Buddha from ancient Egypt, बौद्ध तत्त्वज्ञानाने संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. आज आपल्याकडे संपर्काची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय बौद्ध धर्म हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. हे जरी खरे असले तरी प्राचीन काळात भारताबाहेरील इतर देशांना बौद्ध धर्माचे आकर्षण होते, हेही संशोधनातून सिद्ध झाले आहे. प्राचीन जगाला भारतीय बौद्धधर्माची भुरळ पडली होती, हे सांगणारे पुरावे इजिप्त येथे झालेल्या पुरातत्त्वीय सर्वेक्षणात अलीकडेच समोर आले आहेत. इजिप्त येथे एका मंदिरात ‘गौतम बुद्ध’ यांची मूर्ती सापडल्याची नोंद पुरातत्त्व अभ्यासकांनी केली आहे. अशा प्रकारे इजिप्तसारख्या प्राचीन संस्कृती असलेल्या देशामध्ये सापडलेली ही बुद्ध मूर्ती प्राचीन भारत व इजिप्त यांच्यातील दृढ संबंधांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करते.

भारत व इजिप्त यांच्यातील प्राचीन संबंध

संपूर्ण जगात इजिप्त, चीन, भारत, मेसोपोटेमिया या चार सर्वात प्राचीन संस्कृती आहेत. इतकेच नव्हे तर या चारही संस्कृती आपल्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहेत. या संस्कृतींमध्ये परस्पर संबंध असल्याचे पुरातत्त्वीय सर्वेक्षणात उघड झाले आहे. भारतीय सिंधु संस्कृती व इजिप्त यांच्यात व्यापारी संबंध होते. म्हणजेच भारत व इजिप्त यांच्यात इसवी सन पूर्व ३००० वर्षांपासून संबंध असल्याचे उघड आहे. हा सिंधु (हडप्पा) संस्कृतीकालीन संदर्भ असला तरी भारत व इजिप्त यांच्यातील संबंध त्यानंतरसुद्धा सुरू असल्याचे उघड आहे. इजिप्त हा भाग प्राचीन व्यापारी मार्गावर स्थित आहे. रोमन साम्राज्य इसवी सनाच्या पहिल्या शतकात इजिप्तमध्ये अस्तित्त्वात आल्याचे ऐतिहासिक पुराव्यांमुळे कळते. इजिप्तने रोमन साम्राज्याला भारतासह प्राचीन जगाच्या इतर अनेक भागांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते.

Kartarpur Sahib gurdwara PM Modi statement to take Kartarpur Sahib back
“‘कर्तारपूर’ १९७१ मध्येच भारतात आला असता”; मोदींच्या दाव्यातील गुरुद्वाराचा काय आहे इतिहास?
What is animal diplomacy orangutan diplomacy in Malaysia
काय आहे मलेशियाची ‘अ‍ॅनिमल डिप्लोमसी’? तिची जगभरात चर्चा का होतेय?
Loksatta UPSC Key
यूपीएससी सूत्र : व्हेनेझुएलातून लुप्त झालेल्या हिमनद्या अन् भारतीय वंशाच्या व्यक्तीचं पहिलंवहिलं अंतराळ पर्यटन; वाचा सविस्तर…
xenotransplantation
डुकराची किडनी प्रत्यारोपित केलेल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू; विज्ञानाचा चमत्कार मानले जाणारे झेनोट्रांसप्लांटेशन आहे तरी काय?
Loksatta kutuhal Artificial intelligence and chess
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिबळ
cancer history origin
‘कॅन्सर’ हे नाव आलं कुठून? प्राचीन काळात कर्करोगावर कोणते उपचार केले जायचे?
book review the beast you are stories by paul tremblay
बुकमार्क : आजच्या काळातील भयकथा
india s gold demand rises 8 percent in jan march despite increase in prices
चढ्या दरानंतरही देशात सोन्याच्या मागणीत वाढ; तिमाहीत आठ टक्क्यांनी वाढून १३६.६ टनांवर

आणखी वाचा: विश्लेषण: बुद्ध पौर्णिमा २०२३- भारतात सर्वाधिक बौद्ध लेणी का आढळतात?

