प्रिन्सेस डायनाने घातलेल्या एका ड्रेसचा लवकरच लिलाव केला जाणार आहे. गडद वांगी रंगाचा हा ड्रेस लवकरच लिलाव केला जाणार आहे. या ड्रेसला Revenge ड्रेस असं संबोधलं गेलं. ऑफ शोल्डर प्रकारात मोडला जाणारा हा ड्रेस फारच सुंदर आहे. प्रिन्सेस डायना या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसायची. डायनाची ती कपडे घालण्याची स्टाईल थोडी हटके होती. ज्या दिवशी डायनाला पती प्रिन्स चार्ल्स (आता ब्रिटनचे राजे )यांच्या अफेअर बाबत समजलं होतं. त्यादिवशी डायनाने रडत बसण्यापेक्षा हा शानदार ड्रेस घालून निघाली. खांद्यावरून खाली रूळणारा आणि गुडघ्यांच्या वर असलेल्या या ड्रेसला रिव्हेंज ड्रेस असं म्हटलं गेलं.

ड्रेस डिझायनरने काय म्हटलं आहे?

प्रिसेंस डायनाज ड्रेसेस : द ऑक्शन या डॉक्युमेंट्रीमध्ये प्रसिद्ध डिझायनर क्रीस्टिना स्टेमबोलिअन यांनी सांगितलं की या ड्रेसचं स्केच तीन वर्षांपूर्वी तिने प्रिन्सेस डायनासोबत बसून तयार केलं होतं. मात्र तो ड्रेस घालण्याची हिंमत कदाचित डायनामध्ये तेव्हा नव्हती. मात्र पतीने आपल्याला फसवलं आहे, प्रतारणा केली आहे हे कळलं तेव्हा डायनाची सगळी भीती संपली. तिने राजघराण्याची सगळी बंधनं तोडली आणि हा ड्रेस घातला. ज्याची चर्चा प्रचंड प्रमाणात झाली होती.

राजघराण्याचा अलिखित ड्रेसकोड

एखादी ब्रिटिश महिला जर काळ्या ड्रेसमध्ये वीक एन्डला दिसते. मात्र ब्रिटनच्या राजघराण्यातल्या सुनेसाठी ते स्वप्न होतं. १९९१ मध्ये तिने हे स्वप्न पाहिलं होतं. लंडनच्या ऑक्सफोर्डच्या फॅशन स्ट्रिटवर फिरत होती. त्या स्ट्रिटवर डायना क्रिस्टिनाच्या बुटिकमध्ये पोहचली. काही कपडे खरेदी केल्यानंतर वेगळं, हटके काहीतरी दाखव अशी विनंती तिने केली. एकदम खास असा ड्रेस दाखवायला डायनाने सांगितलं.

क्रिस्टिना म्हणते प्रिन्सेस डायना थोड्या घाबरल्या होत्या

क्रिस्टिनाने सांगितलं आहे की आम्ही दोघींनी एका ड्रेसचं स्केच तयार केलं. जे स्केच तयार झालं तो ड्रेस ओपन होता. त्यात डायनाची फिगर सुंदर दिसली असती यावर दोघींचंही एकमत झालं होतं. तिला या ड्रेसचा रंग क्रीम किंवा ब्लॅक, व्हाईट हवा होता. स्केच पाहून ती खुश झाली होती. पण नंतर तिने ऑर्डर दिली. तिने तिच्या भावालाही विचारलं होतं की हा ड्रेस मी घातला तर योग्य असेल का? भावाने डायनाला सांगितलं की तुला जे आवडेल ते कर. डायनाने त्यानंतर ड्रेसची ऑर्डर दिली.

तीन वर्षांनी काय घडलं?

लेडी डायनाने शेकडो कपडे घातले असतील. पण तिला त्या काळ्या रंगाच्या ड्रेसची भुरळच पडली होती. जून १९९४ मध्ये एका टीव्ही इंटरव्ह्यू च्या दरम्यान त्यावेळी प्रिन्स असलेले चार्ल्स यांनी आपण आपल्या विवाहात खुश नाही असं सांगितलं. त्यांनी हेदेखील सांगितलं की सुरूवातीला मी माझ्या पत्नीशी प्रामाणिक होतो, मात्र आता नाही. या मुलाखतीत ते म्हणाले की हो मी डायनला फसवलं आहे. आज तकने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

डायना हसत हसत फोटोग्राफर्सना सामोरी गेली

प्रिन्स चार्ल्स यांनी हे वक्तव्य केल्यानंतर आता डायना रडत बसेल अनेक प्रसारमाध्यमांना वाटलं होतं. मात्र तसं काही घडलं नाही. त्याच रात्री एका आर्ट शोसाठी डायना तो काळ्या रंगाचा ड्रेस घालून निघाली ज्या ड्रेसची तिला विलक्षण भुरळ पडली होती. तो ड्रेस घालूनच डायना सर्पेंटाईन गॅलरी या ठिकाणी गेली. तिथे एक दोन नाही तर अनेक फोटोग्राफर्स होते. त्यांना डायना हसत सामोरी गेली तिने अनेक फोटोग्राफर्सना पोज दिल्या आणि बिनधास्त फोटो काढले. तो असा काळ होता ज्या काळात घरात एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तरच राज घराण्यातल्या स्त्रिया किंवा पुरुष काळे कपडे परिधान करत असत. पश्चिमेकडच्या देशात आजही ही पद्धत आहे. मात्र ही परंपरा डायनाने मोडली. त्यामुळेच ब्रिटनमध्ये डायनाने परिधान केलेल्या या ड्रेसला रिव्हेंज ड्रेस असं संबोधलं गेलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिमी देशातला काळा कपड्यांचा इतिहास

जे कपडे डायनाने घातले होते त्याला लिटिल ब्लॅक ड्रेस असंही संबोधलं गेलं. फॅशन विषयाच्या अभ्यासकांनुसार १६ वं शतक ते १९ वं शतक या कालावधीत घरात कुणी गेलं असेल तर अशा पद्धतीचे कपडे शाही घराण्याच्या स्त्रिया परिधान करत असत. काळा रंग हे दुःख व्यक्त करण्याचं प्रतीक झालं होतं. पहिल्या महायुद्धात या रंगाची परिभाषा पुन्हा बदलली. कारण तेव्हा जवळपास सगळे पुरूष युद्धावर गेले होते आणि महिला कार्यालयांमध्ये जाऊ लागल्या होत्या. त्यावेळी अशा प्रकारचे ड्रेस पार्टीजमध्येही घातले जाऊ लागले. त्यानंतर काळा रंग फक्त दुःखाचा रंग राहिला नाही.