देशविघातक कृत्य कुठेही घडले की अनेकदा तपासाची सुई भिवंडीतील पडघ्यापर्यंत येऊन पोहचते. मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी या भागात राहणारा साकिब नाचण याला काही वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हापासून पडघा नेहमीच चर्चेत राहिला. बंदी घालण्यात आलेल्या ‘सिमी’ या संघटनेचे काम नाचण या भागातून करीत होता. २०१७मध्ये त्याची सुटका झाली. आता आयसिसचे मोड्युल जसेच्या तसे पडघ्यात उभे करता येईल का याची चाचपणी नाचण करत होता असा राष्ट्रीय तपास यंत्रणांना संशय आहे. राष्ट्रीय तपास संस्थानी (एनआयए) नुकत्याच पडघा भागात छापे घालून नाचण याच्यासह आणखी काही जणांना ताब्यात घेतले. पडघा गाव ठराविक एका जमातीसाठी ‘स्वतंत्र क्षेत्र’ म्हणजेच सीरियाप्रमाणे ‘अल – शाम’ म्हणून घोषित करण्यात नाचणचा प्रयत्न होता असा संशय आहे. साकिब नाचण हा आयसिस माॅड्यूलचा म्होरक्या असल्याचा दावाही आता केला जात आहे. सहभागी होणाऱ्या तरुणांना बयाथ म्हणजे ‘खलिफा’शी निष्ठेची शपथ देत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येऊ लागले आहे.

पडघा गावाची भौगोलिक रचना कशी आहे?

मुंबई-नाशिक महामार्गालगत पडघा वसले आहे. ठाणे शहरापासून वाहनाने गेल्यास एक ते दीड तासात या गावात पोहचता येते. पडघा गावात सुमारे आठ हजार इतकी लोकवस्ती आहे. यापैकी ८० ते ८५ टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मीयांची आहे. कोकणी मुसलमानांची संख्या मोठी आहे. उर्वरित रहिवासी हे आदिवासी आहेत. या भागात लाकडांच्या वखारी आहेत. त्यामुळे येथील रहिवासी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत. गावात मोठे बंगले आहेत. भिवंडीप्रमाणे येथेही गोदामे उभे राहत असल्याने येथील जमिनींना चांगला भाव आला आहे. खैराच्या लाकडाची तस्करीदेखील या भागातून अनेकदा होत असते, असे पुरावे यापूर्वी सापडले आहेत. तसेच गावातील काही जणांचा पशूधन विक्रीचा व्यवसायही आहे.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

साकिब आणि त्याच्या कारवाया कोणत्या?

साकिब नाचण हा पडघ्यातील बोरीवली गावात राहातो. त्याला आतापर्यंत तीन वेळा अटक झाली आहे. १९९०च्या दशकात बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. खलिस्तानी अतिरेक्यांबरोबर तेव्हा नाचणला अटक झाली होती. गुजरातमधील ‘टाडा’ न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. परंतु पाच वर्षे तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली. त्यानंतर नाचण २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक झाली होती. तो ठाणे कारागृहात होता. नाचण याची वर्तणूक चांगली असल्याची बाब लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने त्याची पाच महिने १३ दिवस आधीच सुटका केली होती. ठाणे कारागृहातून बाहेर पडताच, त्याला भेटण्यासाठी पडघ्यातील जेष्ठ नागरिकांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनी गर्दी केली होती. एक प्रकारे नाचण पडघा गावासाठी नायक ठरला आहे.

नाचण, एनकाउन्टर स्पेशालिस्ट आणि पडघ्याचा संबंध काय?

पडघ्यातील बोरीवली गावापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर पडघा पोलीस ठाणे आहे. गावात पोलीस चौकीदेखील आहे. मार्च २००३ मध्ये प्रदीप शर्मा, दया नायक आणि सचिन वाझे यांचे विशेष पथक साकिब नाचण याला अटक करण्यासाठी गेले होते. साकिबला पोलीस घेऊन जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर काही ग्रामस्थ साकिबच्या घराजवळ दाखल झाले. त्यांनी पोलिसांच्या पथकाला साकिबला नेण्यापासून विरोध केला. साकिबला पोलिसांच्या वाहनामध्ये बसविल्यानंतर पथकावर हल्ला झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी साकिबला पोलिसांच्या गाडीतून बाहेर काढले. त्यामुळे पोलीस पथकाला रिकाम्या हाताने परताने लागले होते. हे तीनही वरिष्ठ पोलीस अधिकारी एनकाउन्टर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात.

हेही वाचा…. विश्लेषण: बायडेन यांची भारत-भेट रद्द का झाली? दोन्ही देशांत कटुता निर्माण झाली आहे का?

पोलीस खात्यात दबदबा राखून असलेले हे तीन अधिकारी पडघ्यात येताच येथील ग्रामस्थांना काही वेगळाच संशय आला. साकिबवर हे अधिकारी हल्ला करतील या भीतीने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यामुळे या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने पडघ्यातून परतावे लागले होते. काही दिवसांनी साकिब नाचण पोलिसांच्या शरण आला.

साकिबचा ‘भाई’ कसा झाला?

साकिब याचा काका या भागातून ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर निवडून येत असे. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले होते. नाचण याने ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा सरचिटणीस म्हणून काम केले होते. त्याचे बी.काॅम. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. साखळी बाॅम्बस्फोटाप्रकरणात अटक होण्यापूर्वी त्याने पडघ्यातील डोंगराळ भागात काही तरुणांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याची चर्चा होती. मुलुंड बॉम्बस्फोट खटल्यात जामिनावर असताना भिवंडीतील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अ‍ॅड. मोहन रायचनी यांच्या हत्येतही नाचण याच्यावर आरोप होते. नाचण याचे पडघा गावात हळू-हळू दबदबा वाढत होता. गावातील काही समस्या असल्यास येथील रहिवाशी पोलिसांऐवजी साकिबकडे जावू लागले. त्यातून साकिबचा ‘साकिब भाई’ झाला. गावात बहुतांश नागरिक त्याचा ‘साकिब भाई’ म्हणून उल्लेख करतात. एनआयएच्या अटकेनंतरही येथील नागरिक साकिब नाचण याला गोवण्यात आल्याचा आरोप करत आहेत.

पडघा आणि अल – शाम हे प्रकरण काय?

साकिब नाचण याने पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केले होते असा तपास यंत्रणांचा संशय आहे. अल – शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सीरिया. त्याला पडघ्यात निर्माण करायचा होता असाही संशय आहे. साकिबने पडघा गावाला अल – शाम असे नाव दिले होते. पडघ्यातला तळ मजबूत करण्यासाठी ते मुस्लिम तरुणांना पडघ्यात स्थलांतरित करण्यास प्रेरणा देत होता असा दावा एनआयएने केला आहे. देशात विघातक कारवाया करणे, सामाजिक सलोखा भंग करणे आणि भारत सरकारविरोधात लढा पुकारणे अशी योजना या मोड्यूलच्या माध्यमातून होत होती. यापूर्वी पडघा गावातून एनआयएने ऑगस्ट महिन्यात साकिब याच्या मुलाला अटक केली होती. नुकत्याच झालेल्या एनआयएच्या कारवाईत पथकाने येथील ३० ते ३५ घरांवर छापे टाकले आहेत.