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या अशा कृत्यामुळे आम्हा हिंदूंमध्ये संताप आहे, असेही त्यात म्हटले होते. झुबेर मुस्लिमांना हिंदू नेत्यांच्या हत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

याला मोहम्मद झुबेर यांनी आव्हान दिले होते. या प्रकरणी लखनऊ खंडपीठाचा निर्णय समोर आला आहे. आरोपी मोहम्मद जुबेरविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला.

पॉक्सो प्रकरणात गुन्हा दाखल

ऑगस्ट २०२० मध्ये, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी झुबेरवर पॉक्सो प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. एनसीपीसीआरने तक्रारीत झुबेर यांच्या ६ ऑगस्ट २०२० रोजी शेअर केलेल्या ट्विटचा संदर्भ दिला होता.

ट्विटरवर अल्पवयीन मुलीला धमकावणे आणि अत्याचार केल्याप्रकरणी ही तक्रार दिली आहे. अल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर @zoo_bear, @de_real_mask आणि @syedsarwar20 च्या ट्विटर हँडलसह एफआयआरमध्ये नोंद करण्यात आली होती.

विश्लेषण: ‘पोक्सो’ कायदा आहे तरी काय?

एनसीपीसीआरने मोहम्मद झुबेर यांनी शेअर केलेल्या ट्विटचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा फोटो होता. फोटोमध्ये मुलीचा चेहरा अस्पष्ट होता. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, मुलीच्या वडिलांसोबत झालेल्या ऑनलाइन भांडणाच्या वेळी तिच्या पोस्टवर आणखी दोन लोकांनी कमेंट केली होती, त्यापैकी एकाने नंतर ती कमेंट डिलीट केली होती आणि दुसर्‍याची अद्याप माहिती मिळू शकलली नाही. मात्र त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणात जुबेरवर कठोर कारवाई करण्यापासून रोखले होते.