देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेली टीसीएस वरिष्ठ कर्मचाऱ्यांची भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी एजंट कंपन्यांना (vendors) विशेष फायदे देत आहे. १५.२ ट्रिलियन बाजारमूल्य असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आणलेल्या ‘क्विक जॉइनर इन्सेंटिव्ह प्लॅन’ योजनेंतर्गत ३० दिवसांपेक्षा कमी कालावधीत कंपनीत रुजू होणाऱ्यांना प्रति कर्मचारी ४० हजार रुपये ऑफर करीत आहे. अनुभवी कर्मचारी मिळविण्यासाठी कंपन्यांची ही धडपड सुरू असल्याचं आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना त्यांच्या कौशल्यानुसार प्रोत्साहन देत आहे. मात्र, नोकरीत रुजू झाल्यापासून १८० दिवसांच्या आत कर्मचारी निघून गेल्यास ते वसूल केले जाणार आहे. टीसीएसने एजंट कंपन्यांद्वारे (vendors) त्वरित कर्मचारी नियुक्त करण्यासाठी विशेष लाभ देणे हे आयटी क्षेत्रात तेजीचे संकेत आहे.

टीसीएस चांगले कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा प्रोत्साहन भत्ता देत आहे. तसेच या नोकरीसाठी १० ते १५ वर्षांच्या अनुभवाची अटही ठेवण्यात आली आहे. परंतु कर्मचाऱ्यांनी रुजू होऊन १८० दिवसांच्या आत कंपनी सोडली तर ते कंपनी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करणार आहे, असंही टीसीएसने एजंट कंपन्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक चलनवाढ आणि व्याजदरात वाढ झाल्यामुळे मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यां (MNC)नी आयटीवरील खर्च कमी केला होता, त्यामुळे आयटी कंपन्यांना करार करण्यात अडचणी येत होत्या, मात्र महागाई कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारली असून, चित्र बदलत असल्याचं सांगितलं जात आहे.

Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

हेही वाचाः विश्लेषण : टेस्ला पाण्यात, कोट्यधीश उद्योगपतीचा मृत्यू; गाडी खरंच सुरक्षित ठेवते?

कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?

TCS पाठवलेल्या मेलनुसार, वेबसाइटवर मजकूर प्रकाशित आणि व्यवस्थापित करण्यासाठी कर्मचाऱ्याला Microsoft Teams, Microsoft 365, One Drive, Outlook आणि Endpoint आणि Sharepoint सारखे सॉफ्टवेअरचे ज्ञान असले पाहिजे. तसेच TCS देखील Endpoint आणि SharePoint मधील कौशल्यांच्या शोधात आहे, जे वापरकर्त्यांना वेबसाइटवर मजकूर तयार करण्यास आणि प्रकाशित करण्यास परवानगी देणार आहे.

पॅकेज किती असेल?

मिळालेल्या माहितीनुसार, TCS सारख्या कंपनीत १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सरासरी पॅकेज ३० लाख रुपये प्रतिवर्ष आहे. साधारणपणे कर्मचाऱ्यांसाठी कंपनीकडून ८ ते १२ टक्के पॅकेज एजंट कंपन्यांना (vendors) दिले जाते. TCS चा अलीकडेच ब्रिटिश विमा कंपनी Aviva बरोबर १५ वर्षांचा करार झाला आहे. अविवा ही एक विमा कंपनी असून, ती ४५ वर्षांहून अधिक काळ विमा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी ५५ लाखांहून अधिक विमा पॉलिसी चालवते.

हेही वाचा: मालदीवमधल्या निवडणुकीसाठी भारताच्या ‘या’ राज्यात होणार मतदान, पण का? जाणून घ्या

२०२२ मध्ये नोकरभरतीमध्येही अशाच पद्धतीच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. परंतु ते वर्ष आर्थिक गुंतागुंतीचं राहिल्यानं अनेक कंपन्यांनी कपातीचं धोरण अवलंबलं होतं. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. आयटी कंपन्यांना चांगले कौशल्य असणारे कर्मचारी हवे आहेत, जेणेकरून नवे प्रकल्प राबवण्यासाठी अनुभवी कर्मचारी उपलब्ध असतील, असंही वेंडर्स सांगतात. परंतु या सर्व प्रकरणावर टीसीएसने टिप्पणी करण्यास नकार दिला आहे.

