Ahmedabad plane crash: १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाचा अपघात हा भारतातल्या सर्वात भयानक अपघातांपैकी एक ठरला आहे. एअर इंडिया १७१ बोईंग ७८७ ड्रीमलाइनर हे उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. या अपघातात एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर एकच विमान प्रवासी त्याच्या सुदैवाने बचावला आहे. खरं तर अपघात कोणताही असो, त्या अपघातावेळी अपघातग्रस्त लोकांच्या मेंदूत नेमकं काय घडत असेल हे सांगणं अवघडच. मात्र, जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत अशा भयावह घटना घडतात तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात अशाप्रकारचे प्रश्न उद्भवणं सहाजिकच आहे.

या अपघातासंदर्भात शोधकर्ते तांत्रिकरित्या नेमकी काय चूक झाली याचा सोक्षमोक्ष तर लावतच आहेत. मात्र या मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना वेगळेच प्रश्न सतावत आहेत आणि ते म्हणजे जेव्हा अपघात झाला, तेव्हा शेवटच्या काही सेकंदात विमानात प्रवास करणाऱ्या त्यांच्या प्रियजनांचे नेमके काय घडले असेल? विमान जेव्हा कोसळले तेव्हा ते शुद्धीवर होते का? या संदर्भात न्यूरोलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ आणि ट्रॉमा तज्ज्ञांशी एका वृत्तसंस्थेने संवाद साधला. यावरून शेवटच्या क्षणी मेंदू नेमकं काय अनुभवत असतो? याबाबत काही विमान अपघाताच्या उदाहरणांवरून सविस्तर जाणून घेऊ…

शेवटच्या सेकंदात मेंदूच्या हालचाली

तज्ज्ञांच्या मते, विमानाने ज्यावेळी टेकऑफ केले आणि त्यानंतर अनियंत्रित होऊन ते खाली उतरण्यास सुरुवात करताच मेंदू जगण्याची आदिम यंत्रणा सक्रिय करतो आणि अतिशय घाबरल्यामुळे मानवी शरीरातून अ‍ॅड्रेनालाईन हा हार्मोन सक्रिय होतो. अशाप्रकारच्या अपघातापूर्वीच्या शेवटच्या सेकंदात मानवी शरीर अत्यंत तणावाच्या स्थितीत प्रवेश करते. अ‍ॅड्रेनालाईन हार्मोन तयार होते, हृदयाची गती वाढते, श्वासोच्छवास जलद होतो आणि शरीरातील स्नायू ताणले जातात”, असे गाझियाबादमधील यशोदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सल्लागार मानसशास्त्रज्ञ डॉ. शोभा शर्मा यांनी सांगितले. अशावेळी मानसिकदृष्ट्या लोक जास्त सतर्कता किंवा विरोधाभासी शांतता अनुभवतात. लोकांना विचारांचा गदारोळ, अगदी शांतता किंवा अलिप्ततेची विचित्र भावना येऊ शकते. वेळ थांबल्यासारखे किंवा मंदावल्यासारखे वाटू शकते”, असेही त्या म्हणाल्या.

महत्त्वाचे मुद्दे:

  • १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात
  • सर्वात भयानक अपघातांपैकी एक
  • शेवटच्या काही सेकंदात विमानात प्रवास करणाऱ्या त्यांच्या प्रियजनांचे नेमके काय घडले असेल?
  • अतिशय घाबरल्यामुळे मानवी शरीरातून अ‍ॅड्रेनालाईन हा हार्मोन सक्रिय होतो

दिल्लीतील एका मेडिकल इन्स्टिट्यूटमधील न्यूरोलॉजीच्या संचालक डॉ. राजुल अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, “अशावेळी शरीर पूर्णपणे भीतीने ग्रासलेले असते. यात वास्तविकता अशी की अशा उच्च प्रभावाच्या परिस्थितीत मेंदूला वेदना किंवा भीतीची भावना जास्त काळासाठी अनुभवण्याचा वेळच मिळत नाही.

