Holi 2024: भारतात आलेल्या विदेशी पाहुण्यांना होळी या सणाविषयी गेली अनेक शतकं विशेष आकर्षण आहे. युरोपियनांनी भारताच्या काही भागांवर राज्य करण्यास सुरुवात केली, त्यावेळेस त्यांना इथला भूगोल, निसर्ग आणि त्या अनुषंगाने साजरे होणारे सण अनाकलनीय होते. पण, त्यातही त्यांना रंगाच्या सणाचे विशेष आकर्षण वाटले. त्यामुळेच त्यांनी या सणाचे वर्णन करताना ‘हिंदूंचा कार्निव्हल’, ‘श्रीकृष्णाच्या सन्मानाचा वसंतोत्सव’ असे केले आहे. २० व्या शतकात इंग्रजी शब्दकोशांमध्ये होळी या शब्दाचा समावेश होण्यापूर्वी कित्येक दशकं आधीच परदेशी पाहुण्यांच्या नोंदीत या सणाचा होळी, हौली, हुली, हूली असा उल्लेख आढळतो. या परदेशी पाहुण्यांनी भारतीय होळीचा संबंध श्रीकृष्ण आणि गोपिका यांच्यातील प्रणय लीलेशी जोडला आहे.

राधा-कृष्ण (विकिमिडिया कॉमन्स)

अधिक वाचा: Holi 2024: ४०० वर्षांपूर्वी होळी कशी साजरी केली जात होती? काय आहे गुलाल गोटा परंपरा?

shahu Patole author of dalit Kitchen of maharashtra remarked bans on animal killings like cows and potentially donkeys wouldnt be surprising in future
भविष्यात पशु-पक्ष्यांच्या हत्येवरही बंदी आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे का म्हणाले लेखक शाहू पाटोळे
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “७० लाख मतदार अचानक…”, राहुल गांधींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Abhishek Sharma Century 2nd Fastest Hundred For India in just 37 Balls vs England
Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचं ऐतिहासिक शतक, षटकारांचा पाडला पाऊस; रोहितनंतर ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज
pune mns Office bearers and activists became Active during elections time
पुण्यात ‘मनसे’ला मराठी माणसाची पुन्हा आठवण
Police Officer mixes ash in food for devotees Viral Video
Maha Kumbh 2025 : पोलिसाने महाकुंभमेळ्यातील भाविकांसाठी शिजवल्या जाणाऱ्या अन्नात कालवली राख; Video Viral झाला अन्…

१८८६ साली हेन्री यूल आणि ए.सी. बर्नेल यांनी प्रथम प्रकाशित केलेल्या हॉबसन-जॉब्सन शब्दकोशात होळीचे वर्णन खालील प्रमाणे करण्यात आलेले आहे…

“कृष्ण आणि गोपिकांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येणारा हा एक प्रकारचा आनंदोत्सव आहे. ये- जा करणाऱ्यांना गुलालाने (लाल रंगाच्या पुडीने) रंगवले जाते किंवा पिवळ्या रंगाच्या पाण्याने भिजवले जाते. शिवाय श्रीकृष्णाच्या स्तुतीपर प्रणयप्रधान गाण्यांच्या बरोबरीने होळीच्या अग्नीभोवती फेर धरला जातो”.

होळीच्या उत्सवाचे युरोपियनांनी केलेलं दस्तऐवजीकरण हे केवळ या सणाचे वर्णन करणारे नाही, तर त्यात अनेक पैलूंचा समावेश होतो. त्यांनी भारतातील विविध जाती- जमाती आणि समुदाय यांच्यात साजऱ्या होणाऱ्या या सणाचे तपशीलवार वर्णन केले आहे. या सणाच्या निमित्ताने पाश्चात्यांनी अनुभवलेले वैचित्र्य त्यांच्या लेखांतून स्पष्ट होते. शिवाय आपल्यालाही माहीत नसलेल्या भारताच्या वेगवेगळ्या भागातील अज्ञात होलिका परंपरांचे दाखले त्यांनी आपल्या नोंदीत दिले आहेत.

एफ.एस. ग्राऊस यांच्या नोंदीतील होळी

एफ.एस. ग्राऊस हे १८७१ पासून मथुरेचे ‘जॉइंट मॅजिस्ट्रेट’ होते. ‘मथुरा मेमॉयर’ या त्यांच्या प्रसिद्ध नोंदीत त्यांनी या प्रदेशाचा इतिहास आणि संस्कृतीचे दस्तऐवजीकरण केले आहे. त्यांनी मथुरेतील होळीच्या परंपरांविषयी काही मनोरंजक तथ्ये नमूद केली आहेत. –

त्यांनी नोंद केल्याप्रमाणे “गावातील पोरं जवळून धावत राहिली, उड्या मारत, नाचत आणि लाठ्या मारत होती, तर पांडा (गावचा पुजारी) खाली जाऊन तलावात डुबकी मारून आला, त्याच्या ओल्या कपड्यांनिशी (टपकणारी पगडी आणि धोतर घेऊन) तो त्या मुलांच्या मागे धावला आणि आगीतून धावत गेला”

कॅप्टन जी.आर. हेअर्ने

ब्रिटिश अधिकारी, कॅप्टन जी.आर. हेअर्ने यांनी मथुरेच्या उत्तरेकडील भागातील उत्सवाचे दस्तऐवजीकरण केले आहे. त्यांनी या सणादरम्यान पाहिलेल्या एका आगळ्या वेगळ्या परंपरेचा उल्लेख केला आहे.

