NAI अर्थात राष्ट्रीय अभिलेखागार यांच्याकडे १९६२, १९६५ आणि १९७१ ला झालेल्या युद्धांच्या नोंदीच नाहीत. तसंच हरित क्रांतीची नोंद नाही. NAI चे महासंचाक चंदन सिन्हा यांनी नुकतीच ही माहिती दिली आहे. NAI हे फक्त भारत सरकार आणि त्यांच्या संस्थांच्या नोंदी ठेवतं. त्याला वर्गीकृत कागदपत्रं मिळत नाहीत. राष्ट्रीय अभिलेखागार यांच्याकडे अनेक मंत्रालयांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर NAI कडे कुठल्याही नोंदी दिलेल्या नाहीत त्यामुळेच NAI अर्थात राष्ट्रीय अभिलेखागाराकडे अनेक नोंदी नाहीत. आपण आता जाणून घेणार आहोत की National Archives of India म्हणजेच NAI कसं काम करतं?

NAI नेमकं कसं काम करतं?
NAI हे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असतं. राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये इतिहासतल्या विविध नोंदी असतात. अनेक प्रशासक त्याचा वापर अभ्यास करण्यासाठी करतात. ब्रिटिशांच्या ताब्यात जेव्हा आपला देश होता त्यावेळी आपल्या देशाची राजधानी कोलकाता होती. त्यावेळी १८९१ मध्ये इंपिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट स्थापन करण्यात आलं. जे आता NAI च्या रूपाने दिल्लीमध्ये आहे. हा विभाग सरकार आणि त्यांच्या संस्थांच्या भूतकाळातल्या नोंदी ठेवण्याचं काम करतो.

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
mpsc Mantra  Current Affairs Question Analysis
mpsc मंत्र : चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

या विभागात काम करणारे अधिकारी काय सांगतात?
NAI मध्ये काम करणारे अधिकारी सांगतात की NAI मधल्या अनेक होल्डिंग्ज या १७४८ पासून नियमित आहेत. या ठिकाणी असणाऱ्या अनेक नोंदी या प्रामुख्याने इंग्रजी, अरबी, हिंदी, पर्शियन, संस्कृत आणि उर्दू या भाषांमध्ये आहेत. अलिकडच्या काळात माहिती मिळवण्याचं बदलेलं स्वरूप लक्षात घेऊन NAI ने त्यांच्याकडच्या नोंदी डिजिटल स्वरूपात आणण्यास सुरूवात केली आहे. पाच वर्षांपासून हे काम सुरू आहे जे आता प्रगतीपथाव आहे कारण अद्याप सगळ्या नोंदी डिजिटल झालेल्या नाहीत.

NAI कडे नोंदी कशा केल्या जातात?
पब्लिक रेकॉर्ड अॅक्ट १९९३ नुसार विविध मंत्रालयं आणि इतर विभागांनी २५ वर्षांहून अधिक जुन्या नोंदी NAI कडे दिल्या पाहिजेत. जो पर्यंत या नोंदी दिल्या जात नाहीत तोपर्यंत त्याचा अभिलेखागारात समावेश करता येत नाहीत. जोपर्यंत एखादं मंत्रालय किंवा त्याच्याशी संबंधित विभाग हा NAI कडे त्यांच्या नोंदी लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत NAI त्याचा समावेश दस्तावेजांमध्ये करत नाही.
विविध मंत्रालयं आणि त्यांच्याशी संबंधित विभाग हे काय नोंदणी करण्यासारखं आहे आणि काय नाही कुठल्या गोष्टी अभिलेखागारात द्यायल्या हव्यात यासंबंधीची याची यादी तयार करतात. त्यानुसार या सगळ्या नोंदी/ दस्तावेज या विभागाला देण्यात येतात.

NAI कडे ३६ मंत्रालयं आणि विभागांसह फक्त ६४ एजन्सींच्या नोंदी आहेत. प्रत्यक्षात विविध प्रकारची १५१ मंत्रालयं आहेत. मात्र अनेक मंत्रालयं आणि त्यांच्याशी संबंधित विभागांनी NAI कडे त्यांची माहिती दिलेली नाही असं सिन्हा यांनी सांगितलं होतं. हरित क्रांतीची NAI कडे नोंद नाही ज्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात आवर्जून केला जातो. त्याचप्रमाणे १९६२, १९६५ आणि १९७१ ची युद्ध यांच्याही नोंदी आमच्याकडे नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आपण गमावला?
सिन्हा यांनी असं सांगितलं आहे की असे अनेक मुद्दे जे तुम्हाला सांगताना खूपच वाईट वाटतं आहे आपल्याकडे अनेक महत्त्वाच्या घटनांशी संबंधित नोंदी नाहीत. खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासाचा एक मोठा भाग आपण गमावत आहोत का? हा प्रश्न आम्हालाही भेडसावतो आहे. संरक्षण मंत्रालयाने या वर्षाच्या सुरूवातीपर्यंत ४६७ फाईल्स आम्हाला दिल्या होत्या. त्याचप्रमाणे १९६० पर्यंतच्या २० हजार फाईल्स या वर्षी हस्तांतरित केल्या गेल्या असंही त्यांनी सांगितलं.