युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने (DoJ) खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नून याच्या हत्येच्या कटात कथितरित्या सहभागी असलेला “CC-1” म्हणून भारत सरकारचा माजी कर्मचारी विकास यादव याचे नाव जाहीर केले आहे. गेल्या वर्षी यादवला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त समोर आले होते. नुकतेच अमेरिकच्या न्याय विभागाने यादव याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. तर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) त्याचे नाव फरार आरोपींच्या यादीत समाविष्ट केले आहे. विकास यादव या माजी भारतीय सरकारी कर्मचाऱ्याभोवती चर्चा वाढत असताना, त्याला दिल्लीत का अटक करण्यात आली होती आणि अमेरिकेने त्याच्यावर नेमके कोणते आरोप केले आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

विकास यादवविरुद्ध खंडणीचा गुन्हा

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने गेल्या डिसेंबरमध्ये विकास यादवला खंडणीच्या आरोपावरून अटक केली होती. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या न्याय विभागाने विकास यादव याच्यावर पन्नूनच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप केला आणि त्यानंतर काही आठवड्यांतच त्याला या खंडणी प्रकरणात अटक झाली. दिल्लीच्या तिहार तुरुंगात चार महिने राहिल्यानंतर यावर्षी एप्रिलमध्ये त्याची जामिनावर सुटका झाली.

50 Arrested 8 Cases Filed in Parbhani Riot
Parbhani Violence: परभणी प्रकरणात आठ गुन्हे दाखल, पन्नास जणांना अटक
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
Narain Singh Chaura Attack Akali Leader Sukhbir Singh Badal at Goldan Temple
Sukhbir Singh Badal Firing : सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळी झाडणारा व्यक्ती कोण? खलिस्तानी दहशतवाद्यांशी आहे कनेक्शन
CIDs behaviour in Badlapur case is suspicious
बदलापूर प्रकरणी सीआयडीचे वर्तन संशयास्पद
Sanjay Gaikwad On Shivsena Prataprao Jadhav
Sanjay Gaikwad : शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर; ‘आमच्या पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही’, ‘या’ आमदाराचा केंद्रीय मंत्र्यांवर आरोप

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने रोहिणीतील एका रहिवाशाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे यादवला अटक केली होती. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे यादव एनआयएमध्ये कार्यरत होता. दिल्लीच्या रहिवाशाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो एक आयटी कंपनी चालवत असे आणि पश्चिम आशियातील अनेक भारतीयांशी त्याचे संपर्क होते. “गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माझ्या एका मित्राने माझी यादव याच्याशी एक वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि त्याच वेळी आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो. आम्ही चांगले मित्र झालो, पण तो सरकारी अधिकारी असल्याने त्याच्या व्यवसायाबद्दल कधी बोलणे झाले नाही. परंतु, त्याने नेहमी माझ्या मित्रांबद्दल कुतूहल दाखवले होते. विशेषतः जे परदेशात आहेत त्यांच्याविषयी. मी त्यांच्याशी पैशाचे व्यवहार कसे करतो याबद्दल देखील चौकशी केली होती,” असे इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. तक्रारकर्त्याने दावा केला आहे की, यादवने त्याला सांगितले की तो एक ‘गुप्त एजंट’ आहे, जो संवेदनशील ऑपरेशनमध्ये सहभागी असतो.

अधिक वाचा: Diabetes ‘Smart’ Insulin:मधुमेहाच्या रुग्णांसाठी आता ‘स्मार्ट’ इन्सुलिन; काय सांगते नवीन संशोधन?

एफआयआरमध्ये नक्की काय म्हटले आहे?

