सोशल मीडियापासून अल्पवयीन मुलामुलींना दूर ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न फारसे यशस्वी होताना दिसत नाहीत. उलट पालकांच्या नकळत समाजमाध्यमांचा वापर करताना विविध प्रकारच्या गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या अल्पवयीनांचे प्रमाण जास्त आहे. अशा गुन्ह्यांपासून अल्पवयीनांना दूर ठेवण्यासाठी इन्स्टाग्रामने नवीन सुरक्षा सुविधा सुरू केली आहे. टीनएजर्स अर्थात १३ ते १७ वयोगटातील किशोरवयीनांना सुरक्षितपणे इन्स्टाग्रामवर वावरता यावे आणि त्याच वेळी त्यांच्या पालकांनाही त्यांच्या ‘सोशल’ संचारावर लक्ष ठेवता यावे, यासाठी ही सुविधा इन्स्टाग्रामने सुरू केली आहे.

इन्स्टाग्राम ‘टीन अकाउंट्स’ची गरज काय?

समाजमाध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला असून इन्स्टाग्रामसारख्या रिल्सकेंद्री ॲपने आबालवृद्धांना मोहात पाडले आहे. कुटुंबातील वयस्कर किंवा प्रौढ मंडळीदेखील या रिल्स पाहण्यात दिवसातील बराचसा वेळ खर्ची घालवत आहेत. अशा वेळी अल्पवयीनांमध्ये या ॲपचे आकर्षण निर्माण होणे साहजिकच. पालकांच्या परवानगीने किंवा नकळत इन्स्टाग्रामसारख्या ॲपचा वापर करणाऱ्या अल्पवयीनांची संख्या खूप मोठी आहे. त्यातही किशोरवयीन मुले-मुली आपल्या नावाचे किंवा बनावट नावाचे अकाउंट तयार करून इन्स्टाग्रामवर फोटो, व्हिडिओ किंवा मजकूर पोस्ट करताना दिसतात. या अल्पवयीनांना हेरून त्यांच्याशी ऑनलाइन सलगी करून त्यांचे आर्थिक, लैंगिक किंवा भावनिक शोषण करण्याचे प्रकार वाढले आहेत. पालक रागवण्याच्या भीतीने ही मुले आपल्यावरील अत्याचाराबाबत त्यांच्याशी बोलत नाहीत. उलट नैराश्याच्या भरात ती चुकीच्या वाटेवर जाण्याची भीती बळावते. या प्रकारांना आळा घालून किशोरवयीनांना सुरक्षितपणे इन्स्टाग्रामवर वावरता यावे, यासाठी हे ॲप बनवणाऱ्या मेटा कंपनीने टीन अकाउंट्स संकल्पना पुढे आणली आहे.

Indian ammunition Ukraine marathi news
विश्लेषण: भारतीय बनावटीचा दारुगोळा युक्रेनकडे? भारताचा इन्कार, पण रशिया नाराज!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Tirumala Tirupati Prasad Ladoo
Tirupati Balaji Prasad Ladoo : तिरुपती बालाजीच्या प्रसादाचे लाडू कसे तयार होतात? ‘पोटू’ नेमकं काय आहे?
US Federal Reserve, interest rate cut
विश्लेषण : अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर कपात एवढी महत्त्वाची का? भारतातील बाजारावर काय परिणाम?
pune employee stress death
पुण्यातील तरुणीचा मृत्यू कामाच्या ताणामुळे? जास्त कामाचा तिच्या प्रकृतीवर कसा परिणाम झाला? किती टक्के भारतीय कर्मचाऱ्यांना कामाचा ताण?
chandrayaan 4 mission isro moon
२०४० पर्यंत पहिला भारतीय ठेवणार चंद्रावर पाऊल, २०२७ मधील ‘चांद्रयान-४’ मोहीम ठरणार महत्त्वाची; या मोहिमेचे उद्दिष्ट काय?
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
hezbullah israel attack
लेबनॉनमधील पेजर स्फोटांमुळे इस्रायल आणि हिजबूल यांच्यातील संघर्ष पेटणार का?

हेही वाचा : विश्लेषण : अमेरिकी ‘फेडरल रिझर्व्ह’ची व्याजदर कपात एवढी महत्त्वाची का? भारतातील बाजारावर काय परिणाम?

किशोरवयीन इन्स्टाग्रामवर कसे बळी पडतात?

इन्स्टाग्रामवर अकाउंट सुरू करण्यासाठी १८ वर्षे वयाची अट घालण्यात आली आहे. मात्र, त्यापेक्षा कमी वयाची मुले-मुलीही खोट्या नावाने किंवा खोटी जन्मतारीख नोंदवून इन्स्टाग्रामवर सक्रिय होताना दिसतात. सायबर विश्वातील गुन्हेगार अशा पद्धतीने इन्स्टाग्रामवर वावरणाऱ्या मुलामुलींना हेरतात. तसेच त्यांच्याशी वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाइन मैत्री करतात आणि मग चॅटिंगच्या माध्यमातून त्यांना आपल्या मोहात पाडून त्यांची फसवणूक करतात. यामध्ये शरीरसुखासाठी बळजबरी करणे, त्यांची निर्वस्त्र छायाचित्रे मिळवून प्रसारित करणे किंवा ही छायाचित्रे प्रसारित न करण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून खंडणी उकळणे, त्यांच्याशी सलगी करून कुटुंबाची गोपनीय माहिती मिळवणे, त्यांना गुन्हेगारी विश्वात ओढणे, अमली पदार्थांचे व्यसन लावणे अशा प्रकारे या अल्पवयीनांची फसवणूक केली जाते.