विमान जेव्हा आदळतं तेव्हा मेंदूला गंभीर शारीरिक अपघात होतो. परिणामांचं एकूण प्रमाण हे अपघात होताना विमानाचा वेग, विमानातील व्यक्तीचे स्थान आणि त्या व्यक्तीने सीटबेल्ट आणि इतर गोष्टींचे पालन केले होते की नाही यावरून अवलंबून असते. “मेंदूला खूप असुरक्षित मानले जाते आणि त्याच्यावरील आघात हा अतिशय भयानक ठरू शकतो, कारण मेंदू हा कवटीवर आदळण्याची शक्यता असते. त्यामुळे एखाद्याला खूप गंभीर दुखापत होऊ शकते”, अशी माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली. मेंदूला होणाऱ्या दुखापतींमध्ये डिफ्यूज अ‍ॅक्सोनल इंज्युरी म्हणजे मेंदूला होणारी एक अतिशय गंभीर दुखापत आहे. यामध्ये मेंदूच्या आतील लांब तंतू तुटतात किंवा फाटतात. ही दुखापत मेंदू जोरात हलल्याने किंवा फिरल्याने होते.

चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलमधील आपत्कालीन प्रतिसाद विभागाचे प्रमुख डॉ. धवपलानी अलागप्पन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाला आग लागण्यापूर्वी बहुतेक लोक बेशुद्ध पडल्याची शक्यता जास्त आहे. “उंची आणि वेगामुळे मेंदू आणि मानवी शरीराच्या इतर भागांवर मोठा आघात झाला असेल. डोक्यावर होणारे परिणाम अतिशय गंभीर असतात. काही लोकांना शेवटच्या क्षणापर्यंत जाणीव असते, मात्र काहींना आधीच जाणीव झालेली असते की आता हातात काहीच नाही.” हे वैज्ञानिकदृष्ट्या स्पष्ट करताना फरीदाबाद इथल्या हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. आनंद बालसुब्रमण्यम म्हणाले की, “विमान कोसळण्याच्या दरम्यान अंतर्गत अवयवांवर अचानक हल्ला होतो, संवेग भिन्नतेमुळे न्यूरॉन्स तुटतात.” असं असताना खरी परिस्थिती क्रॅश डायनॅमिक्सवर अवलंबून असते. काही वेळा बळी पडणारे आघात होईपर्यंत बेशुद्ध होऊ शकतात. तसंच केबिनमध्ये अति डिप्रेशनमुळे अचानक हायपक्सियामुळे काही सेकंदातच शुद्ध हरपू शकते.”

याबाबत बोलताना डॉ. बालसुब्रमण्यम यांनी मलेशिया एअरलाइन्सच्या फ्लाइट MH17चा संदर्भ दिला. २०१४ मधील एका अपघातात काही प्रवासी अंतिम धडकेपूर्वी काही काळ शुद्धीत राहिले असावेत. २००९ मध्ये एअर फ्रान्स फ्लाइट ४४७ मध्येही असाच प्रकार घडला होता. या प्रकरणात विमान हवेतच थांबले होते आणि खाली उतरण्यास तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला, त्यामुळे प्रवाशांना पडताना अक्षरश: जाणीव होत होती आणि त्यामुळेच मानसिक आघात अधिक वाढला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाणीव होणे हे अपघात कसा झाला यावर अवलंबून असते. बहुतेक उच्च प्रवेगातल्या घटनांमुळे तत्काळ चेतना हरपतात, कारण मंद गतीने सुरू होणाऱ्या परिस्थितीमुळे शेवटपर्यंत जाणीव होऊ शकते”, असे बालसुब्रमण्यम पुढे म्हणाले. अपघातग्रस्त व्यक्ती जागरूक राहते की नाही हे पूर्णपणे अपघाताच्या गतिमानतेवर अवलंबून असते. तज्ज्ञांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीप्रमाणे, एअर इंडिया दुर्घटनेनंतर अंतर्गत घडलेल्या भयावह वास्तवाचे आकलन करता आल्यास पीडितांच्या कुटुंबासाठी आणि अपघातातून बचावलेल्या विश्वास कुमार रमेशसाठी एक सपोर्ट मेकॅनिझम तयार करता येईल, यामुळे विमान वाहतूक सुरक्षा व्यवस्थेलाही मार्गदर्शन होऊ शकते