अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे गौतम अदाणी आता पहिल्या दहामधूनही बाहेर फेकले गेले आहेत. त्यांचा सर्वात मोठा FPO त्यांना बाजारातून गुंडाळावा लागला आहे. खरेदीदारांना पैसे परत करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली आहे. इतकंच नाही, तर त्यांच्या एकूण बाजारमूल्यामध्ये तब्बल ११८ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी अदाणींना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना विनंती करावी लागत आहे. आणि हे सगळं घडलं हिंडनबर्ग रीसर्चच्या एका अहवालामुळे, ज्यामध्ये अदाणी एंटरप्रायजेसनं बाजारपेठेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता भरीस भर म्हणून S&P Dow Jones नंही आपल्या निर्देशांक यादीतून अदाणी एंटरप्रायजेसची गच्छन्ती केली आहे. यामुळे नेमकं काय होणार आहे?

S&P Dow Jones Indices काय आहे?

सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास S&P Dow Jones निर्देशांकामध्ये जागतिक स्तरावरील बाजारपेठेतील कंपन्यांची त्यांच्या गुणवत्ता, विकासाचा दर आणि क्षमता या आधारावर क्रमवारी ठरवतो. S&P Dow Jones Sustainability World IndeX च्या संकेतस्थळावर अशा कंपन्यांची यादी जाहीर केली जाते. या यादीमधील कंपन्या या आर्थिकदृष्ट्या सक्षम, आवाक्याच्या दृष्टीने व्यापक आणि शाश्वततेच्या दृष्टीने दीर्घकाळापर्यंत बाजारात अस्तित्व टिकवून ठेवण्याची क्षमता असणाऱ्या असतात. त्यामुळे या यादीमध्ये समावेश असणाऱ्या कंपन्यांची बाजारातील पत आपोआपच वाढलेली असते. पण त्याउलट या यादीतून अशा प्रकारे बाहेर काढण्यात आलेल्या कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. थोडक्यात एखाद्या कंपनीची विश्वासार्हता ठरवणारा हा एक महत्त्वाचा निकष ठरतो.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विश्लेषण : अदानी एंटरप्रायझेसने ‘एफपीओ’ का गुंडाळला?

या यादीमध्ये S&P Global Broad Market Index अर्थात BMI मध्ये नोंद असलेल्या २५०० कंपन्यांपैकी अग्रगण्य १० टक्के कंपन्यांचा समावेश असतो. त्यामुळे या यादीमधून बाहेर पडल्यामुळे अदाणी एंटरप्रायझेसच्या शेअर्सची पत गुंतवणूकदारांच्या लेखी ढासळल्याचं मानलं जात आहे. ‘अदाणी’ला यादातून बाहेर काढल्याची घोषणा होताच त्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये दिसून आला. अदाणी एंटरप्रायजेसचे शेअर्स १५ टक्के खाली उतरले आहेत.NSE नं अदाणी एंटरप्रायजे, अदाणी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांना अॅडिशनल सर्वेलन्स मेजर्स (ASM)खाली ठेवलं आहे. अर्थात, या कंपन्यांच्या शेअर्सच्या व्यवहारांवर आता बारीक नजर ठेवली जाणार आहे.

या ASM मुळे कोणत्याही शेअर्सच्या व्यवहारांमध्ये अनियमित चढ-उतार दिसत असल्याचं मानलं जातं. याचा थेट परिणाम हा अदाणी समूहाच्या एकूण बाजारमूल्यावर झाला आहे. हिंडेनबर्ग रीसर्चचा अहवाल येण्यापूर्वी अदाणी समूहाच्या ७ कंपन्या मिळून एकूण बाजारमूल्य २१७ बिलियन डॉलर्सच्या घरात होतं. ते आता अवघ्या १०२ बिलियन डॉलर्सवर आलं आहे.

विश्लेषण: शेअर मार्केट आणखी झाले सोपे! समजून घ्या काय आहे ‘टी+१ सेटलमेंट’

CSA चा फायदा काय?

S&P च्या मते CSA अर्थात Corporate Sustainability Assessment मुळे सर्व प्रकारच्या कंपन्यांचं मूल्यमापन शक्य होतं. सीएसएमध्ये ६१ प्रकारच्या व्यवासायांमधील कंपन्यांचं मूल्यमापन केलं जातं. यासाठी संबंधित व्यवसाय आणि इतर व्यवसायांसंदर्भात साधारण ८० ते १०० प्रश्नांची प्रश्नावली असते. या प्रश्नावलीतील कंपन्यांच्या व्यवहारांबाबतच्या उत्तरांवर आधारीत गुण कंपन्यांना दिले जातात. हे गुण ० ते १०० यादरम्यानचे असतात. त्याव्यतिरिक्त कंपन्यांच्या आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या २० निकषांच्या आधारेही कंपन्यांचं मूल्यमापन केलं जातं.

अदाणी समूहाचं भविष्य काय?

दरम्यान, एकीकडे दिवसेंदिवस बाजारपेठेतील पत ढासळत असताना अदानी समूहाकडून मात्र गुंतवणूकदार आणि भागधारकांना विश्वास देण्यात आला आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी खुद्द गौतम अदाणींनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. त्यात गुंतवणूकदारांचं हित सर्वात महत्त्वाचं असल्याचं गौतम अदाणींनी म्हटलं होतं. तसेच, FPO गुंडाळण्याबाबतही अदाणींनी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे अदाणींकडून कंपन्यांची पत सांभाळण्याचा प्रयत्न होत असताना समूहाचं भवितव्य नेमकं काय असणार आहे? याविषयी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे.