कर्नाटकातील तीन होयसळा काळातील मंदिरे नुकतीच ‘सेक्रेड एन्सेम्बल्स ऑफ द होयसळास’च्या एकत्रित नोंदी अंतर्गत, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. होयसळा मंदिरे त्यांच्या भिंतीवरील शिल्पांच्या दुर्मिळ सौंदर्य आणि कला कौशल्यासाठी ओळखली जातात. तसेच हस्तिदंतावर किंवा सोन्यावर काम करणाऱ्या कारागिरांच्या कला कौशल्याची पद्धत या मंदिरांच्या दगडातील भिंतींवर शिल्प कोरताना वापरण्यात आली आहे, असा वैशिष्ट्यपूर्ण उल्लेख या मंदिरांच्या शिल्पकामासंदर्भात केला जातो.

मूलतः ही तीनही मंदिरे इसवी सनाच्या १२ व्या आणि १३ व्या शतकात बांधलेली आहेत. त्यांचे बांधकाम उत्कृष्ट कौशल्याचा नमुना आहे. केवळ याच कारणासाठी या तीन मंदिरांची युनेस्कोच्या यादीत निवड झाली असे नाही, तर या मंदिराच्या स्थापत्य रचनेत ज्या राजवंशांनी मोलाची भूमिका बजावली; त्या राजवंशाचा इतिहासही तितकाच मोलाचा ठरतो. त्यामुळेच आजही उभी असलेली ही मंदिरे तत्कालीन राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक इतिहास समजून घेण्यास मदत करतात. याच कारणांमुळे आज जागतिक वारसाच्या यादीत कर्नाटकातील तीन मंदिरांची नोंद करण्यात आली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

युनेस्कोच्या यादीसाठी निवडलेली तीन होयसळा मंदिरे कोणती आहेत?

या तीन मंदिरांमध्ये बेलूरमधील चेन्नकेशव मंदिर, हळेबिडू येथील होयसळेश्वर मंदिर आणि सोमनाथपुरा येथील केशव मंदिर यांचा समावेश आहे. युनेस्कोने १८ सप्टेंबर रोजी रियाध, सौदी अरेबिया येथे जागतिक वारसा समितीच्या ४५ व्या सत्रादरम्यान ही घोषणा केली. भारताने जानेवारी २०२२ मध्ये या मंदिरांच्या नामांकनासाठी कागदपत्रे सादर केली होती.

आणखी वाचा: चातुर्मास: सूर्याच्या उपासनेचा भारतीय उपखंडातील इतिहास!

होयसळ कोण होते?
कर्नाटकात १०व्या शतकापासून ते १४व्या शतकापर्यंत होयसळांची सत्ता होती. पश्चिम चालुक्यांच्या अधिपत्याखाली (प्रांतीय) मांडलिक म्हणून या घराण्याची सुरुवात झाली, परंतु दक्षिणेकडील दोन प्रबळ साम्राज्ये, पश्चिम चालुक्य आणि चोल ही पराभूत झाल्याने होयसळांनी स्वतःला शासक म्हणून स्थापित केले. युनेस्कोच्या यादीत स्थान मिळविणाऱ्या तीन मादिरांपैकी दोन मंदिरे होयसळांची राजधानी असलेल्या पूर्वी बेलूर आणि नंतर हळेबिडू (किंवा द्वारसमुद्र) या शहरांमध्ये आहेत.

ही मंदिरे कोणत्या काळात बांधली गेली?

चेन्नकेशव मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. पराक्रमी होयसळ राजा विष्णुवर्धन याने चोलांवर विजय मिळवण्यासाठी १११७ च्या सुमारास हे मंदिर बांधले. त्यामुळे याला विजय नारायण मंदिर असेही म्हणतात. दुसरे वैष्णव मंदिर, केशव मंदिर, सोमनाथपुरा येथे १२६८ मध्ये होयसळा राजा नरसिंह तिसरा याच्या सोमनाथान नावाच्या सेनापतीने बांधले होते. हळेबिडू येथील होयसळेश्वर मंदिर हे होयसळांनी बांधलेले सर्वात मोठे शिवमंदिर मानले जाते, ते १२व्या शतकातील आहे.

आणखी वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक उल्लेख केलेल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा इतिहास काय?

होयसळा स्थापत्य कलेचे वेगळेपण

होयसळा स्थापत्यकलेचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे सोप स्टोनचा वापर, या दगडावर कोरीव काम करणे सोपे असल्याचे मानले जाते. मंदिराच्या भिंतींवर दिसणार्‍या गुंतागुंतीच्या शिल्पांची विपुलता आणि वैविध्यता या मागे हे एक कारण आहे. शिल्पांमध्ये प्राणी, दैनंदिन जीवनातील दृश्ये, तसेच महाकाव्ये आणि पुराणांमधील चित्रणांचा समावेश आहे. तपशीलवार शिल्पातील दागिने, शिरोभूषणे, कपडे इत्यादींवरून तत्कालीन समाजाविषयी माहिती मिळण्यास मदत होते.

होयसळा वास्तुकलेचे वैशिष्ट्य – विविध शैलींचा अनोखा संगम

आंध्र प्रदेशच्या श्री शहरातील क्रिया विद्यापीठातील इतिहासकार पृथ्वी दत्ता चंद्र शोभी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “होयसळा वास्तुकला तीन विशिष्ट शैलींचे एकत्रित समीकरण आहे. या होयसळाकालीन मंदिर स्थापत्यावर पल्लव तसेच चोल या दोन प्रसिद्ध राजवंशाच्या द्राविड पद्धतीच्या मंदिर स्थापत्याचा प्रभाव आढळतो. तसेच चालुक्य आणि राष्ट्रकूट मंदिरांमध्ये दिसणाऱ्या वेसर मंदिर स्थापत्याचाही प्रभाव या मंदिरांवर आहे. याशिवाय उत्तरेकडील नागर मंदिर स्थापत्याचाही प्रभाव आहे. म्हणजेच द्राविड, नागर आणि वेसर या भारताच्या वेगवेगळ्या भागात विकसित झालेल्या मंदिर स्थापत्याचा प्रभाव या होयसळाकालीन मंदिरांवर दिसून येतो.