गुन्ह्याच्या प्राथमिक नोंदीमध्ये (एफआयआर) तक्रारदाराने म्हटले आहे की, “११ डिसेंबर रोजी यादव याने मला कॉल करून कळवले की, कुठल्यातरी गंभीर विषयावर त्याला माझ्याशी चर्चा करायची आहे आणि ती माझ्या आयुष्याशी संबंधित आहे. एनआयए कार्यालयाबाहेर भेटण्यास सांगताना हेही सांगितेल की, त्याच्या आयुष्याला गंभीर धोका आहे. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने त्याने बळजबरीने डिफेन्स कॉलनीजवळील फ्लॅटवर नेले. तिथे मला मारहाण करण्यात आली आणि लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पैशांची मागणी केली” तर इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार तक्रारदाराने असाही आरोप केला की, यादवच्या साथीदाराने त्याला डोक्यावर मारले आणि सोन्याची चेन आणि अंगठ्या देण्यास भाग पाडले.मारहाण केल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिले आणि त्याच्या मानेवर वार केले. तक्रारदाराच्या कॅफेमधून बँकेचे चेकबुक देखील घेतले आणि कोऱ्या चेकवर त्याची स्वाक्षरी घेतली. नंतर त्याला गप्प राहण्याची धमकी देत ​​त्याच्या कारजवळ नेऊन सोडले. एवढेच नव्हे तर नंतर सर्व सीसीटीव्ही रेकॉर्डिंगही हटवले.

विकास यादववर कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पोलिसांनी यादव आणि त्याच्या साथीदाराला गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी अटक केली होती. त्यांच्यावर IPC कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 120-B (गुन्हेगारी कट), 364A (अपहरण), 506 (धमकी देणे), 341 (डांबून ठेवणे), 328 (विषप्रयोग) आणि शस्त्रास्त्र कायदा कलम २५/२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ मार्च रोजी दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिसून आले.

अधिक वाचा: ‘तो येईल आणि मला वाचवेल’ हे सांगणारा ‘Cinderella Complex’ म्हणजे नक्की काय?

त्याच्या खुलाशात यादवने पोलिसांना सांगितले की, त्याचे वडील सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) मध्ये काम करत होते आणि २००७ साली त्यांचे निधन झाले. यादव याचे २०१५ साली लग्न झाले. तक्रारदाराची व त्याची एका सामाजिक मेळाव्यात भेट झाली आणि त्यानंतर त्याचे अपहरण करून पैसे कमवायचे ठरले. कार डीलर असलेल्या सहकाऱ्याला त्याच्या व्यवसायात आर्थिक नुकसान होत होते आणि म्हणून त्याने यादवच्या योजनेत सामील होण्याचा निर्णय घेतला. यादवला २२ मार्च रोजी अंतरिम जामीन मिळाला आणि नंतर एप्रिलमध्ये तो नियमित जामिनावर तिहार तुरुंगातून बाहेर पडला.

विकास यादव याच्यावर अमेरिकेचे आरोप

अमेरिकेच्या न्याय विभागाने गुरुवारी (१७ ऑक्टोबर) यादव याच्यावर पन्नूनच्या हत्येच्या कथित कटात सहभागी आणि पैशांच्या अफरातफरीचा आरोप त्याच्यावर केला. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, या आठवड्यात दाखल झालेल्या आरोपपत्रात यादव याने निखिल गुप्ता या भारतीय नागरिकाला “युनायटेड स्टेट्समध्ये हत्येची योजना आखण्यासाठी” नियुक्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. असोसिएट प्रेसने (AP) दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांचा असा आरोप आहे की, यादव या कटात सहभागी असून तो भारत सरकारच्या सेवेत रुजू आहे. यादवविरुद्ध गुन्हा ज्या आठवड्यात दाखल झाला, त्याच आठवड्यात कटाचा तपास करणाऱ्या भारतीय समितीचे दोन सदस्य अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटले. त्यानंतर “अमेरिकेच्या न्याय विभागाने नाव घेतलेली व्यक्ती आता भारतीय सरकारची कर्मचारी नाही, याची आम्हाला माहिती देण्यात आली आहे. आम्हाला त्यांचे सहकार्य समाधानकारक वाटले आहे,” असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले.

Story img Loader