इटलीच्या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या सत्ताधारी पक्षाला युरोपीय महासंघाच्या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळाली. यामुळे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थान उंचावणार आहे. कारण युरोपातील त्यांचे अनेक सहकारी राष्ट्रप्रमुख स्थानिक प्रश्नांनी बेजार बनले आहे. सध्या जी-७ राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेचे यजमानपद इटलीकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही या परिषदेस निमंत्रित म्हणून जात आहेत.

मेलोनी यांच्या पक्षाची कामगिरी

‘ब्रदर्स ऑफ इटली’ हा इटलीचा उजव्या विचारसरणीचा सत्ताधारी पक्ष आहे. या पक्षाने २८.८ टक्के मते मिळवली. गेल्या निवडणुकीतील, हे यश म्हणजे २०१९च्या निवडणुकीपेक्षा चौपटीपेक्षा जास्त आहे. इतकेच नाही तर २०२२मध्ये इटलीतील सार्वत्रिक निवडणुकीत या ‘ब्रदर्स ऑफ इटली’ला २६ टक्के मिळाली होती. त्यापेक्षा युरोपीय महासंघाच्या निवडणुकीतील त्यांची कामगिरी सरस आहे. मुख्य म्हणजे या पक्षाने या निवडणुकीत इतर कोणत्याही पक्षापेक्षा जास्त मते मिळवली आहेत. ‘ब्रदर्स ऑफ इटली’च्या नेतृत्वाखालील मध्यम उजव्या ते अतिउजव्या पक्षांच्या आघाडीला मिळालेल्या मतांमध्येही वाढ झाली. २०२२च्या पार्लमेंटरी निवडणुकीत त्यांना ४३ टक्के मते मिळाली होती, त्यामध्ये आता चार टक्क्यांची भर पडली आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
jagannath temple door opens bjp government
सरकार स्थापन होताच जगन्नाथ पुरी मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याला भाजपाने दिले प्राधान्य; या दरवाजांचे महत्त्व काय?
why newzealand people leaving country
न्यूझीलंडच्या नागरिकांचे ऑस्ट्रेलियात स्थलांतर; कारण काय?
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
case against Hunter Biden and could he go to ja
वहिनीसोबतचे प्रेमसंबंध, त्यातून घोटाळे; जो बायडेन यांच्या मुलाला शिक्षा; पण तो तुरुंगात जाईल का?
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
Terror Attacks in Jammu and Kashmir,
अग्रलेख : दहशत आणि दानत!

हेही वाचा… लोकसभेवर निवडून आलेल्या राज्यसभा सदस्यांना आणि आमदारांना राजीनामा द्यावा लागतो का? दोन लोकसभा जागांबाबत तरतूद काय?

युरोपीय महासंघातील स्थान

युरोपीय महासंघात मिळालेल्या मतांच्या टक्केवारीनुसार जागा मिळतात. या निकालामुळे महासंघाच्या ७२० जागांपैकी ‘ब्रदर्स ऑफ इटली’ या पक्षाला २३ ते २५ जागा मिळतील. मागील वेळी, म्हणजे २०१९मध्ये त्यांना केवळ सहा जागा मिळाल्या होत्या आणि त्यांची ओळख एक किरकोळ विरोधी पक्ष इतकीच होती.

मेलोनी यांचा फायदा

या निकालामुळे मेलोनी यांचे राजकीय स्थान अधिक मजबूत होणार आहे. देशांतर्गत राजकारणात अधिक मजबूत नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या पक्षाच्या कामगिरीची दखल सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. देशांतर्गत परिस्थितीचा विचार करायचा झाला तर, इटलीच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे २०२५चा अर्थसंकल्पही इटलीच्या जनतेसाठी फारसा आनंददायक नसेल असा अंदाज आहे. या निवडणुकीत नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मेलोनी यांच्या सरकारला अधिक कठोरपणे आर्थिक परिस्थिती हाताळता येणे शक्य होणार आहे.

हेही वाचा… विश्लेषण : ‘एमपीएससी’च्या परीक्षा का लांबल्या? नियोजन बिघडल्याने विद्यार्थी चिंतेत? 