आशिया व युरोपला जोडणारे इजिप्त

इजिप्तच्या लाल समुद्राच्या किनाऱ्यावर अनेक प्राचीन बंदरे होती. या बंदरांनी इजिप्तमार्गे चालणाऱ्या रोम साम्राज्याच्या व्यापारात मोलाची भूमिका बजावली. याच बंदरांच्या यादीतील बेरेनिक हे मुख्य बंदर होते. इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकापासून हे समृद्ध बंदर म्हणून नावाजलेले होते. भारतीय व्यापारी जहाजे या बंदरावर माल उतार होत असत. काळीमिरी, मौल्यवान खडक- खनिजे, सूती कापड, हस्तिदंत या भारतीय वस्तूंना रोम साम्राज्यात विशेष मागणी होती. या बंदरांवर उतरवण्यात येणारा व्यापारी माल हा उंटाच्या मदतीने नाईलच्या वाळवंटात पोहचविण्यात येत होता. काही व्यापारी जहाजे अलेक्झांड्रिया बंदराकडे पाठविण्यात येत असत. अलेक्झांड्रिया हे बंदर इजिप्तच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर, नाईल डेल्टाच्या पश्चिमेस स्थित आहे. तेथून इतर रोमन साम्राज्यात बेरेनिक या बंदरावर आलेला व्यापारी माल पोहचविण्यात येत होता. एकूणच इजिप्तने आशिया व युरोप यांना व्यापारी मार्गाने जोडण्याचे काम केले होते. प्रसिद्ध पुरातज्ज्ञ साइडबोथम यांनी स्मिथसोनियन मासिकाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की “तुम्ही आज जागतिकीकरणाबद्दल बरेच काही ऐकता, परंतु इसवी सनाच्या पहिल्या शतकात युरोप, आफ्रिका आणि आशिया यांना जोडणारी ‘जागतिक अर्थव्यवस्था’ होती आणि बेरेनिक शहर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे”.

इजिप्तमध्ये सापडलेली बुद्ध मूर्ती

बेरेनिक या परिसरात अमेरिकन व पोलिश संशोधकांनी केलेल्या संयुक्त उत्खननात या बंदराची प्राचीनता सिद्ध करणारे अनेक पुरावे उघडकीस आले आहे. आयसिस मंदिरातील उत्खननास मुख्यतः फ्रिट्झ थिसेन फाऊंडेशनने वित्तपुरवठा केला आहे. इजिप्शियन पर्यटन आणि पुरावस्तू मंत्रालयाच्या सहकार्याने डेलावेअर विद्यापीठाचे स्टीव्हन साइडबोथम आणि पोलिश सेंटर ऑफ मेडिटेरेनियन आर्किऑलॉजी, युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्साचे मारियस ग्विझदा यांनी या पोलिश-अमेरिकन पुरातत्त्वीय मोहिमेचे सह-निर्देशन केले होते. मूलतः स्टीव्हन साइडबोथम यांनी १९९४ सालापासून या स्थळावर उत्खनन करण्यास सुरूवात केली होती. १९९९ साली त्यांना काळ्यामिरींनी भरलेले मातीचे मोठे भांडे (जार) मिळाले होते. हे जार बेरेनिक येथे सापडलेल्या मंदिराच्या जमिनीत सापडले होते. याचा काळ इसवीसन पहिले शतक असावा असे अभ्यासक मानतात.
याच भागात नव्याने समोर आलेल्या बुद्ध मूर्तीने संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे वेधले गेले आहे. रॉडनी अस्ट या हेडेलबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञाने आपल्या चमूसह या भागात सर्वेक्षण करत असताना गौतम बुद्ध यांची मूर्ती आयसिस या देवतेच्या मंदिरात असल्याचे नोंदविले. त्यामुळे भारतीय गौतम बुद्धाची मूर्ती या मंदिरात कशी असा प्रश्न विचारला जात आहे. मुळात या मूर्तीचा शोध २०२२ सालच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लागला होता. परंतु इजिप्तच्या सुप्रीम कौन्सिल ऑफ अँटिक्विटीजने या सापडलेल्या मूर्तीची घोषणा या वर्षी केली आहे.

