चक्रीवादळ म्हटलं की समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना धडकीच भरते. कारण या वादळामुळे जीवितहानी तसेच वित्तहानी होते. त्यामुळे अनेकदा समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचं स्थलांतर करण्यात येतं. निसर्ग व मानवी साधनसंपत्तीची अपरिमित हानी करणाऱ्या या चक्रीवादळांचा धसका साऱ्या जगभर घेतला जातो. पण चक्रीवादळांची नावं कुतुहूलाचा विषय असतो. अनेकांना अशी नावं का दिली जातात, असा प्रश्न पडतो. रविवारी सकाळी बंगालच्या उपसागरात चक्रीवादल तयार झालं आहे. या चक्रीवादळाला असानी असं नावं दिलं गेलं आहे. त्यामुळे असानी हे नाव का दिलं गेलं असा प्रश्न विचारलं जातं आहे. असनी हे नाव श्रीलंकेनं दिलं असून त्याचा अर्थ सिंहली भाषेत ‘क्रोध’ असा होतो. असानी नंतर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला सित्रांग असे नाव दिले जाईल, हे नाव थायलंडने दिले आहे. भविष्यात वापरल्या जाणार्‍या नावांमध्ये भारतातील घुरनी, प्रोबाहो, झार आणि मुरासू या नावांचा समावेश आहे. तर बिपरजॉय (बांगलादेश), आसिफ (सौदी अरेबिया), डिक्सम (येमेन) आणि तुफान (इराण) आणि शक्ती (श्रीलंका) यांचा समावेश आहे.

चक्रीवादळाला नाव का दिलं जातं?
संयुक्त राष्ट्रांतर्गत असलेल्या जागतिक हवामान संघटनेच्या मते, एका विशिष्ट भौगोलिक स्थानावर किंवा जगभरात एकापेक्षा जास्त चक्रीवादळं येऊ शकतात. कधी कधी ही चक्रीवादळं एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकतात. त्यामुळे नुसत्या चक्रीवादळामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून गोंधळ टाळण्यासाठी, आपत्ती जोखीम जागरुकता, व्यवस्थापन आणि कमी करण्यासाठी वादळाला एक नाव दिले जाते. जगभरातील समुद्र किनाऱ्याला लागून असलेले देश तेथे निर्माण झालेल्या वादळांना नावं देतात. या नावांची यादी जिनेव्हाला जागतिक हवामान खात्याच्या कार्यालयाला पाठवली जातात. तेथूनच वादळाला नावं ठेवली जातात. चक्रीवादळाला नाव देण्याची सुरूवात अमेरिकेने १९५३ साली पहिल्यांदा केली होती. १९७८ पर्यंत चक्रीवादळास फक्त स्त्रीलिंगी नाव दिली जात होती. मात्र महिला संघटनांनी यावर आक्षेप घेतला आणि १९७८ पासून पुल्लिंगी नाव देण्यास सुरुवात झाली. भारतीय उपखंडात २००० पासून चक्रीवादळांना नावं देण्यात सुरुवात झाली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

नाव देण्यासाठी नेमलेली केंद्रे
जगभरात सहा प्रादेशिक विशेष हवामान केंद्रे आहेत आणि पाच प्रादेशिक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ चेतावणी केंद्रे आहेत. या केंद्रांना चक्रीवादळांचे नाव देणे आणि सल्ला देणे बंधनकारक आहे. भारतीय हवामान विभाग त्यापैकी एक आहे आणि उत्तर हिंद महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला ६२ किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक स्थिर पृष्ठभागाच्या वाऱ्याचा वेग गाठल्यावर त्याला शीर्षक देण्याचे काम सोपवलं आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे नाव सप्टेंबर २००४ मध्ये सुरू झाले. भारतीय हवामान विभाग उत्तर हिंद महासागरातील १३ देशांना चक्रीवादळ आणि वादळाचा सल्ला देते. भारताने याआधी वादळाला अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू हे नाव दिले होते. तसेच पाकिस्तानने फानूस, लैला, नीलम, वरदहा, तितली आणि बुलबुल असे नाव दिले होते. याच यादीच्या आधारावर ओडिशा येथील वादळाला ‘फनी’ हे नाव देण्यात आले. याच भागातील एका वादळाला ‘तितली’ नाव दिले गेले होते. नोव्हेबंर महिन्यात दक्षिण तमिळनाडू येथील वादळाला ‘ओखी’ नाव दिले होते. ते नाव देखील बांग्लादेशकडून सुचवलं गेलं होतं.

नावाबाबत लक्षात घेण्यासारखे मुद्दे
सहा विशेष हवामान केंद्राच्या विद्यमान यादीमध्ये पदनाम उपस्थित नसावे. थायलंड ओलांडून बंगालच्या उपसागरात येणाऱ्या दक्षिण चीन समुद्रातून आलेल्या वादळाचे नाव बदलले जाणार नाही. एकदा एखादे नाव वापरले की, त्याची पुनरावृत्ती केली जात नाही. जास्तीत जास्त आठ अक्षरे असलेला हा शब्द कोणत्याही सदस्य देशाला आक्षेपार्ह किंवा लोकसंख्येच्या कोणत्याही गटाच्या भावना दुखावणारा नसावा. २०२० मध्ये १३ देशांतील प्रत्येकी १३ नावांसह १६९ नावांची नवीन यादी जाहीर करण्यात आली. यापूर्वी आठ देशांनी ६४ नावे दिली होती. भारतातील नावांमध्ये गती, मेघ, आकाश यांचा समावेश आहे.

विश्लेषण : राष्ट्रभाषेचा वाद नेमका काय आहे?

चक्रवादळाचा इशारा कधी दिला जातो?
वाऱ्यांचा वेग नेमका किती आहे त्यावरून त्याला कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे, अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हणावे की वादळ ते ठरवले जाते. अर्थात जगभरातील वादळांसाठी हे निकष बदलतात. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात साधारण ४५ किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे असतील तर ते कमी दाबाचे क्षेत्र असते. पावसाळ्यात अनेकदा मुंबईच्या किनाऱ्यावर वाहणाऱ्या सोसाटय़ाच्या वाऱ्यांचा वेग एवढा असतो. त्यापुढे वाऱ्यांचा वेग ताशी ५५ किलोमीटपर्यंत पोहोचला की त्याला अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र म्हटले जाते. या क्षेत्रावर संबंधित देशांचे हवामानशास्त्र केंद्रे बारीक लक्ष ठेवून असतात. वाऱ्यांनी ६३ किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठला की हवामान केंद्राकडून चक्रीवादळाची घोषणा केली जाते.

चक्रीवादळ का तयार होते?
एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चोहोबाजूंनी वारे वाहू लागतात. समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे जमीनीच्या दिशेने वाहू लागतात. प्रत्येक वेळी वादळ तयार होतेच असे नाही, मात्र वाऱ्यांमध्ये असलेले बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळांची निर्मिती अवलंबून असते. भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे-मागे अशी स्थिती असते आणि त्यामुळे आपल्याकडे साधारण एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर यांदरम्यान बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेनचा धोका असतो. दक्षिण प्रशांत महासागरात आणि ऑस्ट्रेलियात साधारण नोव्हेंबर ते एप्रिलमध्ये वादळे येतात तर आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीलाही याच काळात वादळे धडकतात.

Story img Loader