मेलोनी यांचा आत्मविश्वास

या यशामुळे मेलोनी यांचा आत्मविश्वास वाढला आहे असे त्यांनी तेथील रेडिओला दिलेल्या मुलाखतीवरून दिसून येते. मिळालेल्या यशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, मला जी-७मध्ये इटलीचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान वाटत आहे. युरोपमधील आमचे सरकार सर्वात मजबूत आहे, यापूर्वी हे घडले नव्हते, पण आता घडत आहे. ही समाधानाची बाब आहे, त्याबरोबरच मोठी जबाबदारीसुद्धा आहे. यामुळे सत्ताधारी आघाडीची ताकदही वाढेल असा त्यांना विश्वास आहे. हा निकाल असामान्य आहे आणि त्याचा वापर भविष्यासाठी इंधन म्हणून करण्याची जाहीर प्रतिज्ञाही त्यांनी केली.

मेलोनी यांचे सामर्थ्य

इटलीचा सत्ताधारी पक्ष घरच्या आघाडीवर कडवा असला तरी खुद्द मेलोनी यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःची प्रतिमा मवाळ अशी ठेवली आहे. पूर्वी त्या युरोपीय महासंघाच्या विरोधात होत्या आणि तशी वक्तव्येही जाहीरपणे करत असत. आता मात्र, त्यांनी आपल्या भूमिकेला मुरड घातली आहे. युरोपीय महासंघाविरोधी काही बोलणे त्यांनी बंद केले आहे आणि स्थानिक राजकारणात स्वतःची प्रतिमा मध्यममार्गी उजवे आणि त्यांचा स्वतःचा पुराणमतवादी गट यांच्यादरम्यान दुवा सांधणारा नेता अशी घडवली आहे. विशेषतः या निवडणुकीच्या निमित्ताने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ आणि जर्मनीचे चान्सेलर ओलाफ शोल्झ यांना त्यांच्या देशात जो धक्का मिळाला त्या पार्श्वभूमीवर मेलोनी यांचे यश अधिक उठून दिसते.

हेही वाचा… विश्लेषण : अमेरिकेच्या ‘फर्स्ट सन’ला तुरुंगात जावे लागणार?

इटलीमधील अन्य पक्षांची कामगिरी

इटलीमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेला डेमोक्रॅटिक पार्टी मध्याकडे झुकलेला डावा पक्ष आहे. त्यांना २४ टक्के मते मिळाली. आणखी एक विरोधी पक्ष फाईव्ह-स्टार मूव्हमेंटला ९.९८ टक्के मते मिळाली. फोर्जा इटालिया या आघाडीला ९.५९ टक्के, लीगा साल्विनी प्रीमियर ९.१ टक्के मते मिळाली. इटलीमधील सर्वच उजवे पक्ष स्थलांतरितांच्या विरोधात आहेत. त्यापैकी लीगा अधिक कट्टर मानला जातो. मात्र, इटलीत मतदान कमी म्हणजे जेमतेम ५० टक्के झाले ही ‘ब्रदर्स ऑफ इटली’सह सर्व पक्षांना निराश करणारी समान बाब आहे.

भारताशी घनिष्ठ मैत्रीची शक्यता

मेलोनी यांना मोदींविषयी अतिशय आदर आहे. या दोहोंच्या स्नेहभावावरून ‘मेलोडी’ हा हॅशटॅगही व्हायरल झाला होता. मोदी यांचे काही राष्ट्रप्रमुखांशी घनिष्ठ संबंध आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, फ्रान्सचे अध्यक्ष इमानुएल माक्राँ अशांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. मेलोनी या दोन वेळा भारतात येऊन गेल्या आहेत. त्यादेखील मोदी यांच्या मित्रपरिवारामध्ये दाखल झाल्याचे बोलले जाते. मोदींच्या विद्यमान दौऱ्यात दोन देशांदरम्यान संबंध वृद्धिंगत होतील, अशी अपेक्षा आहे.

nima.patil@expressindia.com