“मथुरा जिल्ह्याच्या उत्तरेकडील इतर जाट गावांमध्ये, ‘जान आणि बाथेन’ येथे होळीच्या वेळी एक विचित्र खेळ खेळला जातो. पुरुष झाडांच्या फाद्यांना स्वतःला बांधून घेतात, तर स्त्रिया कडक लाठ्या किंवा दांडे आणि पदर चेहऱ्यावर ओढून त्या फांद्यांवर जोरदार हल्ला करून ती तोडून टाकतात. जातीनिहाय या परंपरेत वैविध्य आढळून येते. शेवटी ते जोडीने आपापल्या गावात परततात, आणि गायनाचा कार्यक्रम होतो.

अधिक वाचा: होळीच्या नानाविध उत्पत्तीकथा आणि भारताची सांस्कृतिक विविधता

लुई रौसेलेट

१८६४ ते १८६८ या कालखंडा दरम्यान फ्रेंच प्रवासी, लेखक आणि छायाचित्रकार असलेल्या लुई रौसेलेट यांनी भारताला भेट दिली. त्यांनी मध्य भारतात अलवर, बडोदा, भोपाळ आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये बराच प्रवास केला. रौसेलेट यांनी त्यांच्या प्रवासाचे दस्तऐवजीकरण अनेक ग्रंथांमध्ये केले आहे. “L’Inde des Rajas: voyage dans l’Inde Centrale et dans les présidences de Bombay et du Bengale,” आणि “Les royaumes de l’Inde” अशा काही प्रसिद्ध ग्रंथांचा यात समावेश होतो. ‘इंडिया अॅण्ड इट्स नेटिव्ह प्रिन्स’ हाही त्यांचाच एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. यात त्यांनी मध्य भारतातील होळीच्या त्यांच्या अनुभवाबद्दल लिहिले आहे. त्यात त्यांनी मिरवणुकीचा संदर्भ देऊन त्यातील नृत्य, गायन, गुलाल उधळण यांचे सविस्तर वर्णन केले आहे.

“दिवसातील सर्वात उल्लेखनीय घटना म्हणजे मिरवणूक. त्यातील प्रमुख व्यक्तिमत्व एक लठ्ठ व्यापारी होता, जो पूर्णपणे नशेत होता, तो होलिकेच्या साथीदाराचे प्रतिनिधित्व करत होता. तो एका लहान गाढवावर स्वार होता, त्याचा चेहरा गेरूने माखलेला होता, त्याच्या गळ्यात एक तार होती आणि त्यात एक विचित्र वस्तू होती. त्याचे डोके फुलांनी झाकलेले होते, तो पुढे सरकत होता, त्याला दोन व्यक्तींनी आधार दिला होता. त्या मिरवणुकीत अर्धनग्न स्त्री-तसेच अमली पदार्थांचे सेवन करून धुंद झालेल्या पुरुषांचा जमाव मोठ्याने आवाज करत ओरडत होता आणि जमिनीवर लोळत होता. …आणि फुलांनी सजलेली नग्न मुले, मातीची शिंगे वाजवत समोरून धावत होती, ढोल बडवत होती. या क्रमाने मिरवणूक जत्रेतून मार्गस्थ झाली, त्या मिरवणुकीच्या समोर धुळवड/गुलालाची उधळण करण्यात आली”.

डॉ.जॉन फ्रायर यांनी केलेली नोंद

होळी सणाचे दस्तऐवजीकरण करताना, डॉ. जॉन फ्रायर यांनी त्यांच्या नोंदीत पुढील गोष्टी लिहिल्या:

“हौली हा त्यांचा दुसरा बीजकाळ आहे, मी पाहिले की त्यांनी एक संपूर्ण झाड मुळापर्यंत आणि ते सरळ होईपर्यंत फांद्या तोडल्या. हे करत असताना ते आरोळ्या देत होते. त्यानंतर ब्राह्मणाने केलेल्या कृतीचे त्यांनी अनुसरण केले. त्या फांद्या गुलाबी मंडपात आणल्या. प्रमुखाने नमस्कार केला. त्याच्याच कृतीचे इतरांचीही अनुसरण केले. नंतर ब्राह्मणाने एक खड्डा खणला, त्यात पवित्र पाण्याने प्रोक्षण केले. त्या खड्यात ते तोडलेले झाड उभे केले, त्याभोवती पताका आणि पेंढ्या बांधल्या. नंतर अग्नी प्रज्वलित करून होळी पेटवली. सर्वजण त्या पेटणाऱ्या होळीकडे उत्सुकतेने पाहत होते. नंतर त्यांनी यात तांदूळ आणि फुले अर्पण करून, शरीराला राख फासली. त्यानंतर फुलांची गदा घेऊन ढोल वाजवतात निघाले.”

विविध शतकांमध्ये भारताला भेट देणाऱ्या या युरोपियन प्रवाशांनी केलेल्या वर्णनाच्या निमित्ताने भारतातील प्रथा- परंपरांचे दस्तावेजीकरण झाले असून आजही ते आपल्याला स्वतःच्याच प्रथा- परंपरा समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण यातील काही प्रथांचे पालन आजही होते तर काही मात्र आता लोप पावल्या असल्या तरी या दस्तावेजीकरणात टिकून राहिल्या!

Story img Loader