मद्य घोटाळा आणि त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेनंतर दिल्लीतील मद्यपान आणि त्या संबंधित कायदे, बंदी आणि मद्यविक्रीतून मिळणारा फायदा यांसारखे विषय चर्चेत आहेत. त्याच पार्श्वभामीवर दिल्ली शहरात घातल्या गेलेल्या ऐतिहासिक मद्यबंदीविषयी जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.

दिल्लीला भारताप्रमाणेच हजारो वर्षांचा इतिहास असला तरी, दिल्लीच्या इतिहासातील मुघलांचे पर्व विशेष चर्चेत असते. दिल्ली भारताची राजधानी आहे; तिचे हेच महत्त्व मुघलांच्या कालखंडातही होते. त्यामुळे त्यावेळेसही राजकारणात दिल्ली तितकीच महत्त्वाची होती. म्हणूनच मुघल काळात एखादा निर्णय घेतला गेला की, त्याची अंमलबजावणी या शहरात आधी होत होती. असाच एक निर्णय, वटहुकूम इतिहासात आपल्या क्रूरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एका मुघल सम्राटाने घेतला होता आणि याची नोंद त्यावेळी प्रत्यक्ष त्याच्या दरबारात उपस्थित असणाऱ्या एका व्हेनेशियन लेखकाने घेतली होती.

Mumbai, Two arrested,
मुंबई : वृद्धाचे सोने लुटणाऱ्या दोघांना अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

अधिक वाचा: औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्याबाई होळकर !

कोण होता हा क्रूरकर्मा मुघल सम्राट?

हा मुघल सम्राट दुसरा तिसरा कोणी नसून औरंगजेब होता. औरंगजेबाने आपल्या राज्यात मद्यबंदी केली होती. आणि याची नोंद निकोलाओ मनुची या व्हेनेशियन प्रवाशाने आपल्या Storia do Mogor or Mogul India, 1653-1708 या ग्रंथात केली आहे. त्याने केलेल्या नोंदी मुघल राजवटीत भारतात घडलेल्या घटना समजून घेण्यासाठी सर्वात विश्वसनीय परदेशी स्त्रोतांपैकी एक मानल्या जातात. ‘असे होते मोगल’ हे पुस्तक निकोलाओ मनुचीच्याच पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. हा अनुवाद श्री. ज. स. चौबळ यांनी केला असून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे.

निकोलाओ मनुची (सौजन्य: विकिपीडिया)

निकोलाओ मनुची काय सांगतो

“मुघल कालखंडात भारतात विशेषतः दिल्लीत हिंदू आणि मुसलमान यांच्यात मद्यपानाचे व्यसन बरेच होते. औरंगजेब कुराणाचा कट्टर अनुयायी होता; साहजिकच तो मद्यपानाचा कट्टर विरोधकही होता. जहांगीरच्या कालखंडात मद्यपानाचे व्यसन वाढीस लागले होते. अकबराने ख्रिस्ती लोकांना प्रथम दारू गाळण्याची आणि पिण्याची परवानगी दिली. जहांगीरच्या काळात कुराणाच्या विरोधात जाऊन मुसलमानांनी मद्यपान करण्यास सुरुवात केली. तर शाहजहानच्या कालखंडात हे प्रमाण वाढीस लागले. शाहजहान स्वतः दारू पीत नसला, तरी त्याने लोकांना मोकळीक दिली होती. या कालखंडात मुघल बराच काळ स्त्रियांबरोबर व्यतीत करत असतं. औरंगजेब गादीवर आल्यावर दारूपिणे ही एक सामान्य गोष्ट समजली जात होती. एकदा तो निकोलाओ मनुचीला म्हणाला, या देशात मी आणि माझा काजी हेच फक्त मद्यपान करत नाहीत. परंतु मनुची यांने नमूद केल्याप्रमाणे औरंगजेबाचा काजी मद्यपान करत होता; किंबहुना मनुची याने स्वतःहून काजीला दारू पुरविल्याचा उल्लेखही आपल्याला पुस्तकात सापडतो.

अधिक वाचा: ‘या’ मुघल सम्राटाला होते ख्रिश्चन धर्माविषयी कुतूहल! त्याचा भारतीय कलापरंपरेवर काय परिणाम झाला?

औरंगजेबाने कसा घातला मद्यपानाला आळा?

मुळातच अकबराच्या काळात भारतात स्थायिक झालेल्या युरोपियन लोकांना मद्यपानाची परवानगी देण्यात आली होती. परंतु नंतरच्या मुघल सम्राटांनी या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतला. औरंजेबाला यावरच बंदी आणायची होती. त्याने शहरातील ख्रिस्ती लोकांना शहरापासून दोन मैल अंतरावर तोफखान्याजवळ जाऊन राहण्याची आज्ञा केली. याला अपवाद केवळ वैद्य आणि शल्यवैद्य होते. ख्रिस्तींना तोफखान्याजवळ दारू गाळण्याची परवानगी होती. परंतु त्यांना ते मद्य विकता येणार नव्हते. इतकेच नाही तर त्याने हिंदू-मुसलमान यांच्यातील मद्य विक्रेत्यांचा शोध घेण्याचा आदेशच कोतवालाला दिला होता.