खरं तर कायमस्वरूपी भरतीसाठी उमेदवाराला मिळणाऱ्या वार्षिक भरपाईच्या ८ ते १२ टक्के पैसे हे एजंट कंपनीला मिळतात. कर्मचारी किंवा करारावर असलेल्यांसाठी एजंट कंपन्यांना स्थिर दराने पैसे दिले जातात. एजंट कंपन्यांच्या मते, १०-१५ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना वार्षिक पगार ३० लाख रुपयांपेक्षा जास्त असतो. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञसुद्धा नव्या नियुक्तीपेक्षा अनुभवी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतात. टीसीएसकडे एक मजबूत कर्मचाऱ्यांची फळी असून, आता ते १० वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेत आहेत. कारण दिवसेंदिवस स्पर्धाही वाढत चालली आहे, असंही एक्सिस सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक ओंकार टांकसाळे म्हणालेत. टीसीएसला अनुभवी कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सॉफ्टवेअर तज्ज्ञ आणि उत्तम विश्लेषक हवे आहेत.

फ्रेशर्स कंपनीला मोठा करार लवकरात लवकर पूर्ण करण्यास फायदेशीर ठरणार नाहीत. त्यामुळेच टीसीएसला अनुभवी कर्मचारी हवे असल्याचं टांकसाळे सांगतात. २०२४ मध्येसुद्धा आयटी कंपन्या कमी प्रमाणात कॅम्पस भरती करीत आहेत. अशातच काही आयटी कंपन्यांना अनुभवी कर्मचारी हवे आहेत. कॉग्निझंट, HCL टेक्नॉलॉजीज, अगदी TCS कॅम्पस भरती फार कमी प्रमाणात करीत असून, फ्रेशर्सना घेण्यासाठी तर टाळाटाळ केली जात आहे. इन्फोसिसनेही काही ठराविक फ्रेशर्सना घेतले असून, त्यांना सायबर सुरक्षा आणि डेटा मॉनिटरिंगसारख्या विभागात नियुक्त केले आहे. टीसीएसनं देऊ केलेला अतिरिक्त प्रोत्साहन भत्तादेखील आयटी सेवा कंपन्यांच्या गरजा अधोरेखित करतात. आयटी क्षेत्रातील भाषेत सांगायचे झाल्यास कर्मचाऱ्यांचा वापर हा सक्रिय प्रकल्पांसाठी केला जात असून, प्रकल्पांमध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची टक्केवारी दाखवतो. डिसेंबर २०२३ मध्ये संपलेल्या तीन महिन्यांसाठी आयटीतील प्रमुख कंपन्यांचा वापर दर ८५ ते ८९ टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सध्याच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांचा वापर करणे आवश्यक आहे. २०२२ मधील कोविड काळापासून वापर दर कमी झाला आहे. जगभरातील महत्त्वाच्या IT प्रदात्यांसाठी वापर दर ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता,” असेही ISG समूहाचे प्रमुख विश्लेषक आणि सहाय्यक संचालक मृणाल राय यांनी सांगितले. फ्लटर, विंडचिल, वर्कडे, एसएपी यांसारख्या कार्यक्रमांमध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे.

Flutter हे Google चे ओपन सोर्स UI सॉफ्टवेअर आहे, जे मोबाईल, डेस्कटॉप आणि वेब आधारित ऍप्लिकेशन्स तयार करण्यासाठी वापरले जाते. विंडचिल हे उत्पादन लाइफसायकल मॅनेजमेंट (PLM) सॉफ्टवेअर आहे, जे उत्पादन विकास आणि त्याची निर्मिती प्रक्रिया व्यवस्थापित करताना बौद्धिक संपदा (IP) सुरक्षा आणि शोधण्यायोग्यता प्रदान करते. वर्कडे हा क्लाऊड आधारित सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, जो मानव संसाधन (HR) विभाग हाताळण्यासाठी वापरला जातो. त्यात ई पेरोलिंग, ऑनबोर्डिंग कर्मचारी आणि कार्यप्रदर्शन मूल्यमापनाचा समावेश असतो.

जागतिक संकेत ओळखूनच टीसीएसने सुरू केली नोकरभरती

गेल्या काही दिवसांपासून जागतिक स्तरावर बाजार सावरते आहे. कोरोना काळात बाजारात चढउतार पाहायला मिळाले. याचा आयटी क्षेत्रालाही फटका बसला होता. परंतु आता बाजार स्थिर असून, आयटी क्षेत्रातील कंपन्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ उचलायचा आहे. जागतिक संकेत ओळखूनच टीसीएसने ही नोकरभरती सुरू केली असून, कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर रुजू होण्याचं आवाहन केलं जात आहे. जेणेकरून चांगले प्रोजेक्ट मिळाल्यास ते स्पर्धेतील इतर कंपन्यांच्या तुलनेत लवकर पूर्ण करून ग्राहकांनाही आपल्याकडे आकर्षित केले जाऊ शकते. टीसीएसने जागतिक बाजाराचे संकेत अचूक हेरले असून, त्या दिशेनं पावलं टाकण्यास सुरुवात केल्याचंही अर्थतज्ज्ञ सांगतात.