scorecardresearch

Premium

विश्लेषण: वायरलेस चार्जिंग कसं काम करतं? मोबाईल बॅटरीवर परिणाम होतो का? जाणून घ्या

वायरलेस चार्जर नेमका कसा काम करतो असा प्रश्न सामन्यांना पडला आहे. यामुळे मोबाईलची बॅटरी खराब होत नाही ना, अशीही चिंता सतावत आहे.

Wireless_Charger
विश्लेषण: वायरलेस चार्जिंग कसं काम करतं? मोबाईल बॅटरीवर परिणाम होतो का? जाणून घ्या

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र मोबाईल हाताळताना सर्वाधिक समस्या असते फोन चार्जिंगची. त्यात खूपच अडचण असली की बाहेर कुठेतरी आपल्या मोबाईलचा चार्जर मिळणं कठीण असतं. नुकताच युरोपियन युनियनमध्ये सिंगल मोबाईल चार्जरचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे वायरलेस मोबाईल चार्जिंगसाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे वायरलेस चार्जर नेमका कसा काम करतो असा प्रश्न सामन्यांना पडला आहे. यामुळे मोबाईलची बॅटरी खराब होत नाही ना, अशीही चिंता सतावत आहे.

वायरलेस चार्जिंग कसं काम करतं?
वायरलेस चार्जिंग करताना चार्जरमधून इलेक्ट्रिक ऊर्जा स्मार्टफोनमध्ये हस्तांतरित करण्यासाठी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वापरतात. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणारा स्मार्टफोन आणि एक सुसंगत वायरलेस चार्जर आवश्यक आहे. फोन आणि चार्जर दोघांनाही कॉपर कॉइलची गरज असते. जेव्हा तुम्ही वायरलेस चार्जरवर स्मार्टफोन ठेवता तेव्हा चुंबकीय क्षेत्र स्मार्टफोनच्या आत असलेल्या तांब्याच्या कॉइलच्या संपर्कात येते. चुंबकीय क्षेत्र नंतर विद्युत ऊर्जा निर्माण करते. तयार होणाऱ्या विद्युत प्रवाहाने बॅटरी चार्ज होते. वायरलेस चार्जिंगच्या या प्रकाराला टाइट-कपल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्जिंग म्हणतात. या तंत्रज्ञानासाठी दोन तांब्याचा कॉइल जवळ असणं असणं आवश्यक आहे. म्हणजेच पृष्ठभागावर ठेवल्यानंतर चार्जिंगची प्रक्रिया सुरु होते. दुसरीकडे, वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञानाचे आणखी काही प्रकार आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी आधारित चार्जिंग काही फूट अंतरावर वायरलेस पद्धतीने गॅझेट चार्ज करू शकते, तर लूज-कपल्ड रेझोनान्स चार्जिंग काही सेंटीमीटर अंतरापर्यंत चार्जिंग करू शकते. रेडिओ फ्रिक्वेन्सी चार्जिंगचा वापर करून वापरकर्ते भविष्यात चार्जर जवळ न जाता त्यांचा फोन चार्ज करू शकतील.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
supriya sule on sunetra pawar baramati loksabha election
बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार? सुप्रिया सुळेंनी केलं स्वागत, म्हणाल्या…
bachchu kadu on pankaja munde
“…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
supriya sule raj thackeray
“राज ठाकरेंचं कौतुक करते, कारण…”, सुप्रिया सुळे यांचं विधान

वायर्ड चार्जिंगपेक्षा वायरलेस चार्जिंग जास्त उष्णता निर्माण करते का?
वायरलेस चार्जिंग दरम्यान अधिक उष्णता निर्माण होते, वायरलेस चार्जिंगमध्ये पारंपारिक वायर्ड चार्जिंगपेक्षा जास्त उष्णता निर्माण होत असल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. वायरलेस चार्जिंगद्वारे निर्माण होणारी उष्णता योग्यरित्या व्यवस्थापित न केल्यास स्मार्टफोनचे नुकसान होऊ शकते. Qi सारख्या वायरलेस चार्जिंग मानकांमध्ये अशा समस्यांना तोंड देण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. Qi-प्रमाणित म्हणून पात्र असलेले वायरलेस चार्जर उष्णता हाताळण्यासाठी चार्जिंग गतीचे नियमन करतात. जेव्हा Qi-प्रमाणित वायरलेस चार्जर जास्त उष्णता शोधतात तेव्हा ते चार्जिंग गती कमी करते. लोअर एनर्जी आउटपुट कमी उष्णता निर्माण करते जे तुमच्या फोनला बॅटरीच्या नुकसानीपासून वाचवते. दुसरीकडे, वायरलेस चार्जिंग फोनमधील कॉपर कॉइल गरम करते आणि बॅटरी नाही. त्यामुळे, वायर्ड चार्जिंगपेक्षा वायरलेस चार्जिंग किरकोळ जास्त उष्णता निर्माण करते, मात्र त्यामुळे तुमच्या फोनच्या बॅटरीला धोका निर्माण होत नाही.

EU Deal: एक देश एक मोबाईल चार्जिंग पोर्ट!, वर्षाअखेरीस करार होण्याची शक्यता

वायर्ड चार्जिंगपेक्षा वायरलेस चार्जिंग कमी कार्यक्षम आहे?
वायर्ड चार्जिंगपेक्षा वायरलेस चार्जिंग कमी कार्यक्षम आणि अधिक ऊर्जा घेणारे आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की वायर्ड चार्जिंगपेक्षा वायरलेस चार्जिंग सरासरी ४७ टक्के जास्त पॉवर वापरते. त्यामुळे अतिरिक्त वीज वापरामुळे बिलात किंचित वाढ होईल.

WhatsApp यूजर्सही फेसबुकप्रमाणे कव्हर फोटो ठेवू शकतील, जाणून घ्या काय आहे अपडेट

वायरलेस चार्जिंगचा तुमच्या स्मार्टफोनच्या बॅटरीवर परिणाम होतो का?
वायरलेस चार्जिंगमुळे बॅटरीला कोणतीही इजा होत नाही. वायरलेस चार्जिंग वाईट असल्याची कल्पना केवळ एक मिथक आहे. वायरलेस चार्जिंग वायर्ड चार्जिंगपेक्षा जास्त उष्णता निर्माण करते. त्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होते, असा गैरसमज आहे. वायरलेस चार्जिंग देखील नियमित वायर्ड चार्जिंगपेक्षा बॅटरी चार्ज सायकलवर परिणाम करत नाही. फोन दिवसातून अनेक वेळा चार्ज न केल्यास वायरलेस चार्जिंगचा तुमच्या फोनच्या बॅटरीवर परिणाम होणार नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2022 at 16:05 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×