दयानंद लिपारे

स्वातंत्र्य चळवळीमध्ये खादी ही स्वदेशी चळवळ बनली होती. परदेशी कापडापासून दूर राहून देशी कापडाला प्रोत्साहन देण्यासाठी खादीची वस्त्रे वापरण्याला प्रोत्साहन देण्यात आले होते. आता फॅशनच्या युगातही खादी आपले अस्तित्व अधिक ठळक करताना दिसत आहे.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

खादीचे महत्त्व कोणते?

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यासाठी खादीचा वापर वाढावा याकडे व्यापक लक्ष दिले होते. स्वातंत्र्यानंतर भारताचा राष्ट्रीय ध्वज खादी कापडाचा करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे महत्त्व आणखीनच अधोरेखित झाले. खादीचा प्रसार व्हावा यासाठी १९५७ मध्ये देशात खादी ग्रामोद्योग आयोग स्थापन करण्यात आला. राज्यात खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून खादीचा प्रचार-प्रसार केला जात आहे. कोणत्याही ऋतूत शरीराला सुसह्य ठरणारे वस्त्र असा खादीचा लौकिक आहे.

खादीचा प्रसार कसा होत आहे?

देशामध्ये खादीचा प्रसार व्हावा यासाठी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रयत्न होत राहिले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खादीचा तिरंगा ध्वज फडकविला होता. खादी ग्रामोद्योग आयोगाने विविध योजना राबवल्यामुळे खादीचा प्रसार होत गेला. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ब्रँड खादी’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या वस्त्र प्रावरणात खादीपासून बनवलेले जॅकेट, कुर्ता, टोपी, मफलर याचा वापर करत ते स्वतः खादीधारी झाले. खादीचा वापर लोकांनी करावा यासाठी ते सतत आवाहन करत असतात. सधन लोकांनी वर्षाकाठी पाच हजारांची खादी करावी, असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनीही केले होते. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोजकुमार गोयल यांनी ‘बँड शक्ती’ अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.

खादी ग्रामोद्योगाची स्थिती कशी आहे?

खादीसाठी अलीकडे अनुकूल वातावरण होत असल्याने खादी ग्रामोद्योगाच्या विक्रीच्या आकड्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. गेल्या नऊ वर्षांमध्ये खादी ग्रामोद्योगाची उलाढाल लक्षणीय वाढली आहे. सन २०१३-१४ मध्ये ती ३१,१५४ कोटी होती. सन २०२२-२३ मध्ये ती एक कोटी ३४ लाख कोटी रुपये इतकी म्हणजे ३३२ टक्के वाढली आहे. या क्षेत्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागात सुमारे १० लाख नवे रोजगार तयार झाले आहेत.

बंगालमधील काही शहरे का साजरा करत नाहीत आज स्वातंत्र्य दिन ? काय आहे इतिहास

खादीविक्रीला प्रतिसाद कसा आहे?

केवळ खादीचा विचार करता यामध्येही नवे विक्रम नोंदले असल्याचे आकडे दर्शवत आहेत. सन २०१३-१४ मध्ये खादी कापडाचे उत्पादन ८११ कोटी रुपये होते. ते २०२२-२३ मध्ये २९१६ कोटी रुपयांपर्यंत उंचावले आहे. त्यामध्ये २६० टक्के इतकी वाढ झाली आहे. कोविड १९ संसर्गानंतर नैसर्गिक कापडाची मागणी वाढली आहे. याचा फायदा खादी व्यवहाराला झाला असून, त्याची मागणी वाढत आहे. गतवर्षी गांधी जयंती दिनी नवी दिल्ली येथील खादी भवनामध्ये एकाच दिवशी एक कोटी ३४ लाख रुपये इतकी विक्रमी विक्री झाली होती.

उत्पादनवाढीचे प्रयत्न कोणते?

मेक इन इंडिया, व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत अभियान या माध्यमातून खादीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी व्याज सवलत अनुदान, खादी सक्षमीकरण, वर्कशेड प्रोत्साहन योजना, विपणन सुधारणा योजना, खादीचे फॅशनीकरण, विक्रीसाठी संकेतस्थळ आदींचा समावेश आहे.

वादाची किनार काय आहे?

खादीचे कापड परिधान करण्याची इच्छा असली, तरी ते निर्भेळ मिळावे अशी ग्राहकाची अपेक्षा असते. बनावट उत्पादने ही त्यांची चिंता आहे. बनावट खादी उत्पादनाची विक्री होत असल्याच्या कारणावरून गतवर्षी मुंबईतील खादी एम्पोरियममधील विक्री खादी व ग्रामोद्योग आयोगाने बंद पाडली होती. महात्मा गांधी यांच्या सेवाग्राममध्ये तयार होणारी खादी अप्रमाणित असल्याचा ठपका खादी ग्रामोद्योग आयोगाने ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खादीची घरी जाऊन विक्री करण्याचा उपक्रम हा स्वातंत्र्य चळवळीतील प्रतीकांच्या पळवापळवीचा प्रकार असल्याचा आक्षेप महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी नोंदवला होता.

dayanand.lipare@expressindia.com