संजय जाधव
क्रेडिट कार्ड सोयीचे असले आणि त्यावर ऑनलाइन खरेदीसाठी सवलती मिळत असल्या तरी त्याचा ऑनलाइन वापर करताना धोकेही असतात. प्रत्येक वेळी तुम्ही कार्डचे तपशील देयक प्रणालीमध्ये भरता, त्यावेळी तुमच्या माहितीची (विदा) चोरी होण्याचा धोका असतो. त्यात व्यापाऱ्यांकडील असुरक्षित देयक प्रणाली, मालवेअर, असुरक्षित वाय-फाय जाळे यासह इतर अनेक धोक्यांचा समावेश आहे. तुमच्या क्रेडिट कार्डच्या ऑनलाइन वापरातील या धोक्यांमुळे तुमची फसवणूक होते आणि क्रेडिट कार्ड ब्लॉक करावे लागते अथवा ते बदलावे लागते. आपल्या दैनंदिन जीवनात क्रेडिट कार्ड अतिशय महत्त्वाचे बनले आहे. क्रेडिट कार्डचा सुरक्षितपणे वापर करता यावा, यासाठी आता व्हर्च्युअल किंवा आभासी क्रेडिट कार्डचा पर्याय सोयीचा ठरू लागला आहे. नेमका काय आहे हा पर्याय, यावर दृष्टिक्षेप.

डिजिटल व्यवहारांती व्याप्ती किती?

डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या नागरिकांची संख्या मागील वर्षी २.६४ अब्ज होती. जगाच्या लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण सुमारे ३३ टक्के होते. देशाचा विचार करता २०२७ पर्यंत ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांची संख्या ४२.५ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे दिसत आहे. रोखीच्या व्यवहारांऐवजी सध्या डिजिटल व्यवहार आणि प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदीऐवजी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे तुमचे डिजिटल व्यवहार सुरक्षित असणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट ठरते. स्मार्टफोनमुळे सगळे व्यवहार तुमच्या हातात आले असताना डिजिटल व्यवहार आणखी वाढत जाणार आहेत. त्यामुळे ते व्यवहार आणखी सुरक्षित असणे गरजेचे बनले आहे.

cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

हेही वाचा… विश्लेषण : नवीन करोना उपप्रकाराला रोखण्यासाठी वर्धक मात्रेची गरज आहे का?

आभासी किंवा व्हर्च्युएल क्रेडिट कार्ड कसे असते?

पारंपरिक क्रेडिट कार्डलाच हा डिजिटल पर्याय उपलब्ध आहे. हे कार्ड प्रत्यक्षात जवळ बाळगावे लागत नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते डिजिटल रूपात असते. या आभासी कार्डला एक क्रमांक, मुदत संपण्याची तारीख आणि सीव्हीव्ही कोड असतो. ते तुमच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डला जोडलेले असते. या कार्डमध्ये अतिरिक्त सुरक्षेची पातळी असल्याने व्यवहार करताना तुमच्या माहितीची देवाणघेवाण होत नाही. ग्राहक हा आभासी क्रेडिट कार्डचा तपशील देयक प्रणालीत भरून व्यवहार करतो आणि क्रेडिट कार्ड पुरवठादार कंपनी अथवा बँक तुमच्या प्रत्यक्षातील डिजिटल कार्डच्या तपशिलाच्या आधारे हा व्यवहार पूर्ण करते.

अतिरिक्त सुरक्षा कशी?

आभासी क्रेडिट कार्ड हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते. ते एका व्यवहारापुरते अथवा मर्यादित कालावधीपुरते वापरता येते. ऑनलाइन खरेदी करताना ग्राहक मोबाइल बँकिंग अथवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून आभासी क्रेडिट कार्ड मिळवता येते. त्याद्वारे तुम्हाला व्यवहार करता येतात. एखाद्या वेळी ऑनलाइन व्यवहार करताना तुमच्या माहितीची चोरी झाली तरी त्यापासून होणारे नुकसान कमी असते. कारण ऑनलाइन देयक प्रणालीत तुमच्या प्रत्यक्षातील क्रेडिट कार्डचे तपशील नसतात.

हेही वाचा… विश्लेषण : रेव्ह पार्ट्यांचे जाळे किती दाट?

ग्राहकाकडे अधिक नियंत्रण कसे?

आभासी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकाला व्यवहारावर अधिक नियंत्रण ठेवता येते. याचबरोबर व्यवहारावर अनेक मर्यादा ठेवता येतात. व्यवहारांची संख्या, कालावधी, देशांतर्गत व्यवहार की आंतरराष्ट्रीय व्यवहार आदी बाबी ग्राहकाला अगदी सहजपणे ठरवता येतात. याचबरोबर एखादा व्यापारी अथवा एखादा व्यवहार एवढ्यापुरताही हा वापर मर्यादित करता येतो. यामुळे आभासी क्रेडिट कार्डचा गैरवापर टाळता येतो. याचबरोबर वित्तीय नुकसानही कमी करता येते. एखाद्यावेळी तुमच्या माहितीची चोरी झाल्यास प्रत्यक्षातील क्रेडिट कार्डची माहिती फसवणूक करणाऱ्यांना मिळत नाही.

आणखी फायदे काय?

तुम्ही व्यक्तिगत व्यवहाराऐवजी इतर व्यवहार करता त्यावेळी आभासी कार्डाच्या तपशिलाची देवाणघेवाण होते आणि त्या माध्यमातून व्यवहार पूर्ण होतो. तुम्हाला तुमच्या प्रत्यक्षातील कार्डाचा तपशील द्यावा लागत नाही. एखादा व्यवहार करताना समोरची संस्था फसवणूक करणारी असल्यास त्यांना तुमच्या प्रत्यक्षातील कार्डाचा कोणताही तपशील मिळत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याचा धोका कमी होतो.

हेही वाचा… भीमा- कोरेगाव: १८१८ साली आजच्या दिवशी नेमके काय घडले होते? गॅझेटियर काय सांगते?

ऑनलाइन खरेदीसाठी चांगला पर्याय?

ऑनलाइन खरेदी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे सुरक्षित खरेदीसाठी आभासी डिजिटल कार्डचा पर्याय चांगला ठरत आहे. आपल्या सोयीनुसार, हव्या तेवढ्या कालावधीसाठी आणि हव्या त्या कारणासाठी प्रत्यक्षातील क्रेडिट कार्डचा क्रमांक अथवा इतर तपशील न देता व्यवहार करता येतात. त्यामुळे आभासी क्रेडिट कार्डला ग्राहकांकडून ऑनलाइन व्यवहारांसाठी प्राधान्य दिले जात आहे. सुरक्षित डिजिटल व्यवहारांच्या दिशेने ग्राहकांचे पडलेले हे पाऊल आहे.

sanjay.jadhav@expressindia.com