आणखी वाचा: विश्लेषण:Global Buddhist Summit 2023 चीन, भूराजकीय मुद्दे आणि ‘बौद्ध मुत्सद्देगिरी’!

इजिप्तमधील बुद्धमूर्ती आहे तरी कशी?

गौतम बुद्धांची ही नव्याने उघडकीस आलेली मूर्ती संगमरवरामध्ये (मार्बल) घडवलेली असून तिची स्थापना रोमनकालीन मंदिरात केलेली होती. हे रोमनकालीन मंदिर देवी आयसिस हिचे आहे. या मूर्तीची उंची ७१ सेमी इतकी आहे. ही बुद्ध मूर्ती उभी असून या मूर्तीमध्ये बुद्धाने डाव्या हातात आपले उत्तरीय धरलेले आहे.
बुद्धाच्या मागच्या प्रभामंडलात सूर्यकिरणे दाखविण्यात आलेली आहेत. अभ्यासकांच्या मते हे प्रभामंडल बुद्धाच्या तेजस्वी व ज्ञानवंत मन व बुद्धी यांचे प्रतिनिधित्त्व करणारे आहे. त्याच्या जवळच कमळाचे फुल दर्शविण्यात आले आहे. या मूर्तीची शैली व कारागिरी अप्रतिम आहे. भारतापासून लांब इजिप्तमध्ये सापडलेली ही बुद्ध मूर्ती बौद्ध धर्माच्या इतिहासातील उत्तम दाखला मानला जात आहे.

इतर पुरातत्त्वीय पुरावे

याशिवाय आयसिस हिच्या मंदिरात भारतीय भाषेत- संस्कृतमध्ये लिहिलेला अभिलेख सुद्धा सापडला आहे. हा लेख इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील (२४४-२४९) असून रोमन सम्राट ‘फिलिप दी अरब’ याच्या काळातील आहे. हा लेख सापडलेल्या बुद्ध मूर्तीच्या समकालीन नाही. बुद्धमूर्तीच्या शैलीवरून ही मूर्ती नंतरच्या काळातील असावी असे अभ्यासक मानतात. याच मंदिरात सापडलेले इतर लेख ग्रीकलिपीमध्ये आहेत. या ग्रीक लेखांचा काळ इसवी सन पहिले शतक ते तिसरे शतक यांमधील आहे. याशिवाय पुरातत्त्वज्ञांना याच मंदिरात भारतीय राजवंश सातवाहन यांची नाणी सापडली आहेत. सातवाहन हा महाराष्ट्रातील आद्य राजवंश आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीचा इजिप्तशी प्राचीन संबंध असल्याचे सिद्ध होते.

आणखी वाचा – Buddha Purnima 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? जाणून घ्या…

सापडलेली बुद्ध मूर्ती नेमकी कुठे तयार करण्यात आली होती?

गौतम बुद्धांची जी बुद्ध मूर्ती सापडली आहे त्यासाठी वापरण्यात आलेला दगड दक्षिण इस्तांबूल येथील स्थानिक खाणीत सापडतो. असे असले तरी मूर्तीची घडण ही बेरेनिक येथेच झालेली असावी असे काही अभ्यासक मानतात तर काही अलेक्झांड्रिया येथे झाली असे मानतात. ही मूर्ती कुणा एखाद्या श्रीमंत भारतीय व्यापाऱ्याने स्थानिक कारागिराकडून तयार करून घेवून मंदिराला भेट दिली असावी असा अभ्यासकांचा कयास आहे. महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे म्हणजे डॉ. शैलेन भंडारे या महाराष्ट्रीय तज्ज्ञांचाही या संशोधनात मोलाचा सहभाग आहे.