ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने आपल्या बुटांवर गाझाच्या संदर्भात एक संदेश लिहिला होता. त्यामुळे ते बूट न घालण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याला सांगितले होते. त्या बुटांवर कोणता संदेश लिहिला होता, हे बूट घालण्याचा हेतू काय होता आणि असा संदेश देणे योग्य आहे का, या सर्व बाबींचा घेतलेला हा आढावा.

ख्वाजाला बुटांचा वापर करण्यास नकार का देण्यात आला, त्यावर कोणता संदेश होता?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ख्वाजाला गाझा संदर्भात संदेश लिहिलेल्या बुटांचा वापर करण्यास मज्जाव केला. मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या ख्वाजाने मंगळवारी पाकिस्तान संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वीच्या सराव सत्रादरम्यान हे बूट वापरले होते. या बुटांवर ‘सर्व जीव समान आहेत’ आणि ‘स्वातंत्र्य मानवाचा अधिकार आहे’ असे संदेश लिहिले होते.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?

हेही वाचा… विश्लेषण: भिवंडीतील पडघा ‘आयसिस’चा तळ होतोय का? कोण आहे साकिब नाचण?

गाझातील नागरिकांप्रति सहानुभूती व्यक्त करण्यासाठी त्याने हे केले, अशी चर्चा झाली. पाकिस्तानविरुद्ध गुरुवारपासून सुरू झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी त्याला या बुटांचा वापर करायचा होता. मात्र, नियमानुसार ख्वाजा हे बूट घालून मैदानात उतरू शकणार नाही हे ‘आयसीसी’ने बुधवारीच स्पष्ट केले होते.

ख्वाजाने समाजमाध्यमांवरील चित्रफितीत काय म्हटले?

या सर्व प्रकरणानंतर ख्वाजाने आपण मानवाधिकारासाठी सदैव आवाज उठवीत राहू असे म्हटले. सर्व जीव समान आहेत, स्वातंत्र्य मानवाचा अधिकार आहे. माझ्या बुटांवर जे काही लिहिण्यात आले होते, ते राजकारणाशी संबंधित नव्हते. मला कोणाची बाजूही घ्यायची नाही. माझ्यासाठी सर्व मानव एक समान आहेत. मग, तो ज्यू की मुसलमान की हिंदू सर्व माझ्या दृष्टीने समान आहेत. जे लोक स्वत: बोलू शकत नाहीत, त्यांचा मी आवाज बनण्यास इच्छुक आहे, असे ख्वाजाने समाजमाध्यमावरील चित्रफितीत म्हटले. ख्वाजाने आपल्या बुटांबाबत संघ सहकाऱ्यांना काहीच सांगितले नव्हते.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया व कमिन्स यांची याबाबत काय भूमिका?

आम्ही खेळाडूंच्या वैयक्तिक मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचे समर्थन करतो. मात्र, ‘आयसीसी’चे काही नियम आहेत, जे वैयक्तिक संदेश देण्याबाबत रोखतात व अशा नियमांचा पालन करण्याची अपेक्षा आम्ही करतो, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. या प्रकरणाबाबत कमिन्स म्हणाला, ‘‘मला ही बाब कळताच ख्वाजासोबत मी चर्चा केली आणि हे बूट तो सामन्यादरम्यान घालणार नाही. मात्र, बुटांवर त्याने जो संदेश लिहिला, त्याचे मी समर्थन करतो.’’

कसोटी सामन्यादरम्यान ख्वाजा काळी दंडपट्टी लावून का उतरला?

विशेष संदेश लिहिलेले बूट घालण्याची परवानगी न दिल्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ख्वाजा काळी दंडपट्टी लावून मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ख्वाजाने डेव्हिड वॉर्नरसह ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात केली. ख्वाजा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळणारा पहिला मुस्लीम खेळाडू आहे. ‘‘अन्य क्रिकेटपटूंना समर्थन व्यक्त करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, मला नाही, हे नक्कीच निराशाजनक आहे,’’ असे सामन्यापूर्वी ख्वाजाने सांगितले.

‘आयसीसी’ची या संदर्भातील आचारसंहिता काय आहे?

‘आयसीसी’च्या आचारसंहितेनुसार क्रिकेटपटूंना परवानगीशिवाय क्रिकेटचा गणवेश किंवा साहित्यावर राजकीय, धार्मिक अथवा वांशिक संदेश देण्याची परवानगी नाही. ‘‘एखादा संदेश राजकीय, धार्मिक किंवा वांशिक कारणासाठी आहे की नाही हे ‘आयसीसी’ निर्धारित करते. क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणण्यासाठी ‘आयसीसी’ची मान्यता असलेल्या संदेशांचा वापर केला होता. जगभरातील राजकीय समस्या यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी क्रिकेटचा व्यासपीठ म्हणून वापर केला जाऊ शकत नाही,’’ असे ‘आयसीसी’च्या नवीन तयार करण्यात आलेल्या नियमात म्हटले आहे.

क्रिकेटच्या मैदानात यापूर्वी इतरांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला होता का?

दहा वर्षांपूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला ‘आयसीसी’ने ‘सेव्ह गाझा’ व ‘फ्री पॅलेस्टाइन’ असा संदेश असलेली मनगटपट्टी (रीस्टबँड) घालून खेळण्यास मनाई केली होती. मोईनला २०१४मध्ये भारताविरुद्ध साऊदम्प्टन येथे झालेल्या कसोटीत याचा वापर करायचा होता. त्याला सुरुवातीला इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने मान्यता दिली होती. मात्र, सामन्यात मनगटपट्टीच्या वापरावर ‘आयसीसी’ सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी बंदी घातली. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’ चळवळीला भारतीय संघाने गुडघ्यावर बसून समर्थन दाखवले होती. अन्य संघांनीही अशीच कृती केली होती. पण त्याविषयी आयसीसीने आक्षेप घेतला नव्हता.