औरंगजेब आणि दरबारी (सौजन्य: विकिपीडिया)

मद्यपानावरील शिक्षा

कोतवालाच्या झडतीत हिंदू-मुसलमान दारू विक्रेते सापडल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही केली जात असे. मनुची लिहितो, ‘मी स्वतः पाहिले १२ जणांना शिक्षा करण्यात आली, त्यात सहा मुसलमान, तर सहा हिंदू होते. त्या लोकांचे हातपाय तोडून त्यांना उकिरड्यावर फरफटत नेण्याची शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत दारू विक्रेते आढळनासे झाले. एखाद्या घरात दारू गाळली जात आहे, असा संशय जरी आला तरी त्या घरावर कोतवाल धाड घाली आणि संपूर्ण घर उध्वस्त करी. सुरुवातीला ही कार्यवाही कडक करण्यात आली होती. परंतु नंतर मात्र त्याची तीव्रता कमी झाली. या काळातही अनेक सरदार चोरून घरातच दारू गाळून पीत होते. चोरून दारू पिणाऱ्यांची संख्या फारच कमी होती. ख्रिस्त्यांनी दारू विकू नये यासाठी पहारेकरी नेमलेले असत, असे असले तरी या धंद्यात पैसे असल्याने तेही चोरून विकत असत.

धंदा उघडकीस आला की, त्या व्यक्तीचे घर लुटले जाई, त्याला हातापायाला बेड्या घालून गळ्याभोवती दारूची भांडी अडकवून कोतवालाकडे फरफटत नेण्यात येई. तेथे त्याला तुरुंगात टाकण्यात येई. बरेच महिने तुरुंगात काढल्यावर मारझोड आणि दंड अशी शिक्षा करून सोडून देत. असे तरी दारू विकण्याचे काम राजरोस सुरु होते. मनुचीने नमूद केल्याप्रमाणे ख्रिस्ती युरोपियन देशांमधून आले होते, त्यापैकी बरेच जण चोर आणि गुन्हेगार होते. ते नावापुरताच ख्रिस्ती होते, त्यांना परमेश्वराची भीती नव्हती. कित्येकांनी दहा ते बारा बायका ठेवल्या होत्या. नेहमी दारू पिऊन पडीक असत, जुगार खेळतं, इतरांना फसवत. या कारणामुळे मोगलांच्या राज्यात फिरंग्यांना पूर्वीसारखा मान राहिला नाही, कित्येकजण पगाराच्या वाढीसाठी मुसलमान झाले. तर पुढे मनुची सांगतो, ‘मुसलमान लोक मादक द्रव्यांना चटावलेले होते. दारू महाग पडते म्हणून गरीबांमध्ये भांग प्रसिद्ध होती. औरंगजेबाला याही व्यसनावर आळा घालायचा होता. त्याकरिता त्याने एक अधिकारी नेमला. त्याला ‘मुहतसिब’ म्हणतं. या अधिकाऱ्याच्या नेमणुकीनंतर रोज शहरातून मादक द्रव्यांची भांडी फोडल्याचा आवाज ऐकू येत असे. हा अधिकारी स्वतः भांग पीत असे, त्यामुळे याही बंदीची दशा आधी प्रमाणेच झाली.

औरंगजेब कुराण वाचताना (सौजन्य: विकिपीडिया)

अधिक वाचा: भारत आणि पाकिस्तानात अकबर आणि औरंगजेब यांच्या परस्परविरोधी प्रतिमा का आढळतात?

औरंगजेबाने मद्यबंदी केली; त्याने स्वतः कधीही मद्य घेतले असे उल्लेख आढळत असले तरी, ‘The World: A Family History’ या Simon Sebag Montefiore लिखित पुस्तकात त्यांनी औरंगजेबाच्या एका प्रेमकथेचा उल्लेख केला आहे. हिराबाई झैनाबादी या नर्तकीवर औरंगजेबाचा जीव जडला होता, आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी कधी नव्हे ते त्यांनी मद्याचा चषक हाती घेतला होता, परंतु त्याने मद्याचे सेवन केल्याचे थेट पुरावे नाहीत.

नवी दिल्लीतील दारु घोटाळा आणि संबंधित सर्व घटना चर्चेत आल्यानंतर इतिहासातील या घडलेल्या घटनांनाही उजाळा मिळाला आणि पुन्हा दिल्लीतील ऐतिहासिक दारुबंदीची चर्चा सुरू झाली.