टीन अकाउंट्सने काय बदल होणार?

अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना वाढू लागल्याबद्दल इन्स्टाग्रामवर टीका होऊ लागली आहे. या ॲपवर बंदी आणण्याची तसेच त्याचे नियमन करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे इन्स्टाग्रामने याबाबत नवीन सुरक्षा तरतुदी केल्या आहेत. पालकांच्या देखरेखीखाली किशोरवयीनांना इन्स्टाग्रामचा मर्यादित परंतु अधिकृत वापर करू देणारी ही सुविधा आहे. खोट्या नावांचे अकाउंट न उघडता आपल्या अधिकृत अकाउंटवरून मित्रमैत्रिणींशी किंवा परिचितांशी संपर्कात राहण्याची संधी या सुविधेतून मिळणार आहे.

टीन अकाउंट्स संकल्पना नेमकी काय?

या संकल्पनेअंतर्गत किशोरवयीनांना आपले व्यक्तिगत अकाउंट तयार करता येईल. हे अकाउंट पूर्णपणे खासगी असेल. या मुलामुलींच्या पालकांनी मंजूर केलेल्या व्यक्तींनाच किशोरवयीनांच्या अकाउंटला फॉलो करता येईल तसेच त्यांनी पोस्ट केलेल्या गोष्टी पाहता येतील. अशा व्यक्तींबरोबरच ही मुले संदेशांची देवाणघेवाण करू शकतील. अशी खाती ‘अतिसंवेदनशील’ म्हणून निर्धारित केली जातील. त्यामुळे त्या खात्यावरून इन्स्टाग्राम हाताळणाऱ्यांना वयोपरत्वे मंजूर असलेला ‘कंटेंट’च पाहता येईल. आक्षेपार्ह शब्द, चित्रफिती, ध्वनी, संवाद त्यांना दिसणार नाहीत. इन्स्टाग्रामवरील त्यांचा वावर मर्यादित ठेवण्यासाठी दररोज ६० मिनिटांच्या वापरानंतर त्यांना ॲप बंद करण्याविषयीची सूचना पाठवण्यात येईल. तसेच रात्री दहा ते सकाळी सातदरम्यान त्यांना कोणतेही नोटिफिकेशन पाठवले जाणार नाहीत. या खात्यांचे नियंत्रण पालकांकडे असणार असून त्याआधारे पालक मुलांच्या इन्स्टाग्राम वापरण्याच्या वेळेवर निर्बंध आणू शकतील. आपली मुले कोणाशी चॅटिंग करत आहेत किंवा काय कंटेंट पाहात आहेत, हेही पालकांना समजू शकणार आहे.

हेही वाचा : डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?

अंमलबजावणी कशी होणार?

अनेक अल्पवयीन मुले-मुली खोट्या जन्मतारखेच्या आधारे १८ वर्षांपेक्षा मोठे असल्याचे भासवून इन्स्टाग्रामवर खाते सुरू करतात. मात्र अशी खाती ओळखून काढण्याचे तंत्रज्ञान इन्स्टाग्रामने विकसित केले असून १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलामुलींची ‘बनावट’ खातीही ‘टीन अकाउंट्स’च्या नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहेत.

सुविधा कधीपासून?

किशोरवयीनांच्या ‘टीन अकाउंट्स’ना ओळखून् त्यांना त्या वर्गात घालण्याची प्रक्रिया इन्स्टाग्रामने १७ सप्टेंबरपासून् सुरू केली आहे. पुढील दोन महिन्यांत अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांतील किशोरवयीनांची खाती सक्रिय केली जातील. तर जानेवारीपासून भारतातही ही सुविधा राबवली जाईल.

किशोरवयीन कितपत सुरक्षित?

इन्स्टाग्रामची ही संकल्पना किशोरवयीनांसाठी सुरक्षित मानली जात असली तरी, त्याच्या अंमलबजावणीबाबत अद्यापही प्रश्न आहेत. खोट्या जन्मतारखेनिशी इन्स्टाग्रामवर सक्रिय राहणाऱ्या अल्पवयीनांना शोधण्याचे तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांनाही आपल्या मुलांच्या सोशल मीडिया वापराचे नियमन वा नियंत्रण करणे आवश्यक आहे. सोशल मीडियापासून अल्पवयीनांना दूर ठेवणे आता शक्य नाही. अशा वेळी त्यांना अधिकृतपणे सोशल मीडियावर सहभागी करून घेताना त्याच्या भल्याबुऱ्याची जाणीव करून देणे हे पालकांचीही जबाबदारी आहे. त्याच वेळी अशा मुलामुलींकडून अयाेग्य किंवा धोकादायक ‘कंटेंट’ हाताळला जात नाही ना, यावर लक्ष ठेवण्याचे काम इन्स्टाग्रामसारख्या ॲपना करावे लागणार आहे.