International Bikini Day: जगाच्या इतिहासात ५ जुलै ही एक सांस्कृतिकदृष्ट्या परिवर्तनाची तारीख मानली जाते. १९४६ मध्ये युद्धोत्तर पॅरिसमध्ये अभियंता लुईस रिअर्ड यांनी आणलेल्या बिकिनीच्या पदार्पणाने फॅशन क्षेत्रात खळबळ उडाली. जुलै १९४६ मध्ये स्विमसूटच्या एंट्रीने पॅरिसमधील शांतता भंग झाली. १६ व्या अरेंडिसमेंटमधील ग्लॅमरस आर्ट डेको पूल असलेल्या पिसिन मोलिटरमध्ये फ्रेंच इंजिनीयर फॅशन डिझायनर लुईस रिअर्ड याने बिकिनी पहिल्यांदाच स्विमवेअर प्रकारात सादर केली.

बिकिनीची कल्पना

फोलीज बर्गेरजवळ रिअर्ड त्याच्या आईचे एक अंतर्वस्त्रांचे दुकान चालवत होता. त्यादरम्यान त्याने सेंट ट्रोपेझ येथे महिलांनी कंबरेला कापड गुंडाळलेले पाहिले. त्यातूनच प्रेरणा घेऊन रिअर्डने कमीत कमी कापडाचा वापर करून हा पोशाख तयार केला. फक्त ३० स्केवर इंच आणि दोरीने जोडलेला. या पोशाखाच्या नावाची निवडही जाणीवपूर्वक बंडखोर अशी केली होती. १ जुलै १९४६ रोजी अमेरिकेने बिकिनी अॅटोल या ठिकाणी ऑपरेशन क्रॉसरोड्सअंतर्गत अणुचाचण्या केल्या होत्या. कारण- लुईस रिअर्ड यांनी बिकिनी या पोशाखाचा शोध कधीच एखाद्या बॉम्बपेक्षा कमी मानला नव्हता.

बिकिनी कशी प्रसिद्ध झाली?

रिअर्डला एका भव्य व्यासपीठाची आवश्यकता होती. पिसिन मोलिटर ज्याला व्हाइट ओशन लाइनर म्हटले जाते. या प्रदेशावर जर्मनीने ताबा मिळविल्यानंतर पुन्हा उघडलेला एक आर्ट डेको लॅन्डमार्क होता. जास्तीत जास्त लक्ष वेधण्यासाठी रिअर्डने ५ जुलै रोजी एक आउटडोअर प्रेस प्रिव्ह्यू आयोजित केला. मात्र, कोणीही व्यावसायिक मॉडेल हा पोशाख परिधान करण्यासाठी पुढे आली नाही. शेवटी कॅसिनो डी पॅरिसमधील एक डान्सर मिशेलिन बर्नाडिनी ही त्यावेळी १९ व्या वर्षी सार्वजनिकरीत्या बिकिनी परिधान करत दिसली होती. मिशेलिनचा पोशाख पाहून प्रेक्षकांमध्ये एकच शांतता पसरली. तिथे त्यावेळी तीन हजारांहून अधिक प्रेक्षक आणि माध्यमे उपस्थित होती. स्विमवेअरमध्ये पाहिलेला हा सर्वांत लहान स्विमसूट होता. रिअर्डने यावेळी धाडस करत म्हटले की, लग्नाच्या अंगठीतून ओढता येईल, असा हा पोशाख आहे. विशेष म्हणजे मिशेलिनने माचिस हातात घेऊन फोटोही काढला होता म्हणजेच एका माचिसमध्ये हा पोशाख सामावेल असा आहे, असे सांगण्याचा यामागचा उद्देश होता. बिकिनी परिधान केल्यानंतर मिशेलिन तुफान प्रसिद्ध झाली. ५० हजारांहून अधिक चाहत्यांनी तिला पत्रे पाठवली होती. त्यानंतर इटली, स्पेन, बेल्जियम यांसारख्या रूढीवादी युरोपीय देशांनी या पोशाखावर बंदी घातली.

बिकिनीला प्रतिसाद कसा होता?