एकूणात, ही मंदिरे संपूर्ण भारताच्याच मंदिर स्थापत्याचे प्रतिनिधित्त्व करतात असे म्हटल्यास खोटे ठरू नये. यामागील मुख्य कारण म्हणजे होयसळांनी हाती घेतलेल्या वेगवेगळ्या मोहिमा. या मोहिमांच्या माध्यमातून त्यांचा वेगवेगळ्या भू भागाशी परिचय झाला, तसेच त्यांनी या भागांमधून त्यांच्याकडील मंदिर स्थापत्याला हातभार लावणाऱ्या गवंडी, शिल्पकार, वास्तुविशारद यांना आपल्या राज्यात आणले.

ही मंदिरे सामान्यत: ताऱ्याच्या आकाराच्या (ताऱ्याच्या आकाराच्या) मंचकावर (अधिष्ठानावर) बांधली जातात तसेच मंदिराच्या आवारात अनेक वेगवेगळ्या रचना साकारल्या जातात. मंदिरांच्या भिंती आणि खांब सुंदर शिल्पांनी सुशोभित केलेले असतात, शोभी यांच्या मते, या मंदिरांवरील कोरीव काम समृद्ध तसेच परिणामकारक आहे. होयसळा मंदिरांचे एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे शिल्पकार, गवंडी त्यांची नावे आणि काहीवेळा इतर काही तपशील त्यांनी मंदिरांच्या भिंतींवर कोरीव स्वरुपात मागे ठेवलेला आहे. विशेष म्हणजे या मंदिरांच्या बांधकामाच्या वेळेस या प्रांतामध्ये जैन धर्माचे प्राबल्य होते, या मंदिरांच्या बांधकामामुळे या प्रदेशातील जनता पुन्हा एकदा हिंदू धर्माकडे वळली.

युनेस्कोच्या यादीतील तीन मंदिरे कशामुळे खास आहेत?

शेकडो मोठी आणि छोटी होयसळाकालीन मंदिरे अजूनही टिकून आहेत, ही तीन मंदिरे होयसळा कलेची सर्वोत्तम जिवंत उदाहरणे मानली जातात. बेलूर येथील चेन्नकेशव मंदिराविषयी के. ए. नीलकांत शास्त्री त्यांच्या ‘ए हिस्ट्री ऑफ साऊथ इंडिया’मध्ये लिहितात, “… या मंदिरात एकूण खांबांची संख्या ४६आहे. मध्य भागातील चार खांब वगळता इतर सर्व वेगवेगळ्या रचनांचे आहेत, या खांबांची विविधता आणि संपूर्ण गुंतागुंत आश्चर्यकारक आहे.” या शिवाय मंदिरातील दर्पण सुंदरी हीचे शिल्प या मंदिराच्या बांधकामासाठी कारणीभूत असलेल्या राजा विष्णुवर्धनाची राणी शांतला देवी हिच्यावरून साकारलेले आहे. सोमनाथपुरामधील केशव मंदिरात केशव, जनार्दन आणि वेणुगोपाल यांना समर्पित तीन मंदिरे आहेत. दुर्दैवाने केशवाची प्रतिमा आज तेथे नाही. दिल्लीचा तत्कालीन सुलतान अल्लाउद्दीन खिल्जीचा सेनापती मलिक काफूर याने हळेबिडूवर हल्ला केला होता.

मंदिरांशिवाय इतर होयसळा वास्तू का टिकल्या नाहीत?

मंदिरांशिवाय इतर कोणतीही होयसाळाकालीन ज्ञात स्मारके, जसे की राजवाडे किंवा किल्ले अस्तित्वात नाहीत. शोभी यांनी नमूद केले की, हे होयसळांसाठी हे काही वेगळे नव्हते. “मध्ययुगीन काळात मंदिरे वगळता इतर वास्तूंच्या बांधकामासाठी दगडाचा वापर पूर्णत्त्वाने केला गेला नाही, इतर वास्तूंचे बांधकाम हे विटा, लाकूड यांच्या मदतीने झाले होते. त्यामुळे हंपीत काही अवशेष सोडले तर (इतर) वास्तुकलेच्या स्वरूपात काहीही टिकले नाही.” शोभी यांनी लक्ष वेधले की हजारो वर्षांपासून मंदिरे टिकून राहणे ही एक अतिशय लक्षवेधक वस्तुस्थिती आहे . “जेव्हा आपण स्थापत्य वारशाची काळजी का घ्यावी याचे परीक्षण करतो, तेव्हा त्यातील एक भाग अर्थातच सौंदर्य आणि भव्यता आहे. तर दुसरा भाग असा आहे, जो टिकत नाही.

१३ व्या शतकाच्या पूर्वार्धात मलिक काफूरने हळेबिडूवर आक्रमण केले होते. त्यानंतर सुमारे २०० वर्षांनंतर दख्खन सुलतानाचे राज्य आले. असे काही विभाग आहेत जे वारंवार मंदिरे कशाप्रकारे परकीय आक्रमणात उध्वस्त झाली हे सांगतात, परंतु इतक्या वर्षांमध्ये मंदिराच्या सभोवतालची वस्ती, वास्तू नष्ट झाल्या, परंतु मंदिरे तशीच का? याचे उत्तर मात्र देत नाहीत.

Story img Loader