अमेरिकन वृत्तपत्रांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करीत अणुचाचण्यांवर लक्ष केंद्रित केले; मात्र हळूहळू बिकिनीची लोकप्रियता जगभरात पसरली. हिस्ट्री एक्स्ट्राने रिअर्डच्या या नव्या कल्पनेची दखल घेतली. स्कायरायटर्सनी कान्सच्या वर बिकिनीची जाहिरात जगातील सर्वांत लहान बाथिंग सूट, अशी केली होती. सुरुवातीच्या काळा विरोध होऊनही बिकिनीने समुद्रकिनाऱ्यावरील संस्कृतीत विशेष महत्त्व प्राप्त केले. १९५० आणि १०६० च्या दशकात ब्रिजिट बार्डोट आणि उर्सुला अँड्रेस यांसारख्या हॉलीवूडच्या दिग्गजांनी पडद्यावर बिकिनी परिधान केली.

ठळक मुद्दे:

  • फ्रेंच इंजिनीयर फॅशन डिझायनर लुईस रिअर्ड याने बिकिनी पहिल्यांदाच स्विमवेअर प्रकारात सादर केली
  • फक्त ३० स्केवर इंच आणि दोरीने जोडलेला असा हा पोशाखाचा प्रकार
  • रिअर्डने १९ जुलै १९४६ रोजी बिकिनीचे पेटंट घेतले
  • दरवर्षी ५ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बिकिनी दिन साजरा केला जातो
  • कॅसिनो डी पॅरिसमधील एक डान्सर मिशेलिन बर्नाडिनी ही त्यावेळी १९ व्या वर्षी सार्वजनिकरीत्या बिकिनी परिधान करत दिसली होती

अमेरिकेत १९९६ च्या दशकातील लैंगिक क्रांती होईपर्यंत बिकिनी वादग्रस्तच ठरली. ज्यावेळी लैंगिक मुक्ततेवर भर देण्यात आला तेव्हा अमेरिकन समुद्रकिनाऱ्यांवर बिकिनीचा उघडपणे स्वीकार होऊ लागला. रिअर्डला त्यावेळी समजले की, बिकिनीचा मोठ्या प्रमाणात स्वीकार होणार आहे. तेव्हा त्याने १९ जुलै १९४६ रोजी बिकिनीचे पेटंट घेतले. लग्नाच्या अंगठीचे घोषवाक्य, स्कायरायटिंगच्या मोहिमा, भव्य प्रमोशन व सेलिब्रिटींच्या जाहिराती यांद्वारे त्याने जोमात मार्केटिंग केले. आज अनेक दशकांनंतरही रिअर्डची बिकिनी टिकून आहे. रिअर्डच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ५ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बिकिनी दिन साजरा केला जातो.

बिकिनी हा एक अब्ज डॉलर्सचा मोठा उद्योग आहे. तो स्त्रीवादी सक्षमीकरण आणि शरीराच्या सकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्याचा सांस्कृतिक प्रवास नम्रता, लैंगिकता आणि महिला प्रतिनिधित्वाभोवती सुरू असलेला तणाव दर्शवितो. विद्वान डायना व्ह्रीलँड यांनी बिकिनीला फॅशनचा अणुबॉम्ब, असे म्हटले होते. रिअर्डच्या अभियांत्रिकी प्रतीक्षा आणि धाडसी मार्केटिंगमुळे इतिहासात आणि जगभरातील वॉर्डरॉबमध्ये बिकिनीचे स्थान निश्चित झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९५१ मध्ये झालेल्या पहिल्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धकांनीही बिकिनी परिधान केली होती. या स्पर्धेनंतर स्पेन आणि इटलीसह अनेक देशांमध्ये बिकिनी घालण्यावर बंदी घालण्यात आली होती; पण त्यानंतर हळूहळू बिकिनी समाजात स्वीकारली गेली. त्यानंतर महिलांमध्ये बिकिनी घालण्याचा ट्रेंड वाढू लागला. सध्याच्या काळात समुद्रकिनारी महिलांचा हा आवडता पोशाख आहे. तरुण पिढीसाठी बिकिनी फॅशन स्टेटमेंट ठरले आहे. त्याशिवाय आजच्या काळात बिकिनी घालणे हा एक पुरावा आहे की, तुम्ही केवळ फॅशन ट्रेंड फॉलो करत नाही, तर तुम्ही तेवढ्या फिटदेखील आहात